Homeशहरउल्हासनगर-अंबरनाथदरम्यान रेल्वे रुळावर लोखंडी बॉक्स; मोटरमन-गार्डच्या सतर्कतेमुळे संभाव्य अनर्थ टळला

उल्हासनगर-अंबरनाथदरम्यान रेल्वे रुळावर लोखंडी बॉक्स; मोटरमन-गार्डच्या सतर्कतेमुळे संभाव्य अनर्थ टळला

उल्हासनगर दि.२९ ( प्रमोद दळवी )  : उल्हासनगर – अंबरनाथ रेल्वे स्थानकांदरम्यान कर्जतकडे जाणाऱ्या मार्गावरील रेल्वे रुळावर मंगळवारी सायंकाळी एक जड लोखंडी चौकोनी बॉक्स आढळल्याने खळबळ उडाली. सीएसटीकडे धावणाऱ्या लोकल रेल्वीच्या मोटरमन आणि गार्ड यांच्या प्रसंगावधानामुळे संभाव्य मोठा रेल्वे अपघात टळल्याची घटना घडली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी सायंकाळच्या सुमारास उल्हासनगर – अंबरनाथ स्थानकांदरम्यान कर्जतकडे जाणाऱ्या रेल्वे रुळावर  कोणीतरी एक मोठा व जड लोखंडी चौकोनी बॉक्स ठेवला होता. उल्हासनगर रेल्वे स्थानकाजवळून जात असताना सीएसटी लोकलच्या मोटरमनच्या ही बाब निदर्शनास आली. त्यांनी तत्काळ गार्डला याबाबत माहिती दिली. त्यानंतर तातडीने लोकल थांबविण्यात आली. रेल्वे कर्मचारी आणि प्रवाशांच्या मदतीने संबंधित लोखंडी बॉक्स रेल्वे रुळावरून उचलून सुरक्षितपणे बाजूला करण्यात आला. त्यामुळे पुढील गाड्यांचा मार्ग मोकळा झाला आणि संभाव्य दुर्घटना टळली.

या घटनेची माहिती तातडीने रेल्वे सुरक्षा बल (RPF) तसेच शासकीय रेल्वे पोलीस (GRP) यांना देण्यात आली. संबंधित बॉक्स वेळेत हटविण्यात आला नसता तर तो लोकल किंवा एक्स्प्रेस गाडीच्या कॅटल गार्डला अडकून गंभीर अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नव्हती. दरम्यान, हा लोखंडी बॉक्स रेल्वे रुळावर कोणी ठेवला, तो तेथे कशासाठी आणण्यात आला होता आणि त्यामागे घातपाताचा अथवा अपघात घडवून आणण्याचा कोणताही हेतू होता का, याचा सखोल तपास रेल्वे पोलीस आणि संबंधित यंत्रणांकडून सुरू करण्यात आला आहे. या घटनेमुळे रेल्वे सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून, रेल्वे परिसरात संशयास्पद वस्तू अथवा हालचाली आढळल्यास तातडीने रेल्वे प्रशासनाला माहिती देण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

पिंपरी चिंचवड येथील राष्ट्रीय कार्यशाळेत सायबर गुन्हे, पीडित केंद्रीत पोलीसिंग केंद्रस्थानी

प्रश्नोत्तराच्या सत्रादरम्यान, विद्यार्थ्यांनी सामाजिक बदलामध्ये तरुणांची भूमिका, स्क्रीनशॉट यावर चर्चा केली पुणे: कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्या एजन्सींनी महिलांवरील गुन्ह्यांच्या तपासाचा दर्जा आणि गती सुधारण्यासाठी...

मनसे विद्यार्थी सेनेच्या ‘जिल्हा संघटक – कल्याण लोकसभा’पदी ॲड कल्पेश माने यांची नियुक्ती

उल्हासनगर दि . २९ ( प्रमोद दळवी ) : महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेने पुन्हा एकदा ॲड कल्पेश माने यांच्यावर विश्वास व्यक्त करत त्यांची ‘जिल्हा...

मुंबईच्या अटल सेतूवर बाईकस्वार चालवल्याचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर एफआयआर दाखल, पोलिसांनी सुरू केली शोध

मुंबई: अटल सेतूवर दुचाकी पकडतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी दुचाकीस्वाराविरुद्ध एफआयआर दाखल केला असून त्याचा शोध सुरू आहे.अटल सेतूवर दुचाकी...

होमिओपॅथी प्रॅक्टिशनर्सच्या शासनावर राज्य आज अंतिम निर्णय देऊ शकते | पुणे बातम्या

वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक सायंकाळी उशिरापर्यंत चालली ज्यात होमिओपॅथी चिकित्सक आणि ॲलोपॅथी डॉक्टरांच्या प्रतिनिधींनी युक्तिवाद केला. त्यानंतर दोन्ही...

स्पेन-अर्जेंटिना फायनलच्या एका आठवड्यानंतर विश्वचषक अंतिम रेफ्री स्लाव्हको विन्सिक यांनी करिअरचा मोठा निर्णय घेतला

स्पेन-अर्जेंटिना विश्वचषक फायनलनंतर विश्वचषक अंतिम पंच स्लाव्हको विन्सिक यांनी निवृत्ती घेतली स्लोव्हेनियन रेफ्री स्लाव्हको विन्सिक यांनी अधिकृतपणे रेफरी कारकिर्दीचा शेवट केला आहे, 2026...

error: Content is protected !!