Homeशहरउल्हासनगरात शिवसेनेला दुसरा झटका : जात प्रमाणपत्र अवैध ठरल्याने पूजा भोईर...

उल्हासनगरात शिवसेनेला दुसरा झटका : जात प्रमाणपत्र अवैध ठरल्याने पूजा भोईर यांचे नगरसेवक पद रद्द

उल्हासनगर दि. २७ ( प्रमोद दळवी )  : अनुसूचित जमाती प्रवर्गातून उल्हासनगर महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक १ ( ब ) मधून शिवसेना शिंदेगटाच्या तिकिटावरून नगरसेवक पदी निवडून आलेल्या पूजा भोईर यांचे नगरसेवक पद रद्द करण्यात आले आहे. पूजा भोईर यांचे जात प्रमाणपत्र अवैध ठरल्याने उल्हासनगर महापालिका आयुक्त मनीषा आव्हाळे यांनी शुक्रवारी त्यांचे सदस्यत्व रद्द करण्याचे आदेश जारी केले आहे.

यापूर्वी उल्हासनगर महापालिकेच्या प्रभाग क्रमांक ६ ( अ )मधून शिंदे सेनेच्या विक्कीसिंग लबाना यांचे देखील नगरसेवक पद रद्द करण्यात आले होते. या दोन्ही घटनेमुळे शिंदेसेनेला धक्का बसला असून भाजपात मात्र उत्साहाचे वातावरण शहरात दिसून येत आहे. उल्हासनगर महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत प्रभाग क्रमांक १ (ब ) मधून शिवसेनेच्या चिन्हावर नगरसेवक पदी निवडून आलेल्या पूजा भोईर यांचे जात प्रमाणपत्र ठाणे जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीकडे सादर करण्यात आले होते. प्रमाणपत्राची पडताळणी केल्यावर सुनावणीत पूजा भोईर यांचे जात प्रमाणपत्र अवैध ठरवण्यात आले. याशिवाय ते प्रमाणपत्र रद्द करून ते सरकारजमा करण्याच्या आदेश देण्यात आले आहेत. उल्हासनगर महापालिका आयुक्त मनीषा आव्हाळे यांनी महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम कलम १० (१-क) अन्वये नगरसेवक रद्द करण्याची कारवाई केली.

शिंदेसेनेचे विक्कीसिंग लबाना व पूजा भोईर यांचे नगरसेवक पद रद्द झाल्याने, प्रभाग ६ ‘अ’ व प्रभाग क्रं-१ (ब)मध्ये पोटनिवडणूक होणार आहे.. महापालिकेतील दोन नगरसेवकाचे पद रद्द झाल्याने, नगरसेवकाची संख्या ७८ वरून ७६ वर आली. महापालिकेत भाजपाचे-३७, शिंदेसेना-३४, वंचित बहुजन आघाडी-२, काँग्रेस-१, साई पक्ष-१, व अपक्ष-१ असे पक्षीय बलाबल आहे. शिंदेसेनेच्या २ नगरसेवकाचे नगरसेवक पद रद्द झाल्याने, शिंदेसेनेच्या नगरसेवकांची संख्या ३६ वरून ३४ वर आली आहे. शिंदेसेनेचे ४ ते ५ नगरसेवक भाजपाच्या टार्गेटवर असून महापालिकेत सत्तेसाठी भाजपाने निवडणूक पूर्व तयारी सुरू केल्याचे बोलले जात आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

मागे वळून पहा: एनएफएल घोटाळा इतका चांगला आहे की, सफाई कर्मचाऱ्यांना आघात झाला. मिनेसोटा...

ग्रीन बे पॅकर्स विरुद्ध खेळताना मिनेसोटा वायकिंग्सचा क्वार्टरबॅक डौंटे कल्पेपर दिसत आहे. (Getty आणि Twitter/X द्वारे प्रतिमा) त्या बोटीवर पाऊल ठेवणाऱ्या प्रत्येकासाठी फ्रेड...

महाराष्ट्र शासनाच्या ‘अमृत’ संस्थेच्या योजनांमधून मुस्लिम तरुणांना वगळण्यात आले आहे मुंबई बातम्या

मुंबई: सरकारच्या अमृत संस्थेच्या योजनांमधून मुस्लीम तरुणांना वगळल्याचा मुद्दा उपस्थित करत, भिवंडी पूर्व येथील समाजवादी पक्षाचे आमदार रईस शेख म्हणाले की, राज्य...

2012 मध्ये लोहगाव उपजिल्हा रूग्णालय चाचणी तत्वावर सुरू करण्यास मान्यता

बापू पठारे यांच्यासह आरोग्य अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिली पुणे: 14 वर्षांच्या प्रतीक्षेनंतर, रु. 55 कोटींची गुंतवणूक आणि स्थानिक रहिवाशांच्या सततच्या मागणीनंतर, 100 खाटांचे...

तुमच्या राजमामध्ये अधिक फायबर जोडण्यासाठी 7 सोपे घटक

राजमाला आधीच चांगली प्रतिष्ठा आहे. वनस्पती प्रथिने, लोह आणि फायबरने भरलेले, हे अशा आरामदायी अन्नांपैकी एक आहे जे पोषणतज्ञ तुम्हाला क्वचितच सोडून देण्यास सांगतात....

युवासेना उपशहर अधिकारी कल्पेश वाघ यांचा वाढदिवस उत्साहात साजरा

उल्हासनगर दि. २७ ( प्रमोद दळवी )  : युवासेना उपशहर अधिकारी कल्पेश वाघ यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. शिवसेना व युवासेनेच्या पदाधिकारी...

error: Content is protected !!