Homeशहरउल्हासनगरात जिल्हास्तरीय 'सुब्रतो फुटबॉल कप २०२६-२७' स्पर्धा उत्साहात संपन्न

उल्हासनगरात जिल्हास्तरीय ‘सुब्रतो फुटबॉल कप २०२६-२७’ स्पर्धा उत्साहात संपन्न

उल्हासनगर दि. २२ ( प्रमोद दळवी )  : क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, जिल्हा क्रीडा परिषद, ठाणे तथा उल्हासनगर महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित जिल्हास्तरीय शालेय ‘सुब्रतो फुटबॉल कप’ २०२६-२७ स्पर्धा २१ ते २२ जुलै २०२६ या कालावधीत उल्हासनगर-१ येथील रामलीला मैदान, सरला बिर्ला हायस्कूल येथे उत्साहपूर्ण वातावरणात पार पडल्या.

उल्हासनगर महानगरपालिका आयुक्त श्रीमती मनिषा आव्हाळे, अतिरिक्त आयुक्त डॉ. धिरज चव्हाण, उपआयुक्त (क्रीडा) श्रीमती विशाखा मोटघरे तसेच सहाय्यक आयुक्त श्रीमती अलका पवार यांच्या मार्गदर्शनाखाली या स्पर्धांचे यशस्वी आयोजन करण्यात आले. स्पर्धेत १५ वर्षांखालील मुले तसेच १७ वर्षांखालील मुले व मुली या गटांतील जिल्ह्यातील विविध शाळांनी सहभाग नोंदविला. स्पर्धेतील अंतिम निकालानुसार  “सुब्रतो फुटबॉल कप” स्पर्धेत सरला बिर्ला शाळेतील १५ वर्षेखालील मुले व १७ वर्षाखालील मुलींनी प्रथम क्रमांकाने विजय मिळवला आहे. व श्रीमती. सी. एच. एम. कॉलेज मधिल मुलांचा संघ प्रथम क्रमांकाने विजय झाला.

स्पर्धेच्या उद्घाटन समारंभास उल्हासनगरच्या महापौर श्रीमती अश्विनी कमलेश निकम, क्रीडा व सांस्कृतिक समितीच्या सभापती श्रीमती प्रीती विनोद माखीजा, प्रभाग समिती क्र. ४ च्या सभापती श्रीमती सुहाना रवि जेसवानी, नगरसेविका श्रीमती अनंता रूपचंदानी, श्रीमती वंदना भदाणे, नगरसेवक श्री दुर्गा राय, तसेच सरला बिर्ला हायस्कूलच्या मुख्याध्यापिका श्रीमती विद्याराणी गायकवाड यांची प्रमुख उपस्थिती लाभली.

स्पर्धेतील विजेत्या व उपविजेत्या संघांना ट्रॉफी व पारितोषिकांचे वितरण क्रीडा व सांस्कृतिक समितीच्या सभापती श्रीमती प्रीती विनोद माखीजा, क्रीडा विभाग प्रमुख श्री अजित गोवारी, श्री शांताराम चौधरी, समाजसेवक श्री विनोद माखीजा, श्री प्रमोद पारसी, श्री संजय ढमाळे, श्री सतिश राजगुरू, श्री प्रफुल सर, श्री सुभाष कोंढारी, श्री सागर खैरनार, श्री निखिल सियोता, श्री मयूर खंडारे, श्री निलेश आरेकर, श्रीमती छाया महाजन, भेरे मॅडम तसेच श्री उदय पवार यांच्या हस्ते करण्यात आले.स्पर्धेदरम्यान खेळाडूंनी उत्कृष्ट क्रीडाकौशल्य, शिस्त व सांघिक खेळाचे दर्शन घडविले. संपूर्ण स्पर्धा आनंददायी, उत्साही आणि क्रीडामय वातावरणात यशस्वीरित्या पार पडली. स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी क्रीडा विभाग, आयोजक, पंच, प्रशिक्षक, स्वयंसेवक तसेच सहभागी शाळांनी मोलाचे योगदान दिले. याबाबतची माहिती उल्हासनगर महानगरपालिकेच्या जनसंपर्क अधिकारी प्राजक्ता कुलकर्णी यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

चायना ओपनमध्ये भारताची मोहीम संपली: लक्ष्य सेन, आयुष शेट्टी दुसऱ्या फेरीत पराभूत झाले

आयुष शेट्टी, लक्ष्य सेन चायना ओपन 2026 मधून बाहेर (इमेज: X) चीन ओपन 2026 मधील भारताचे आव्हान गुरुवारी लक्ष्य सेन आणि आयुष शेट्टी...

‘पिव्होट, हार मानू नका’: सार्वजनिक संमेलनावरील बंदी दरम्यान होम स्टेसाठी कॉल करा

मुंबई : शहरव्यापी निषिद्ध आदेशांनुसार क्रॅकडाउनची तयारी करत, सलग चार दिवसांच्या निषेधानंतर गुरुवारी निदर्शक रस्त्यावरून ऑनलाइन झाले.ओमकार सारख्या सोशल मीडिया प्रभावकांनी त्यांच्या...

रिदम वाघोलीकर: पंढरपूर वारीची जादू अनुभवताना पुणेस्थित लेखक रिदम वाघोलीकर | पुणे बातम्या

दरवर्षी मान्सूनचे ढग महाराष्ट्रावर जमल्यावर हजारो फूट एका गंतव्यस्थानाकडे सरकू लागतात - पंढरपूर. खांद्यावर श्रद्धा आणि ओठांवर विठ्ठलाचे नाव घेऊन ते दिवसभर...

हॉटेल बाथरूम मिरर: तुम्ही जवळपास प्रत्येक हॉटेलच्या बाथरूममध्ये हा आरसा पाहिला असेल, पण तुम्हाला...

रेग्युलर आरसा आणि भिंग मिररमधील सर्वात मोठा फरक म्हणजे तो दाखवत असलेल्या तपशीलाची पातळी. हॉटेलच्या बाथरूममध्ये जा आणि तुम्हाला बऱ्याचदा एक परिचित सेटअप...

श्रीमती सरिता खानचंदानी यांना श्रद्धांजली अर्पण करून सामाजिक संघटनांची संयुक्त बैठक संपन्न

उल्हासनगर दि. २३ ( प्रमोद दळवी ) : उल्हासनगर महानगरपालिका क्षेत्रातील नागरिकांच्या विविध नागरी समस्या सोडविणे तसेच शहराच्या सर्वांगीण विकासासाठी विविध सामाजिक संघटना, समाजसेवक...

error: Content is protected !!