Homeशहरउल्हासनगरात कचरा उचलणाऱ्या कामगारांचा संप : पगार मिळत नाही तोपर्यंत काम बंद...

उल्हासनगरात कचरा उचलणाऱ्या कामगारांचा संप : पगार मिळत नाही तोपर्यंत काम बंद आंदोलनाचा इशारा

उल्हासनगर दि १३ ( प्रमोद दळवी ): उल्हासनगर शहरातील कचरा उचलणाऱ्या कोणार्क कंपनीच्या कर्मचाऱ्यांना एक महिना होऊनही अद्याप पर्यंत पगार न दिल्याने कामगारांमध्ये संतापाचे वातावरण पसरले आहे . शुक्रवारी या कामगारांनी काम बंद आंदोलन सुरू केले. कामगाराच्या न्याय हक्कासाठी लढणाऱ्या लढा कामगार संघटनेचे अध्यक्ष संदीप गायकवाड यांनी जोपर्यंत कामगारांना पगार देत नाही तोपर्यंत काम बंद आंदोलन करण्याची भूमिका घेतल्याने शुक्रवारी कामगारांनी काम बंद आंदोलन केले. कामगारांनी सुरू केलेल्या या आंदोलनामुळे शहरात कचऱ्याचे ढीग साचलेले पाहायला मिळत आहेत. त्यामुळे रोगराई पसरण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

उल्हासनगर महापालिकेने शहरातील कचरा उचलण्याचा ठेका कोणार्क कंपनीला दिलाय. कचरा उचलण्यावर दिवसाला साडेआठ लाख खर्च महापालिका करते. कोणार्क कंपनीने गेल्या एक महिन्यापासून कामगारांना पगार दिलेला नाही असे कामगार सांगत आहेत.  कचरा उचलणाऱ्या ७००  पेक्षा जास्त कर्मचाऱ्यांचे वेतन दिले नाहीये. कामगारांचे ७ तारखेला  पगार झाला नसल्याने त्यांच्यात असंतोष निर्माण झाले आहे . कामगारांच्या न्याय हक्कासाठी लढणाऱ्या लढा कामगार संघटनेचे अध्यक्ष संदीप गायकवाड यांनी वेतन नाही तोपर्यंत काम बंद अशी भूमिका घेतल्याने शुक्रवारी काम बंद आंदोलन कामगारांनी सुरु केले आहे. दरम्यान कामगार हे तुटपुंजा पगारात काम करत असल्याचा आरोप कामगार करत आहेत.

या बाबत कामगारांच्या न्याय हक्कासाठी लढणाऱ्या लढा कामगार संघटनेचे अध्यक्ष संदीप गायकवाड यांनी सांगतले कोणार्क कंपनी प्रशासनाकडून दर महिन्याला पगार देण्याबाबत दिरंगाई केली जाते. त्यामुळे  सर्वसामान्य कामगार जे शहराची स्वच्छता करतात त्यांचं महिन्याभराचं गणित बिघडून जाते. कामगारांना पगार वेळेवर मिळत नसल्यामुळे त्यांना अनेक प्रसंगाचा सामना करावा लागतो. आता शैक्षणिक वर्ष चालू होत आहे. मुलांच्या शाळा सुरू होणार आहेत. मुलांना लागणारा गणवेश त्यांना लागणारी पुस्तके, दप्तर घ्यायचे आहेत. पण १३  तारीख आली तरी अद्याप कंपनी प्रशासनाने कामगारांचा पगार दिला नसल्यामुळे कामगारांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. याशिवाय पावसाळाही सुरू झाला आहे. कोणाला घरावर प्लास्टिक टाकायचं आहे तर कोणाला घराची डागडूजी देखील करायचे आहे. याशिवाय कोणाला बँकेचा हप्ता देखील द्यायचा आहे. पण पगार वेळेवर मिळत नसल्याने बँकेचा हप्ता देखील वेळेवर भरता येत नाही. त्यामुळे चेक बाउन्स साठी त्यांना सातशे ते आठशे रुपये मोजावे लागतात. अशा कामगारांचे बँकेचे सिव्हिल सुद्धा खराब होतात. याला जबाबदार कोण आहे. भर पावसात देखील कामगार आपल्या जीवाची पर्वा न करता स्वच्छतेकडे लक्ष देत असतात. शहरात स्वच्छता ठेवतात. पण त्यांना  वेळेवर पगार का दिला जात नाही असा संतप्त सवाल संदीप गायकवाड यांनी केला आहे.

संदीप गायकवाड म्हणाले मी कंपनी प्रशासन व  महानगरपालिकेला विचारतोय की या सर्व सामान्य कामगारांना न्याय कोण देणार त्यांना वेळेवर पगार कोण देणार जर महानगरपालिका इन्स्ट्रक्शन देते तर कंपनी या कामगारांकडून गुराढोरासारखा काम करून घेते. नियमानुसार सर्व कामगारांना १०  तारखेच्या आत पगार झालाच पाहिजे. कायद्यामध्ये तरतूद असताना सुद्धा १३ तारीख  झाली तरी पगार नाही ,उद्या शनिवार ,रविवार आहे तो पगार पंधरा तारखेपर्यंत जाईल. जोपर्यंत कामगाराचा या महिन्यात पगार येत नाही तोपर्यंत आंदोलन सुरु राहील  असा इशारा संदीप गायकवाड यांनी कोणार्क कंपनीला दिला आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

अर्जेंटिना विरुद्ध जॉर्डन, फिफा विश्वचषक सामन्याचा निकाल: लिओनेल मेस्सीने इतिहास रचला कारण अर्जेंटिनाने जॉर्डनचा...

लिओनेल मेस्सी (इमेज क्रेडिट: एक्स) नवी दिल्ली : गतविजेत्या अर्जेंटिनाने शनिवारी जॉर्डनचा ३-१ असा पराभव करून तीन पैकी तीन विजय मिळवून गट फेरी...

सलमान खान कुटुंबाच्या समुद्राभिमुख वांद्रे निवासी प्रकल्पाला MCZMA ची मंजुरी मिळाली आहे

खान कुटुंबाने ग्राउंड-प्लस-स्टिल्ट-प्लस-सहा मजली निवासी इमारत बांधण्याचा प्रस्ताव ठेवला आहे ज्याचे एकूण बांधलेले क्षेत्र 1,014.11 चौरस मीटर आहे. मुंबई : वांद्रे (पश्चिम) येथे...

महाराष्ट्र खाजगी कंपन्यांच्या वार्षिक ऑडिट दरम्यान पॉश कायद्याचे पालन बंधनकारक करणार आहे

पुणे : कामाच्या ठिकाणी महिलांचा लैंगिक छळ (प्रतिबंध, प्रतिबंध आणि निवारण) कायदा, 2013 (पॉश कायदा) ची अंमलबजावणी मजबूत करण्याच्या उद्देशाने राज्य सरकारने...

सद्गुरु अवतरणे: सद्गुरुंनी दिलेला दिवसाचा अवतरण: “जीवनाच्या कोणत्याही क्षेत्रात, कोणीही ते जे करत आहेत...

खरे यश हे सद्गुरूंच्या मते केवळ प्रतिभा किंवा नशीबच नव्हे तर अटल भक्तीतून येते. तो यावर भर देतो की संयम आणि शिस्तीने चिन्हांकित...

‘मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा व्हावी’: केतन अग्रवालच्या कुटुंबीयांसह स्थानिकांचा पुण्यात कँडल मार्च; पहा | पुणे...

केतनचे कुटुंबीय आणि सोसायटीचे रहिवासी त्याला श्रद्धांजली वाहण्यासाठी आणि या प्रकरणातील आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यासाठी जमले होते, ज्याचा सध्या पोलिस तपास...

error: Content is protected !!