उल्हासनगर दि. २९ ( प्रमोद दळवी ) : गुरुपौर्णिमा निमित्त प्रत्येक जण आपल्या गुरुची भेट घेऊन त्यांना शुभेच्छा देत त्यांचा आशीर्वाद घेत असतात. उल्हासनगरातील शिवसेनेचे ज्येष्ठ नगरसेवक व शहरप्रमुख तसेच राजकीय गुरु म्हणून ओळखले जाणारे सर्वांचेच लाडके राजेंद्रसिंह भुल्लर (महाराज) यांना गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा देण्यासाठी शिवसेनेच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांची एकच गर्दी लाटली होती.

सर्वांनी आपल्या लाडक्या राजकीय गुरूंना गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा देत सत्कार करीत त्यांचा आशीर्वाद घेतला. त्यावेळी शिवसेना विभागप्रमुख प्रमोद पांडेय, विनोद साळेकर, उपविभाग प्रमुख विशाल आंबेकर, उपशहरप्रमुख जीतू उपाध्याय शाखा प्रमुख सुमित सिंह,वरिष्ठ वकील दीपक मिश्रा, उपविभाग प्रमुख मुन्ना खान आधी सर्वांनी राजकीय गुरू राजेंद्रसिंह भुल्लर (महाराज) यांना तुमचे मार्गदर्शन, आशीर्वाद आणि समाजसेवेची प्रेरणा सदैव आमच्यासाठी ऊर्जा देणारी आहे. तुमच्या नेतृत्वाखाली जनसेवेचा व शिवसैनिकत्वाचा प्रवास अधिक जोमाने सुरू राहो अशी प्रार्थना करीत त्यांचा आशीर्वाद घेतला.






























