मुंबई दि.६ ( प्रमोद दळवी ): नॅशनल कम्युनिटी भारत व ग्लोबल इंडिया मुंबई यांच्या वतीने अखंड भारत राष्ट्रीय गौरव सन्मान सोहळा मुंबई येथे मोठ्या उत्साहात पार पडला.

या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे सौ दीपा उदित नारायण मॅडम सुप्रसिद्ध हिंदी गायिका व मा.श्री. पहलाज निहलांनी सर (इंडियन फिल्म प्रोडूसर) व चेअरमन हिंदी फिल्म बोर्ड भारत सरकार व विविध चित्रपट क्षेत्रातील दिग्गज कलाकार यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये डॉ. व्ही व्ही पोपेरे (आदिवासी सेवक महाराष्ट्र शासन) तथा मराठी चित्रपट निर्माते व मराठी गायक यांना अखंड भारत गौरव राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्या कार्यक्रमांमध्ये विविध कलाकार विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रम मुंबई येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाला.





























