Homeशहरउल्हासनगरमध्ये विकासकामांना मिळाली गती : पॅनल ३ आणि ११ मधील विविध...

उल्हासनगरमध्ये विकासकामांना मिळाली गती : पॅनल ३ आणि ११ मधील विविध विकासकामांचे भूमिपूजन

  • दोन पॅनलमधील ५ कोटींहून अधिक रुपयांच्या विकास कामांचे भूमिपूजन

उल्हासनगर दि. ८ ( प्रमोद दळवी ): १४१ उल्हासनगर विधानसभेचे कार्यसम्राट आमदार कुमार आयलानी यांच्या प्रयत्नाने प्रभागातील विविध विकास कामे करण्यासाठी मूलभूत सुविधा अंतर्गत निधी मंजूर केला असून या विकास कामांचा शुक्रवारी भूमिपूजन सोहळा पार पडला. कुमार आयलानी यांच्या अथक प्रयत्नांमुळे शहरातील विविध विकास कामांना गती मिळत आहे. याच अनुषंगाने, आमदार कुमार आयलानी यांनी शुक्रवारी पॅनल क्रमांक ३ आणि पॅनल क्रमांक ११ मधील ५ कोटींहून अधिक रुपयांच्या विविध विकासकामांचे भूमिपूजन केले.

त्यावेळी पदपथ, गटार, काँक्रीटचे मार्ग, शेड, सामुदायिक सभागृह, सार्वजनिक शौचालये, सुशोभीकरण आणि सुरक्षा भिंती यांसारख्या अनेक विकासकामांचे भूमिपूजन करण्यात आले. आमदार कुमार आयलानी यांच्या अथक प्रयत्नांमुळे, सुमारे ५ कोटी रुपयांच्या मूलभूत सुविधा निधीतून ही सर्व कामे केली जात असून, परिसरातील नागरिकांना उत्तम सुविधा उपलब्ध होत आहेत.

या कार्यक्रमादरम्यान महायुतीची एकताही दिसून आली. भाजप आणि शिवसेनेचे अनेक अधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. याप्रसंगी आमदार कुमार आयलानी यांनी सांगितले की, येणाऱ्या काळात शहराच्या विविध भागांमध्ये आणखी विकास कामे सुरू केले जातील आणि त्याचे देखील भूमिपूजन होणार आहे. प्रत्येक नागरिकाला मूलभूत सुविधा मिळाव्यात आणि उल्हासनगर एक समृद्ध व विकसित शहर बनावे, यासाठी आपण आपले प्रयत्न सुरूच ठेवू, असे त्यांनी सांगितले. भाजप आणि शिवसेना सत्तेत असून सर्व नगरसेवक विकासाच्या भावनेने काम करत आहेत  ज्यामुळे शहराच्या विकासाला एक नवी ओळख मिळेल

या कार्यक्रमाला जिल्हाध्यक्ष राजेश वधारीया, उपमहापौर अमर लुंड, रवी जग्यासी, राजू जग्यासी, लाल पंजाबी, मनोहर खेमचंदानी, प्रीती विनोद माखिजा, कविता लाल पंजाबी, संजय घुगे, बिंदर भाई, प्रवीण क्रिसनानी, हरेश भाटिया, भुल्लर महाराज, साबिर शेख, प्रमोद पांडे, शोभाताई जाधव, मंडल अध्यक्ष अरविंद मिश्रा व इतर मान्यवर उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

मुंबई आणि पुण्यात पाणी साचल्याने सुप्रिया यांनी भाजपवर निशाणा साधला

बुधवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे शहरात सर्वत्र पाणी साचले आणि मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली. ताथवडे येथे मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने वाहनांची वाहतूक विस्कळीत...

इक्वेडोर विरुद्ध जर्मनी फिफा विश्वचषक 2026 मॅच हायलाइट्स: इक्वाडोर 2-1 जर्मनी; लवचिक इक्वाडोरने आळशी...

इक्वाडोर वि जर्मनी लाइव्ह स्कोअर: टीम न्यूज: जर्मनीसाठी मोठ्या तोफा परतल्या; Caicedo इक्वेडोर आघाडीवर आहेअधिकृत लाइनअप संपले आहेत आणि दोन्ही व्यवस्थापक आज रात्री कोणतेही...

एअरबॅग तैनातीमुळे मुंबईजवळ पार्क केलेल्या कारमध्ये 25 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला

स्टीयरिंग व्हील एअरबॅग केसिंग कथितपणे पीडितेला उच्च तीव्रतेने आदळले, ज्यामुळे गंभीर जखमा झाल्या आणि स्थिर वाहनाच्या आत प्राणघातक रक्तस्त्राव झाला मुंबई: मीरा रोड...

पीएमपीएमएल मान्सूनसाठी सज्ज नाही? 2 दिवसांच्या पावसामुळे 264 बस बिघडल्या

एफसी रोडवर नुकतीच तुटलेली पीएमपीएमएल बस क्रेनने ओढली आहे पुणे : पुण्यातील दोन दिवसांच्या मध्यम पावसाने पीएमपीएमएलच्या मान्सूनच्या तयारीचा अभाव उघड केला कारण...

मुंबई विरुद्ध नवी मुंबई: तुमचे ₹2 कोटींचे घर कोठे विकत मिळते? |

मुंबई विरुद्ध नवी मुंबई हा आजकाल घर खरेदीदारांसमोरील सर्वात मोठा गोंधळ आहे. मुंबई मेट्रोपॉलिटन रिजन (MMR) मधील अनेकांसाठी ₹2 कोटी हे बजेट...

error: Content is protected !!