Homeशहरउल्हासनगरकरांसाठी मोठी आरोग्यसेवा भेट : चार नवीन ॲम्ब्युलन्सचे लोकार्पण, अत्यल्प दरात मिळणार...

उल्हासनगरकरांसाठी मोठी आरोग्यसेवा भेट : चार नवीन ॲम्ब्युलन्सचे लोकार्पण, अत्यल्प दरात मिळणार आपत्कालीन सेवा

उल्हासनगर, दि. २१ ( प्रमोद दळवी )  : उल्हासनगर शहरातील नागरिकांच्या आरोग्य सेवेला अधिक बळकटी देण्याच्या उद्देशाने उल्हासनगर महानगरपालिका आरोग्य विभागाच्या वतीने चार नवीन अत्याधुनिक ॲम्ब्युलन्सचे लोकार्पण आज मोठ्या उत्साहात करण्यात आले. या उपक्रमामुळे शहरातील नागरिकांना अत्यल्प दरात, जलद, सुरक्षित आणि सुलभ ॲम्ब्युलन्स सेवा उपलब्ध होणार असून, आपत्कालीन आरोग्यसेवा अधिक सक्षम होणार आहे.

खासदार डॉ. श्रीकांत एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच माजी आमदार पप्पू कलानी यांनी निवडणुकीपूर्वी उल्हासनगरकरांना दिलेले आश्वासन आरोग्य सभापती सविता तोरणे रगडे यांनी प्रत्यक्षात पूर्ण करत ही महत्त्वपूर्ण सुविधा नागरिकांसाठी उपलब्ध करून दिली. या लोकार्पण सोहळ्याला महापौर अश्विनी कमलेश निकम, स्थायी समिती सभापती कुलवंत सिंग सोहता (बिट्टू भाई), आरोग्य सभापती सविता तोरणे रगडे, गटनेते राजेश वधारीया, शिक्षण सभापती साक्षी सुर्वे, प्रभाग समिती सभापती संगीता सपकाळे, ज्येष्ठ नगरसेवक दिलीप गायकवाड, जमनू पुरस्वानी, महेश सुखरामानी, टोनी शिरवानी, शेरी लुंड यांच्यासह महानगरपालिकेतील अनेक नगरसेवक, पदाधिकारी, शिवसैनिक आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

नवीन ॲम्ब्युलन्स सेवेमुळे अपघात, गंभीर आजार किंवा इतर आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांना वेळेत वैद्यकीय मदत मिळण्यास मोठी मदत होणार आहे. अत्यल्प दरात उपलब्ध होणाऱ्या या सेवेमुळे सर्वसामान्य नागरिकांवरील आर्थिक भारही कमी होणार असून, शहरातील आरोग्य यंत्रणा अधिक गतिमान आणि प्रभावी होईल, असा विश्वास उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केला. यावेळी समाजसेवक शिवाजी रगडे यांनी सांगितले की, उल्हासनगरच्या आरोग्य व्यवस्थेला अधिक सक्षम करण्यासाठी महानगरपालिका सातत्याने विविध सुविधा उपलब्ध करून देत आहे. नागरिकांना दर्जेदार, तत्पर आणि सुलभ आरोग्यसेवा मिळावी, हा प्रशासनाचा मुख्य उद्देश असून, चार नवीन ॲम्ब्युलन्सची भर पडल्याने शहरातील आपत्कालीन आरोग्य सेवेला मोठे बळ मिळणार आहे. या उपक्रमाचे नागरिकांकडून स्वागत करण्यात आले असून, शहराच्या आरोग्य सुविधांच्या उन्नतीच्या दृष्टीने हे महत्त्वपूर्ण पाऊल मानले जात आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

‘मला माफ करा’: अर्जेंटिनाचे सहाय्यक प्रशिक्षक रॉबर्टो आयला यांनी फिफा विश्वचषक फायनलनंतर माफी का...

नवी दिल्ली: अर्जेंटिनाचे सहाय्यक प्रशिक्षक रॉबर्टो अयाला यांनी फिफा विश्वचषक 2026 फायनलनंतर स्पेनचा मिडफिल्डर डॅनी ओल्मोशी झालेल्या वादाबद्दल माफी मागितली आहे आणि...

DCP म्हणून तोतयागिरी करणाऱ्या आणि लोकांना फसवणाऱ्या कॉनमनशी संगनमत केल्याबद्दल PSIला अटक मुंबई बातम्या

मुंबई: एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याची तोतयागिरी केल्याचा आणि अनेक पीडितांची अनेक वर्षांपासून फसवणूक केल्याचा आरोप असलेल्या कथित आरोपी मोहम्मद खतीब उर्फ ​​डॉ....

युद्धनौका INS मालवणचा शिवाजी महाराजांच्या सागरी वारशाचा वाघनख मानाचा सन्मान | पुणे बातम्या

पुणे : छत्रपती शिवाजी महाराजांनी वापरलेले प्रसिद्ध शस्त्र वाघनख आता बुधवारी कारवार येथील नौदल तळावर एअर चीफ मार्शल एपी सिंग यांनी नियुक्त...

उच्च कोलेस्टेरॉल नेहमीच शांत राहत नाही: 7 चेतावणी चिन्हे जे तुमचे डोळे, त्वचा आणि...

उच्च कोलेस्टेरॉलला "मूक रोग" असेही संबोधले जाते कारण समस्येची क्वचितच लक्षात येण्यासारखी चिन्हे असतात. अमेरिकन हार्ट असोसिएशन (एएचए) नुसार, एखाद्या व्यक्तीमध्ये कोलेस्ट्रॉलची उच्च पातळी...

राष्ट्रीय टेनिस महासंघाच्या EGM च्या आधी AITA ट्रस्ट लक्ष केंद्रित करते | पुणे बातम्या

पुणे: ऑल इंडिया टेनिस असोसिएशन (एआयटीए) एआयटीए ट्रस्टच्या "अपराधी" ऐवजी "बळी" असल्याचा दावा करून, हंगामी अध्यक्ष चिंतन पारीख म्हणाले की, फेडरेशन सप्टेंबरमध्ये...

error: Content is protected !!