उल्हासनगर दि .२० ( प्रमोद दळवी ) : सिंधी समाजाचे आराध्य दैवत चेटीचंड भगवान झुलेलाल यांच्या पवित्र जयंतीनिमित्त शहरात एका भव्य महायात्रेचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी आमदार कुमार आयलानी यांनी महायात्रेत सहभागी होऊन भगवान झुलेलाल यांचा आशीर्वाद घेतला

महायात्रेला शुक्रवारी कॅम्प १ मधील भाऊ परसराम झुलेलाल मंदिरापासून सुरुवात झाली. आमदार कुमार आयलानी यांनी मंदिराला भेट देऊन, भगवान झुलेलाल यांचे दर्शन घेतले आणि त्यांचे आशीर्वाद घेतले. त्यानंतर, ते महायात्रेत सामील झाले. ही यात्रा कॅम्प ५ मधील पूज्य चालिहा साहेब मंदिरा पर्यंत काढण्यात आली.

महायात्रेतील भगवान झुलेलाल यांचा प्रभावी आणि भव्य देखावा हे एक विशेष आकर्षण होते. पारंपरिक पोशाख परिधान करून, ढोल ताशे वाजवत नाचत गाजत आणि भक्तीगीते गात, मोठ्या संख्येने सिंधी समाजाच्या बांधवांनी उत्साहाने सहभाग घेतला.या प्रसंगी, आमदार कुमार आयलानी यांनी सिंधी समाजाला ‘चेटीचंड’च्या शुभेच्छा दिल्या आणि भगवान झुलेलाल सर्वांना जीवनात सुख शांती आणि समृद्धी देण्याची प्रार्थना केली.व समाजाची ऐक्य, संस्कृती आणि परंपरा जपण्याच्या प्रयत्नांची प्रशंसा केली.महायात्रेदरम्यान संपूर्ण मार्गावर भक्तिपूर्ण वातावरण होते आणि भक्तांनी प्रचंड उत्साह दाखवला.





























