Homeमहाराष्ट्रआपला परिसर प्लास्टिकमुक्त करण्याचा युवकांनी संकल्प करावा – राज्यपाल सी पी राधाकृष्णन

आपला परिसर प्लास्टिकमुक्त करण्याचा युवकांनी संकल्प करावा – राज्यपाल सी पी राधाकृष्णन

एक भारत श्रेष्ठ भारत‘ उपक्रमांतर्गत राजभवन येथे सिक्कीम राज्य स्थापना दिवस

मुंबई दि. १६ : प्लास्टिक कचऱ्याने परिसर विद्रुप होत आहेत. मात्र सिक्कीम देशातील सर्वाधिक कमी प्रमाणात प्लास्टिकचा वापर करणारे राज्य ठरले आहे. ही गोष्ट महाराष्ट्रासह इतर सर्व राज्यांसाठी अनुकरणीय असून युवकांनी किमान आपला परिसर प्लास्टिकमुक्त करण्याचा संकल्प केला तर देश अधिक सुजलाम सुफलाम होईल, असे प्रतिपादन राज्यपाल तथा राज्य विद्यापीठांचे कुलपती सी पी राधाकृष्णन यांनी केले.

सिक्कीम राज्याचा ५० वा राज्य स्थापना वर्धापन दिवस राज्यपाल राधाकृष्णन यांच्या प्रमुख उपस्थितीत राजभवन येथे साजरा झाला. ‘एक भारत श्रेष्ठ भारत‘ उपक्रमांतर्गत राजभवनातर्फे शिवाजी विद्यापीठाच्या सहकार्याने सिक्कीम राज्य स्थापना दिनाचे आयोजन करण्यात आले.साधारण तीन दशकांपूर्वी देशात प्लास्टिक – पॉलिथिन बॅग वापरण्याचे प्रचलन नव्हते. प्लास्टिक न वापरल्यामुळे कुणाचेही फारसे काम अडतही नव्हते. आज मात्र लोक खरेदीसाठी बाहेर जाताना कापडी पिशवी नेत नाही. प्रत्येक वस्तू प्लास्टिक बॅगमध्ये आणली जाते. या स्थितीचा विचार करून युवकांनी प्लास्टिकचा वापर कमी करावा व बाहेर पडताना नेहमी कापडी पिशवी सोबत बाळगावी असे आवाहन राज्यपालांनी यावेळी केली.

सिक्कीम व इतर उत्तरपूर्व राज्याचे सौंदर्य स्वित्झर्लंडपेक्षा तसूभर देखील कमी नाही. त्या देशापेक्षा कितीतरी पटीने नैसर्गिक सौंदर्य भारतात आहे. उत्तम मार्केटिंग मुळे  काही देश पर्यटनात पुढे गेले आहे.  लोकांनी सिक्कीमसह उत्तरपूर्व राज्ये तसेच जम्मू काश्मीर, हिमाचल प्रदेश या राज्यांना भेट द्यावी असे आवाहन राज्यपालांनी यावेळी केले.आज सिंगापूर व थायलंड जगातील सर्वाधिक पर्यटक आकर्षित करतात. भारतात नद्या, गडकिल्ले, वारसा शिल्पे व निसर्ग संपदा आहे आपण जगातील अर्धे पर्यटक आकर्षित करू शकतो असा विश्वास राज्यपालांनी यावेळी व्यक्त केला.

संपूर्ण देशातील लोकांमध्ये असलेल्या ऐक्याच्या भावनेमुळे ‘सिंदूर‘ मोहिम प्रभावी ठरली. लोकांनी एकता टिकवून ठेवली तर भारत विकसित राष्ट्र म्हणून उदयास येईल, असे राज्यपालांनी सांगितले.यावेळी शिवाजी विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांनी सिक्कीमचे लोकनृत्य  घोंटू व लोकगीत लेपचा तसेच सिक्कीमचे राज्यगीत उत्कृष्ट सादर केल्याबद्दल राज्यपालांनी विद्यार्थ्यांना कौतुकाची थाप दिली.

शिवाजी विद्यापीठाच्या कुलदीप जठार व श्रद्धा चराटकर या विद्यार्थ्यांनी रांगोळीच्या माध्यमातून सिक्कीम येथील तरुणीचे सुंदर चित्र साकारल्याबद्दल तसेच ओंकार गोमासे या विद्यार्थ्याने सिक्कीम येथील लोकजीवनाचे तैलचित्र काढल्याबद्दल राज्यपालांनी त्यांचे विशेष कौतुक केले. विद्यापीठाच्या वृत्तविद्या व जनसंवाद विभागातर्फे तयार करण्यात आलेला सिक्कीम राज्यावरील माहितीपट  ‘सिक्कीम या पॅराडाईज ऑफ इंडिया‘ यावेळी दाखविण्यात आला.राज्यपालांचे सचिव डॉ प्रशांत नारनवरे यांनी प्रास्ताविक व स्वागत केले तर अवर सचिव सुशील  मोरे यांनी  आभार मानले. कार्यक्रमाला शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरु प्रा. डॉ. डी. टी. शिर्के, प्र-कुलगुरु पी. एस. पाटील, कुलसचिव डॉ. व्ही. एन. शिंदे, व्यवस्थापन समितीचे सदस्य तसेच विद्यापीठाच्या सांस्कृतिक चमूचे सदस्य उपस्थित होते.राज्यपालांच्या हस्ते कार्यक्रमामध्ये उत्कृष्ट कला सादरीकरण केल्याबददल विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

नेमारने स्कॉटलंडविरुद्ध ऐतिहासिक पुनरागमन केल्यानंतर ब्राझीलच्या दुर्मिळ विश्वचषकात पेलेशी बरोबरी केली

मियामी गार्डन्स, फ्ला., बुधवार, 24 जून 2026 रोजी स्कॉटलंड आणि ब्राझील यांच्यातील विश्वचषक गट सी सॉकर सामन्यानंतर ब्राझीलचा नेमार (10) साजरा करत आहे....

मुंबई लोकलमध्ये हत्या: पोलिसांनी आरोपी रोशन सुवर्णाचा कसा माग काढला

मुंबई लोकल ट्रेनच्या दरवाजाच्या वादातून २१ वर्षीय तरुणाची हत्या केल्याचा आरोप मुंबई: मुसळधार पावसात रेल्वेचा दरवाजा बंद ठेवण्यावरून झालेल्या वादाने मुंबईच्या उपनगरीय रेल्वे...

अण्णा हजारे 5 जुलैच्या उपोषणावर ठाम; सीआयसीने म्हटले आहे की चर्चेची आणखी एक फेरी...

महाराष्ट्र सरकारने आरटीआयचे नवीन नियम मागे न घेतल्यास 5 जुलैपासून बेमुदत उपोषण करण्याचा इशारा ज्येष्ठ कार्यकर्ते अण्णा हजारे यांनी दिला आहे. पुणे :...

मालदीव, स्वित्झर्लंड किंवा बाली परवडत नाही? हे 6 बजेट-अनुकूल पर्याय वापरून पहा

आपल्या सर्वांनाच आपल्या स्वप्नातील गंतव्यस्थानी प्रवास करायचा आहे, परंतु काहीवेळा याचा अर्थ खिशात छिद्र पाडणे होय. मालदीव, स्वित्झर्लंड, दुबई आणि बाली सारखी ठिकाणे नेहमी...

2,004 कॉल, 238 तास आणि 1 अंतिम ‘सिग्नल’: युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळावर केतन अग्रवालच्या...

पुणे ग्रामीण पोलिसांचे म्हणणे आहे की रिअल इस्टेट व्यावसायिक केतन अग्रवाल यांच्या मृत्यूमागील कथित षडयंत्र अनेक महिन्यांच्या गुप्त संवाद, अनेक बैठका आणि त्यांना...

error: Content is protected !!