Homeशहरआंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त ज्ञानगंगा एज्युकेशन ट्रस्टच्या पदवी महाविद्यालयात योगाभ्यास कार्यक्रम उत्साहात संपन्न

आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त ज्ञानगंगा एज्युकेशन ट्रस्टच्या पदवी महाविद्यालयात योगाभ्यास कार्यक्रम उत्साहात संपन्न

कल्याण दि. २० ( प्रमोद दळवी ) : आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या निमित्ताने ज्ञानगंगा एज्युकेशन ट्रस्टचे कला, वाणिज्य व विज्ञान पदवी महाविद्यालय येथे योगाभ्यास कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. राष्ट्रीय सेवा योजना (NSS) विभाग व क्रीडा समिती यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमास विद्यार्थी, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी तसेच NSS स्वयंसेवकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

कार्यक्रमाची सुरुवात सामूहिक योगाभ्यासाने झाली. प्रशिक्षक रसिका कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली विविध योगासने, प्राणायाम आणि ध्यानधारणा यांचा सराव करण्यात आला. योगामुळे शारीरिक तंदुरुस्ती, मानसिक स्वास्थ्य आणि एकाग्रता वाढण्यास मदत होते, याविषयी उपस्थितांना मार्गदर्शन करण्यात आले.

महाविद्यालयाच्या प्राचार्या सौ. भाविका करकेरा, राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी – *ऋतुराज कोचीरकर, क्रीडा संचालक आलोक पांडे तसेच प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहाने योगाभ्यासात सहभाग घेतला. यावेळी नियमित योगाभ्यासाचे महत्त्व आणि निरोगी जीवनशैलीसाठी योगाची उपयुक्तता यावर विशेष भर देण्यात आला. राष्ट्रीय सेवा योजना स्वयंसेवकांनी कार्यक्रमाच्या आयोजनात सक्रिय सहभाग घेतला. योग दिनानिमित्त आयोजित या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये आरोग्य, शिस्त आणि सकारात्मक जीवनमूल्यांविषयी जागरूकता निर्माण झाली.

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी राष्ट्रीय सेवा योजना विभाग, क्रीडा समिती तसेच महाविद्यालयातील सर्व शिक्षक व कर्मचाऱ्यांनी विशेष सहकार्य केले. उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झालेल्या या कार्यक्रमातून “निरोगी वार्धक्यासाठी योग” (Yoga for Healthy Aging) हा संदेश प्रभावीपणे विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यात आला.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

नेदरलँड्स विरुद्ध स्वीडन फिफा विश्वचषक सामन्याचा निकाल: ह्यूस्टनमध्ये 5-1 विजयासह ब्रॉबी आणि गॅकपोने ओरांजेला...

नेदरलँड्सचा कोडी गकपो (11) नेदरलँड्स आणि स्वीडन यांच्यात शनिवारी, 20 जून, 2026 रोजी ह्युस्टन येथे झालेल्या विश्वचषक गट एफ सॉकर सामन्यात आपल्या संघाचा...

अनुपम खेर: आपण अशा काळात जगतो जेव्हा आपल्या आत्म्यालाही चांगले वाटणे आवश्यक असते |...

ज्येष्ठ अभिनेते अनुपम खेर यांनी संगीता बाबानी यांच्या 'सोलर इन फुल ब्लूम' या सार्वजनिक कला प्रतिष्ठानचे जुहू, मुंबई येथे उद्घाटन केले. या मालिकेत...

विलीन झालेल्या भागातील रहिवासी पर्यायी दिवसाच्या वेळापत्रकानुसार दररोज एक तास पाणीपुरवठ्यासाठी दाबतात

नळ कोरडे पडत असल्याने शहराच्या काही भागात खाजगी पाण्याच्या टँकरवर अवलंबून राहण्याचे प्रमाण वाढले आहे पुणे : पुण्याच्या विलीन झालेल्या भागातील रहिवासी आणि...

कोडी गकपो: नेदरलँड्सचा फुटबॉलपटू कोडी गॅकपोची मैत्रीण नोआ व्हॅन डर बिज: त्यांचे नाते, कुटुंब...

फोटो: कोडी गॅकपो/ इंस्टाग्राम नेदरलँड्सचा फुटबॉलपटू कोडी गॅकपो मैदानावरील त्याच्या उत्कृष्ट कामगिरीसाठी ओळखला जातो. पण खेळपट्टीपासून दूर, गॅकपो त्याच्या दीर्घकालीन जोडीदार, डच मॉडेल...

एमआयडीसी हद्दीबाहेरील औद्योगिक क्षेत्रांनाही पाण्याची समस्या भेडसावते | पुणे बातम्या

पिण्याच्या उद्देशाने, लहान उत्पादक 20-लिटर पाण्याच्या कॅनवर अवलंबून असतात पुणे : एमआयडीसी क्षेत्राबाहेरील औद्योगिक क्लस्टर्सना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे, ज्यामुळे नगरपालिका क्षेत्रांमध्ये...

error: Content is protected !!