- शौचालय, मंदिर आणि महिला बचतगट भवनाच्या कामांना सुरुवात
- अरुण आशान हे सामाजिक क्षेत्राच्या कामामध्ये सदैव आघाडीवर- नाना बागुल
उल्हासनगर दि. १५ ( प्रमोद दळवी ) : शिवसेनेचे कल्याण उपजिल्हाप्रमुख आणि माजी नगरसेवक अरुण आशान त्यांच्या वाढदिवसानिमित्त प्रभाग १४ मध्ये अनेक महत्त्वाच्या विकास कामांचे भूमिपूजन करण्यात आले. तसेच सरकारी रुग्णालयात रुग्णांना फळ वाटप करून सामाजिक उपक्रम ही राबविण्यात आला.

उल्हासनगर कॅम्प -४ येथे इंद्रानगर मध्ये नवीन शौचालयाच्या बांधकामाचे भूमिपूजनाचा कार्यक्रम झाला . या कामामुळे स्थानिक नागरिकांनी समाधान व्यक्त करत अरुण आशान याचे आभार मानले आहे. त्यावेळी ओटी चौकातील जय झुलेलाल प्रवेशद्वाराच्या नूतनीकरणाचे कामाचे भूमिपूजन करण्यात आले. भीम कॉलनी येथे महिला बचतगट भवनाच्या बांधकामाचा शुभारंभ माजी महापौर लिलाबाई आशान यांच्या हस्ते संपन्न झाला. मराठा सेक्शन परिसरात शितला माता मंदिर बांधकामासाठी चाळीस लाखाच्या निधीच्या कामाची भूमिपूजन करण्यात आले. वाढदिवसानिमित्त शिवसेना युवानेते माणिक सावंत आणि कार्यकर्त्यांनी सरकारी रुग्णालयात रुग्णांना फळ वाटप करून सामाजिक बांधिलकी जपली. माजी नगरसेवक अरुण आशान यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्यासाठी शहरातील राजकीय, सामाजिक आणि व्यापारी वर्गातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

माजी नगरसेवक अरुण आशान यांनी सांगतले १४ नोव्हेंबर या दिवशी माझ्या वाढदिवसाच्या निमित्त वार्डामध्ये खूप सारे विकास कामे होत आहेत. आज ज्या ज्या ठिकाणी कामे होत आहेत ती काम खरं म्हटलं तर नव्याने पुन्हा आपण करत आहोत. काही वर्षांपूर्वी संपूर्ण या प्रभागाला प्रवेशद्वार देऊन आपण नामकरण केले होते. त्या नामकरणाचाच भाग म्हणून आज साई झुलेलाल चौक असं करायचं होतं परंतु लोकांनी सांगितलं की या ठिकाणी सिंधी वसाहत जास्त आहे त्यामुळे झुलेलाल प्रवेशद्वार असे या मार्गिकाचे प्रवेशद्वार उभारावे. हे प्रवेशद्वार पूर्वी मा. महापौर लिलाबाई आशान यांच्या प्रयत्नांमुळे त्या ठिकाणी उभारले गेले होते. आज मला वाटतं नव्याने पुन्हा त्याचं नूतनीकरण करण्याच्या कामाचा मुहूर्त लागलेला आहे व मला माझ्या वाढदिवसानिमित्त सगळ्या थोर मंडळीनी शुभेच्छा दिल्या त्यांचे पण मी आभार मानतो असे अरुण आशान म्हणाले.

उल्हासनगर मध्ये अरुण आशान यांच्या वाढदिवसानिमित्त आसारामजी सावंत फाउंडेशनच्या वतीने मध्यवर्ती हॉस्पिटलमध्ये फळ वाटपाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. सामाजिक क्षेत्राच्या कामामध्ये सदैव अरुण आशान हे आघाडीवर असतात. मध्यवर्ती हॉस्पिटलला बरीच शासकीय मदत देण्यामध्ये अरुण आशान यांचा सिंहाचा वाटा आहे. राजकीय क्षेत्रामध्ये चांगल्या पद्धतीची पकड असलेला हा कार्यकर्ता शहरांमध्ये कुठल्याही राजकीय लोकांसोबत त्याचं तू तू मै मै वाजलं असं मी कधीच ऐकलं नाही असे नाना बागुल म्हणाले . तसेच सगळ्यांशी प्रेमाने मनमिळावू बंधूभावाने वागणारा हा कार्यकर्ता निश्चितच भविष्यामध्ये मोठा होईल ,मोठ्या माणसांचा सदैव आशीर्वाद घेणारा नम्र असणारा कार्यकर्ता, नम्र व्यक्ती निश्चितच प्रगतीपथावर जातो मी रिपब्लिकन पार्टी ऑफ उल्हासनगर शहर जिल्ह्याच्या वतीने शहरातल्या नागरिकांच्या वतीने अरुण आशान यांना लाख लाख शुभेच्छा देतो असे नाना बागुल म्हणाले.





























