Homeशहरअंबरनाथ मध्ये "सूर हरपले" आशा भोसले यांना आदरांजली

अंबरनाथ मध्ये “सूर हरपले” आशा भोसले यांना आदरांजली

अंबरनाथ दि. २१ ( प्रमोद दळवी ): अंबरनाथ मध्ये अंबर भरारी, सांस्कृतिक कला मंच, रोटरी क्लब ऑफ अंबरनाथ ईस्ट, इनरव्हील क्लब ऑफ अंबरनाथ, एक्स सर्विसमन असोसिएशन, योगिनी महिला मंडळ, तसेच हेरंब सेवा समिती या सर्व संस्थांनी मिळून संगीत पार्क येथे सोमवारी सायंकाळी ७.००  वाजता ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्याकरिता ‘सूर हरपले’ या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.

सर्वप्रथम अंबरनाथ संगीत सभेचे अध्यक्ष प्रसाद मुदवेडकर माजी नगराध्यक्ष सुनील चौधरी ,श्रीनिवास वाल्मीकि,डॉ गणेश राठोड़, मोहन कुलकर्णी, दुबे यांनी प्रास्ताविक करून या कार्यक्रमाची सुरुवात केली. त्यानंतर सर्व संस्थांच्या अध्यक्षांनी आशा भोसले यांच्या विषयी दोन शब्द बोलून त्यांना श्रद्धांजली वाहिली. उपस्थित रसिकांमधून मनोहर दांडेकर, नीलिमा जोशी, विम्मी खन्ना, वैशाली कुलकर्णी, रचना दलाल, श्रीकांत कर्वे, प्राची परांजपे, सुधाकर वनगे व अनेकांनी आशा भोसले यांनी गायलेली गाणी सादर केली.  प्रमोद रानडे , श्रीमती सुरेखा कुलकर्णी यांनी  त्यांच्या आठवणींना उजाळा दिला. निखिल चौधरी यांनी आभार प्रदर्शन करून आशाताईंचे गीत सादर केले .

या संपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन करणारे अंबरनाथचे माजी नगराध्यक्ष सुनील चौधरी यांनी सर्व संस्थांना एकत्र आणून हा कार्यक्रम आयोजित केला. संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रज्वल मुदवेडकर यांनी केले. या कार्यक्रमास अंबर भरारीचे डॉ. गणेश राठोड , दत्ता घावट तसेच हेरंब सेवा समितीचे अभय सोमण व इतर मान्यवर उपस्थित होते .या श्रद्धांजली कार्यक्रमास अंबरनाथकरांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

ट्रीटमेंट प्लांटमधील देखभाल दुरुस्तीसाठी गुरुवारी पाणीकपात करण्यात आली

पुणे: पुणे महापालिकेने पर्वती, वडगाव, लष्कर, वारजे आणि भामा आसखेडसह प्रमुख जलशुद्धीकरण केंद्रांवर तातडीने विद्युत, पंपिंग आणि नागरी देखभाल करण्यासाठी गुरुवारी पाणीकपात जाहीर केली...

भाजपला बीएमसी वॉर्ड फंड, शेंगदाण्यांविरुद्धचा भरपूर प्रसार

मुंबई : नगरसेवकांच्या अर्थसंकल्पीय वाटपाच्या ताज्या फेरीत सत्ताधारी भाजपमधील प्रभाग समिती निधी वाटपात कमालीची तफावत दिसून आली आहे, जरी विरोधी सदस्यांना किरकोळ...

पीएमपीएमएलने अपघातग्रस्तांच्या नातेवाईकांना 85 लाख देण्याचे निर्देश दिले

पुणे: PMPML ला मोटार अपघात दावा न्यायाधिकरणाने (MACT) 21 ऑगस्ट 2023 रोजी अपघातात मृत्युमुखी पडलेल्या एका वरिष्ठ लॅब टेक्निशियनच्या पतीला आणि दोन मुलींना 85.4...

IPL 2026: अभिषेक शर्माच्या नजरेत मोठा SRH मैलाचा दगड आहे, त्याला 59 धावांची गरज...

एसआरएचचा सलामीवीर अभिषेक शर्मा (पीटीआय फोटो) सनरायझर्स हैदराबादचा स्फोटक सलामीवीर अभिषेक शर्मा आयपीएल 2026 मध्ये राजीव गांधी इंटरनॅशनल स्टेडियमवर दिल्ली कॅपिटल्सचा सामना करण्यासाठी...

तुमचे ओमेगा-३ सप्लिमेंट कदाचित काम करत नसेल: खऱ्या फायद्यांसाठी ते घेण्याचा योग्य मार्ग

ओमेगा-३ सप्लिमेंट्स हृदय, मेंदू आणि प्रक्षोभक आरोग्यास समर्थन देऊ शकतात, परंतु विचारपूर्वक वापरल्यासच. ते विशिष्ट गटांसाठी उत्तम काम करतात, ते चरबीयुक्त जेवणासोबत घेतले पाहिजेत...

error: Content is protected !!