Homeशहरअंबरनाथकरांना मेट्रोचे गिफ्ट

अंबरनाथकरांना मेट्रोचे गिफ्ट

– चिखलोली येथे होणार रेल्वे मेट्रो इंटिग्रेशन

– कल्याण बदलापूर रस्त्याला धावणार मेट्रो

– खासदार डॉ.श्रीकांत एकनाथ शिंदे यांच्या एमएमआरडीएला विकास आराखडा तयार करण्याच्या सूचना

कल्याण  दि. १३:- ठाणे-भिवंडी-कल्याण मेट्रो ५ प्रकल्प विस्तार करून आता दुर्गाडी नाका ते कल्याणमार्गे उल्हासनगरच्या कल्याण बदलापूर मार्गाने थेट अंबरनाथ आणि बदलापूर दरम्यान उभे राहत असलेल्या चिखलोली रेल्वे स्थानकापर्यंत पोहचणार आहे. यामुळे अंबरनाथ, उल्हासनगर आणि आजूबाजूच्या परिसरातील रहिवाशांना मेट्रोचा थेट लाभ मिळणार असून, चिखलोली हे स्थानक एक प्रमुख ट्रान्सपोर्ट हब म्हणून उदयास येणार आहे. बदलापूर – कांजूरमार्ग मेट्रो १४ च्या माध्यमातून अंबरनाथ,बदलापूर आणि आसपासच्या नागरिकांना थेट मुंबई गाठता येणार आहे. तर मेट्रो ५च्या या विस्तारामुळे नागरिकांना ठाणे गाठणे सोपे होणार आहे.

विशेष म्हणजे, चिखलोली रेल्वे स्थानकाच्या येथे रेल्वे आणि मेट्रोचे एकत्रीकरण होणार असल्यामुळे प्रवास सुलभ व सुसंगत होईल. यासाठी स्थानकाची तशा पद्धतीने उभारणी करण्यात येणार असून याबाबतचा सविस्तर विकास आराखडा एमएमआरडीएला तयार करण्याच्या सूचना कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ.श्रीकांत एकनाथ शिंदे यांनी दिल्या आहेत. एमएमआरडीएच्या मुख्यालयात याबाबत शुक्रवारी बैठक पार पडली. यावेळी खासदार डॉ.शिंदे यांनी या सूचना केल्या आहेत. याबाबत अंबरनाथ विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉ.बालाजी किणीकर यांनी याबाबत मागणी देखील केली होती.

कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ.श्रीकांत एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून मतदारसंघात वाहतुकीला नवा आयाम देणारे विविध प्रकल्प राबविण्यात येत आहे. रस्ते, मेट्रो, उड्डाणपूल यांची सुसज्जता ठेवण्यास खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांचे विशेष प्रयत्न आहे. याच पार्श्वभूमीवर ठाणे जिल्ह्यासह कल्याण लोकसभा मतदारसंघाच्या वाहतूक वेगवान होण्याच्या दृष्टीने मेट्रो ५ चा विस्तार आता या भागातील विकासाचे नवे दालन उघडणारे ठरणार आहेत. ठाणे-भिवंडी-कल्याण मेट्रो ५ हा प्रकल्प आता दुर्गाडी नाका ते कल्याणमार्गे उल्हासनगरच्या कल्याण बदलापूर मार्गाने थेट अंबरनाथ आणि बदलापूर दरम्यान उभे राहत असलेल्या चिखलोली रेल्वे स्थानकापर्यंत पोहचणार आहे. या मार्गावर बिर्ला कॉलेज, शहाड, आणि उल्हासनगर यांसारख्या महत्त्वाच्या भागांचा समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे या भागातील हजारो नागरिकांना थेट दारात मेट्रोची दारात सेवा मिळणार आहे. तर कल्याण-बदलापूर रस्त्यावरून मेट्रो धावल्याने वाहतूक कोंडीत मोठा दिलासा मिळेल. नागरिकांचा प्रवासाचा वेळ वाचेल, लोकल ट्रेनवरील ताण कमी होईल, आणि पर्यावरणपूरक पर्यायामुळे प्रदूषणावरही नियंत्रण मिळेल. शिवाय, या मेट्रो स्थानकांच्या आजूबाजूला वाणिज्य, सेवा उद्योग आणि रोजगाराच्या संधी मोठ्या प्रमाणात निर्माण होतील. एकूणच या मेट्रो प्रकल्पांचा उद्देश फक्त वाहतूक सुधारणा नव्हे, तर एकत्रित नागरी विकास साधण्याचा आहे.

सध्या या मेट्रो प्रकल्पाचे विस्तृत प्रकल्प अहवाल तयार करण्यात येत असून, लवकरच यासाठी निविदा प्रक्रिया सुरू होणार आहे. हा मेट्रो प्रकल्प म्हणजे कल्याण, अंबरनाथ, उल्हासनगर, शहाड आणि चिखलोली या भागांच्या विकासाचा रोडमॅप ठरणार असून, ‘एक शहर एक मेट्रो नेटवर्क’ या संकल्पनेची सुरुवात यामुळे प्रत्यक्षात होणार आहे. याबाबतचा सविस्तर विकास आराखडा एमएमआरडीएला तयार करण्याच्या सूचना कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ.श्रीकांत एकनाथ शिंदे यांनी दिल्या आहेत. एमएमआरडीएच्या मुख्यालयात याबाबत शुक्रवारी बैठक पार पडली.

यावेळी खासदार डॉ.शिंदे यांनी या सूचना केल्या आहेत. यावेळी बैठकीला आमदार डॉ.बालाजी किणीकर, आमदार राजेश मोरे, जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे, रवी पाटील, राजेश कदम यांच्यासह एमआरडीए आयुक्त डॉ.संजय मुखर्जी, अतिरिक्त आयुक्त विक्रम कुमार, अश्विन मुदगल यांच्यासह विविध अधिकारी उपस्थित होते.

प्रतिक्रिया

बदलापूर आणि अंबरनाथ शहरातून मुंबई आणि ठाणे येथे प्रवास करणाऱ्या नागरिकांची संख्या मोठी आहे. यामुळे या दोन्ही स्थानकांवर मोठ्या प्रमाणात गर्दीचा ताण येतो. हा ताण कमी करण्यासाठी दोन्ही शहराच्या मध्यभागी चिखलोली रेल्वे स्थानकाची उभारणी करण्यात येत आहे. या दरम्यान आता मेट्रोची देखील चिखलोली रेल्वे स्थानकातून द्विस्तरीय वाहतूक झाल्याने गर्दीचा ताण अधिक कमी होणार आहे. याच हेतून येथून मेट्रो चालविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

– डॉ.श्रीकांत एकनाथ शिंदे, खासदार, कल्याण लोकसभा

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

अर्जेंटिना विरुद्ध जॉर्डन, फिफा विश्वचषक सामन्याचा निकाल: लिओनेल मेस्सीने इतिहास रचला कारण अर्जेंटिनाने जॉर्डनचा...

लिओनेल मेस्सी (इमेज क्रेडिट: एक्स) नवी दिल्ली : गतविजेत्या अर्जेंटिनाने शनिवारी जॉर्डनचा ३-१ असा पराभव करून तीन पैकी तीन विजय मिळवून गट फेरी...

सलमान खान कुटुंबाच्या समुद्राभिमुख वांद्रे निवासी प्रकल्पाला MCZMA ची मंजुरी मिळाली आहे

खान कुटुंबाने ग्राउंड-प्लस-स्टिल्ट-प्लस-सहा मजली निवासी इमारत बांधण्याचा प्रस्ताव ठेवला आहे ज्याचे एकूण बांधलेले क्षेत्र 1,014.11 चौरस मीटर आहे. मुंबई : वांद्रे (पश्चिम) येथे...

महाराष्ट्र खाजगी कंपन्यांच्या वार्षिक ऑडिट दरम्यान पॉश कायद्याचे पालन बंधनकारक करणार आहे

पुणे : कामाच्या ठिकाणी महिलांचा लैंगिक छळ (प्रतिबंध, प्रतिबंध आणि निवारण) कायदा, 2013 (पॉश कायदा) ची अंमलबजावणी मजबूत करण्याच्या उद्देशाने राज्य सरकारने...

सद्गुरु अवतरणे: सद्गुरुंनी दिलेला दिवसाचा अवतरण: “जीवनाच्या कोणत्याही क्षेत्रात, कोणीही ते जे करत आहेत...

खरे यश हे सद्गुरूंच्या मते केवळ प्रतिभा किंवा नशीबच नव्हे तर अटल भक्तीतून येते. तो यावर भर देतो की संयम आणि शिस्तीने चिन्हांकित...

‘मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा व्हावी’: केतन अग्रवालच्या कुटुंबीयांसह स्थानिकांचा पुण्यात कँडल मार्च; पहा | पुणे...

केतनचे कुटुंबीय आणि सोसायटीचे रहिवासी त्याला श्रद्धांजली वाहण्यासाठी आणि या प्रकरणातील आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यासाठी जमले होते, ज्याचा सध्या पोलिस तपास...

error: Content is protected !!