Homeशहर"१०० दिवसांची कार्यालयीन सुधारणा विशेष मोहीम" : महापालिका अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या योगदानाचा सन्मान

“१०० दिवसांची कार्यालयीन सुधारणा विशेष मोहीम” : महापालिका अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या योगदानाचा सन्मान

  • यशाचा आनंद सामूहिकपणे साजरा
  • महापालिका अधिकारी/कर्मचाऱ्याना पुष्पगुच्छ, ट्रॉफी व प्रमाणपत्र देऊन सत्कार

उल्हासनगर दि १२ : मा. मुख्यमंत्र्यांनी हाती घेतलेल्या “१०० दिवसांची कार्यालयीन सुधारणा विशेष मोहीम” राज्य, जिल्हा व तालुका स्तरावर १२,५०० शासकीय कार्यालयांमध्ये यशस्वीपणे राबविण्यात आली होती. त्याअन्वये उल्हासनगर महानगरपालिका मा. प्रशासक तथा आयुक्त सौ. मनिषा आव्हाळे (भा.प्र.से.) यांच्या मार्गदर्शनाखाली “१०० दिवसांची कार्यालयीन सुधारणा विशेष मोहीम उल्हासनगर महानगरपालिकेत राबविण्यात आली होती. मा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सदर मोहिमेत उल्हासनगर महानगरपालिकेची प्रथम क्रमांकाने निवड झाल्याचे घोषीत केले होते.

या यशामागे सर्व महापालिका अधिकारी/कर्मचाऱ्यांची विशेष योगदान, निष्ठा, शिस्तबद्ध कार्यपद्धती आणि परिश्रम कारणीभूत आहेत. या अभिमानास्पद कामगिरीच्या निमित्ताने, महापालिकेतील सर्व कर्मचाऱ्यांच्या योगदानाचा सन्मान करण्यासाठी व या यशाचा आनंद सामूहिकपणे साजरा करण्यासाठी मा. महापालिका प्रशासक तथा आयुक्त यांच्या मार्गदर्शनाखाली गुरूवार, सकाळी ११:३० वाजता “गुणगौरव सोहळ्याचे व भोजनाचे” आयोजन महापालिका सभागृहात करण्यात आले.

सदर कार्यक्रमात डॉ. विजय खेडकर, उप आयुक्त, श्री. ललित खोब्रागडे, नगररचनाकार, श्री. विनोद केणे, वाहन विभाग/परिवहन विभाग प्रमुख यांनी सदर मोहिमेसंदर्भात आलेले आपले अनुभव व मनोगत व्यक्त केले. तसेच उल्हासनगर महानगरपालिकेच्या नगररचना विभागास आय.एस.ओ. प्रमाणपत्र प्राप्त झाल्याबद्दल महापालिका प्रशासक तथा आयुक्त सौ. मनिषा आव्हाळे (भा.प्र.से.) यांनी नगररचनाकार श्री. ललित खोब्रागडे यांचा सत्कार केला व त्यांना शुभेच्छा दिल्या. त्यानंतर सदर मोहिमेत महत्वपूर्ण योगदान दिल्याबद्दल महापालिका आयुक्तांनी सर्व विभाग प्रमुखांचा पुष्पगुच्छ, ट्रॉफी व प्रमाणपत्र देऊन सत्कार केला. तसेच मा. महापालिका प्रशासक तथा आयुक्त यांचे स्विय सहायक श्री. प्रकाश तरे, अतिरिक्त आयुक्त यांचे स्विय सहायक श्री. किशोर पालवे यांचा देखील सत्कार करण्यात आला.

सदर कार्यक्रमाचे सुत्रसंचालन श्री. अजय साबळे, सहा. आयुक्त तथा जनसंपर्क अधिकारी व सौ. प्राजक्ता कुलकर्णी, महापालिका सचिव यांनी केले. सदर कार्यक्रमास महापालिका प्रशासक तथा आयुक्त सौ. मनिषा आव्हाळे (भा.प्र.से.), अतिरिक्त आयुक्त डॉ. किशोर गवस, उप-आयुक्त श्रीम. दिपाली चौगले, उप-आयुक्त डॉ. विजय खेडकर, उप-आयुक्त श्री. अनंत जवादवार, उप-आयुक्त श्रीम. स्नेहा कर्पे, मुख्य लेखा अधिकारी श्री. किरण भिलारे, मुख्य लेखा परीक्षक श्री. शरद देशमुख, सहा. आयुक्त (१) तथा जनसंपर्क अधिकारी श्री. अजय साबळे, सहा. आयुक्त श्री. सुनिल लोंढे, सहा. आयुक्त श्रीम. मयुरी कदम, सहा. आयुक्त श्री. विशाल कदम, नगररचनाकार श्री. ललित खोब्रागडे, प्र. शहर अभियंता तथा कार्यकारी अभियंता (विद्युत) श्री. हनुमंत खरात, कार्यकारी अभियुता (पा.पु.वि.) श्री. अशोक घुले, उप अभियंता (सा.बां.वि.) श्री. संदीप जाधव, वैद्यकीय आरोग्य अधिकारी श्रीम. मोहिनी धर्मा, महापालिका सचिव सौ. प्राजक्ता कुलकर्णी, लेखा अधिकारी श्री. संजय वायदंडे, उप मुख्य लेखा अधिकारी श्री. विलास नागदिवे, सहा. आयुक्त प्रभाग समिती क्र.१ सौ. अलका पवार, सहा. आयुक्त प्रभाग समिती क्र.२ श्री. मनिष हिवरे, सहा. आयुक्त प्रभाग समिती क्र.३ श्रीम. सलोनी निवकर, सहा. आयुक्त प्रभाग समिती क्र.४ श्री. गणेश शिंपी, अग्निशमन विभाग प्रमुख श्री. सुरेश बोंबे, वाहन/परिवहन विभाग प्रमुख श्री. विनोद केणे, सिस्टम अॅनालिस्ट श्रीम. श्रध्दा बाविस्कर, महापालिका सचिव सौ. प्राजक्ता कुलकर्णी, अभिलेखा विभाग प्रमुख श्री. अच्युत सासे, महिला व बालकल्याण विभाग प्रमुख श्री. नितेश रंगारी, दि.क.यो. विभाग प्रमुख श्री. राजेश घनघाव, क्रीडा विभाग प्रमुख श्री. शांतराम चौधरी, सुरक्षा विभाग प्रमुख श्री. यशवंत सगळे, विधी विभाग प्रमुख श्री. राजा बुलानी, भांडार विभाग प्रमुख श्री. अंकुश कदम, परिवहन विभाग प्रमुख श्री. दत्तात्रय जाधव, मालमत्ता विभाग प्रमुख श्रीम. छाया डांगळे, आधार/जनगणना विभाग प्रमुख श्री. अनिल खतुरानी, मुख्य स्वच्छता निरीक्षक श्री. एकनाथ पवार, अधिकक्ष श्री. मधुरा केणी व इतर अधिकारी/कर्मचारी बहुसंख्येने उपस्थीत होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

शुभमन गिलने फिफा वर्ल्ड कपमध्ये फुटबॉल दिग्गज रोनाल्डिन्होला भेटले, फोटो व्हायरल झाला

शुभमन गिल आणि रोनाल्डिन्हो (एजन्सी इमेज) भारताचा कर्णधार शुभमन गिलने युनायटेड स्टेट्समध्ये फिफा विश्वचषक 2026 दरम्यान ब्राझीलचा फुटबॉल आयकॉन रोनाल्डिन्हो गौचोला भेटताना क्रिकेटच्या...

मोठ्या सवलतीच्या खरेदीसाठी मुंबईतील इन्फिनिटी मॉलमध्ये उन्माद

मुंबई: मालाड पश्चिम येथील इन्फिनिटी मॉलमधील कपड्यांच्या रिटेल आउटलेटच्या प्रमोशनल ऑफरबद्दल सोशल मीडियावरील संदेशांनी शनिवारी मॉलच्या परिसरात मोठी गर्दी केली. पोलिसांना हस्तक्षेप...

MahaTET गळतीमुळे सेवांतर्गत कर्मचाऱ्यांसाठी TET रद्द करण्याची मागणी पुनरुज्जीवित झाली, शिक्षक आणि राजकारणी वारंवार...

महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक मंचाचे राज्य अध्यक्ष विजय कोंबे म्हणाले की, संपूर्ण प्रक्रिया पूर्ण केल्याशिवाय परीक्षा पुन्हा घेण्यात येऊ नये. पुणे : 2018...

तीन जंगली हिमालयी भक्षक समान टरफ शेअर करतात, एकाच वेळी शिकार करतात आणि कधीच...

नेपाळच्या लॅपची खोऱ्यातील एका महत्त्वपूर्ण अभ्यासात तीन शिखर शिकारींमध्ये आश्चर्यकारक शांतता दिसून येते: हिम तेंदुए, सामान्य बिबट्या आणि हिमालयी लांडगे. प्रादेशिक विभाजनांऐवजी, त्यांचे...

लोहगड खून प्रकरणातील आरोपीने रिअल्टरला मारण्याच्या पद्धती ऑनलाइन शोधल्या, त्याला गडावरून ढकलण्याची तालीमही केली:...

पुणे : शनिवारी 25 वर्षीय रिअल्टर केतन अग्रवालच्या हत्येच्या तपासात असे दिसून आले की आरोपी, सिया गोयल (20) आणि चेतन चौधरी (22)...

error: Content is protected !!