Homeशहरसमाजभूषण पुरस्कार मान्यवरणा प्रदान : महापुरुषांच्या विचारांचा जागर जपणाऱ्या कर्तृत्ववान व्यक्तिमत्त्वांचा विशेष...

समाजभूषण पुरस्कार मान्यवरणा प्रदान : महापुरुषांच्या विचारांचा जागर जपणाऱ्या कर्तृत्ववान व्यक्तिमत्त्वांचा विशेष गौरव.

कल्याण दि. ८ : महापुरुषांच्या विचारांचा प्रसार, समाजप्रबोधन आणि सामाजिक कार्याला चालना देण्याच्या उद्देशाने कल्याण येथील आचार्य अत्रे नाट्यगृहात नुकत्याच संपन्न झालेल्या “महापुरुषांना संगीतिमय मानवंदना” या भव्य कार्यक्रमात विविध क्षेत्रातील मान्यवरांचा “समाजभूषण पुरस्कार” देऊन गौरव करण्यात आला. मात्र काही मान्यवरांना अत्यावश्यक शासकीय कामे व इतर पूर्वनियोजित कार्यक्रमांमुळे मुख्य सोहळ्यास उपस्थित राहता आले नाही. अशा मान्यवरांचा सन्मान आयोजकांनी त्यांच्या कार्यालयात व निवासस्थानी प्रत्यक्ष भेट देऊन केला.

यामध्ये ज्येष्ठ पत्रकार व अन्याय विरुद्ध संघर्ष समितीचे संस्थापक अध्यक्ष दिलीप मालवणकर, परिमंडळ-४ चे पोलीस उपायुक्त सचिन गोरे, विठ्ठलवाडी पोलिस निरीक्षक चंद्रहार गोडसे, पोलिस हवालदार निलेश कांगणे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता प्रशांत मानकर, केडीएमसीचे सहाय्यक आयुक्त राजेंद्र साळुंखे, समाजसेवक सुरेश सोनवणे तसेच धम्म उपासक लताताई एस. पडघान, समाजसेवक संजय शेठ गायकवाड,यांचा विशेष सन्मान करण्यात आला.

या गौरव सोहळ्यात बिग बॉस मराठी फेम लोकप्रिय कलाकार संतोष चौधरी (दादूस) यांनी स्वतः उपस्थित राहून पुरस्कार प्रदान करण्यास सहभाग नोंदवला. आयोजक सतीश अप्पा सोनवणे, बहुजन मुक्ती पार्टीचे संघर्षयोद्धा निलेशदादा येलवे, अतुल भोईर, पत्रकार सुरेश जगताप आणि प्रशांत ढोणे यांनी मान्यवरांच्या भेटी घेत त्यांना सन्मानचिन्ह, स्मृतिचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन गौरविले.

या प्रसंगी मान्यवरांनी आयोजकांच्या या उपक्रमाचे विशेष कौतुक करत, “कार्यक्रमाला उपस्थित राहता आले नाही तरी आयोजकांनी घरी येऊन सन्मान केल्याने पुरस्काराचा मान अधिक वाढला,” अशा भावना व्यक्त केल्या. “महापुरुषांना संगीतिमय मानवंदना” या कार्यक्रमातून समाजप्रबोधन, सांस्कृतिक जतन आणि सामाजिक कार्याचा संदेश देण्यात आला. त्याचबरोबर “समाजभूषण पुरस्कार” हा केवळ सन्मान नसून समाजासाठी निःस्वार्थपणे कार्य करणाऱ्या व्यक्तींच्या योगदानाची कृतज्ञ दखल असल्याचे या उपक्रमातून पुन्हा अधोरेखित झाले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

अभ्यासिका तात्काळ सुरू करण्याच्या मागणीसाठी ९ जुलै २०२६ रोजी उपोषणाचा व आंदोलनाचा...

उल्हासनगर, दि. ८ ( प्रमोद दळवी )  : उल्हासनगर महानगरपालिका शाळा क्र. १७ परिसरात विद्यार्थ्यांसाठी बांधण्यात आलेली सुसज्ज अभ्यासिका (स्टडी सेंटर) चार महिन्यांपूर्वी पूर्ण...

विम्बल्डनमधील इतिहास: लिएंडर पेसनंतर मुलांच्या एकेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत पोहोचणारा अर्णव पापरकर ३६ वर्षांतील पहिला...

लंडन, इंग्लंड येथे 04 जुलै 2026 रोजी द चॅम्पियनशिप विम्बल्डन 2026 च्या सहाव्या दिवशी बॉईज सिंगल्सच्या पहिल्या फेरीच्या सामन्यात अर्णव विजय पापरकर ग्रेट...

गोरेगाव येथे बेस्ट बसने ऑटोला धडक दिल्याने दोन जखमी

बेस्टची दैनंदिन प्रवासी संख्या 45 लाखांवरून 23 लाखांवर घसरली आहे परंतु भविष्यात ती 50 लाखांच्या पुढे जाण्याची अपेक्षा आहे, तज्ञांनी चेतावणी दिली आहे...

जलद व्यापार मंदावला आहे, पुण्याच्या पावसात रायडर्सना आव्हानांचा सामना करावा लागतो

रायडर्सना पावसात तोंड देण्याची स्वतःची आव्हाने होती. ते पूर आलेले रस्ते, खड्डे आणि रहदारी यातून मार्गक्रमण करत आहेत. यामुळे ऑर्डरला तात्पुरता विलंब झाला...

वंदे भारत गाड्या ज्या तुम्हाला भारतातील सर्वात प्रसिद्ध युनेस्को जागतिक वारसा स्थळांवर घेऊन जातात

युनेस्को साइट्स: ताजमहाल आणि आग्रा किल्लादिल्ली-आग्रा वंदे भारत हे कदाचित प्रवाश्यांपैकी एक आवडते आहे जे लोकांना एकाच प्रवासात दोन युनेस्को साइट्स, ताजमहाल आणि आग्रा...

error: Content is protected !!