Homeशहरसत्तर क्विं. प्रति हेक्टरी उत्पादनाच्या प्रमाणात नुकसानभरपाई द्यावी - चेतनसिंह पवार

सत्तर क्विं. प्रति हेक्टरी उत्पादनाच्या प्रमाणात नुकसानभरपाई द्यावी – चेतनसिंह पवार

मुरबाड दि ७ : सोमवार, दि.६ ऑक्टोबर २०२५ रोजी मुरबाड तालुका कृषी अधिकारी कार्यालय येथे काँग्रेस पक्षाच्यावतीने सत्तर क्विंटल प्रति हेक्टरी भात पीक उत्पादनाच्या प्रमाणात शासनाने व पिक विमा कंपन्यांनी नुकसान भरपाई देण्यासाठीचे निवेदन महाराष्ट्र राज्य कृषी मंत्री यांना मुरबाड तालुका कृषी अधिकारी यांच्यामार्फत काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष चेतनसिंह पवार यांच्या नेतृत्वात व प्रदेश सचिव (किसान) तुकाराम ठाकरे, किसान तालुकाध्यक्ष गुरुनाथ पष्टे, युवक तालुकाध्यक्ष धनाजी बांगर, महिला तालुकाध्यक्ष संध्या कदम, ओबीसी तालुकाध्यक्ष अनिल चिराटे, इंटक तालुकाध्यक्ष हरिश्चंद्र झुंजारराव यांच्या प्रमुख उपस्थितीत देण्यात आले.

पाण्याच्या जमीनचे नुकसान १००% टक्के झाले तरीही पाण्याच्या स्त्रोतापासुन (ओढे/नाले/नदी) १०० मीटर अंतरावर बाधित क्षेत्र पकडून सरसकट नुकसान भरपाई त्यांना द्यावी असे मत गुरुनाथ पष्टे यांनी मांडले. तालुक्यामध्ये मागील पंधरवड्यामध्ये झालेल्या अतिरिक्त पावसामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले असून त्याचे पंचनामे तात्काळ करण्यात यावी तसेच नवीन संकरित बियाणांमुळे पिकाचे उत्पन्न हे हेक्‍टरी ७० क्विंटलच्या जवळपास येत असून सरकारी बाजारभावाने एकूण उत्पादित मालाची किंमत ही १,५०,००० रु होत असून शेतकऱ्यांचे झालेले नुकसान त्या प्रमाणात नोंद करून हेक्टरी ७५,०००  रुपये कमीत कमी नुकसान भरपाई द्यावी असे प्रतिपादन चेतनसिंह पवार यांनी केले.

यावेळी तालुका उपाध्यक्ष जयवंत हरड, जिल्हा सरचिटणीस (किसान) जयवंत पवार, तालुका कोषाध्यक्ष नेताजी लाटे, तालुका सरचिटणीस मारुती टोहके व मार्तंड आगिवले, तालुका सचिव प्रकाश हिंदुराव, किसान तालुका उपाध्यक्ष चिंतामण पष्टे, विभाग प्रमुख सचिन धुमाळ, अमोल सूर्यराव, विपुल सुरोशे, विठ्ठल ढमके, बुधाजी खंडागले, विशाल पवार आदी मान्यवर उपस्थित होते. शेतामध्ये वारा-वादळांमुळे पडलेले भातपिकांचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असुन कापणी हंगाम येईपर्यंत अधिकचे नुकसान होणार आहे, त्याबाबत देखील योग्य धोरण स्वीकारून जास्तीत जास्त नुकसान भरपाई देण्यात यावी असे मत तुकाराम ठाकरे यांनी व्यक्त केले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

आयपीएल २०२६: वैभव सूर्यवंशीच्या ९३ धावांनी राजस्थान रॉयल्सच्या प्लेऑफच्या आशा जिवंत ठेवल्या

राजस्थान रॉयल्सचा वैभव सूर्यवंशी (एपी फोटो) नवी दिल्ली: वैभव सूर्यवंशी पुन्हा एकदा चर्चेत आला कारण 15 वर्षीय खेळाडूने केवळ 38 चेंडूत शानदार 93...

डिजिटल अटक घोटाळ्यात 77 वर्षीय मुंबईतील रहिवासी 50 लाख रुपये गमावले

मुंबई: पूर्व क्षेत्र सायबर पोलिस ठाण्यात नोंदवलेल्या एफआयआरनुसार, डिजिटल अटक घोटाळ्यात अंमलबजावणी संचालनालय (ईडी) अधिकारी म्हणून दाखवून सायबर घोटाळेबाजांनी घाटकोपर येथील 77...

दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमध्ये डोळ्याच्या शस्त्रक्रियेदरम्यान 6 वर्षीय मुलाचा मृत्यू, पालकांची वैद्यकीय निष्काळजीपणाची तक्रार |...

पुणे: दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल (DMH) मध्ये सोमवारी एका सहा वर्षीय मुलीचा डोळ्याच्या प्रक्रियेदरम्यान मृत्यू झाला, त्यामुळे वैद्यकीय निष्काळजीपणाचा आरोप झाला. रुग्णालयाने या...

7 प्रारंभिक चिन्हे पालकांनी कधीही दुर्लक्ष करू नये आणि कशी मदत करावी

बर्नआउट हे एकेकाळी प्रौढ आणि कार्यरत व्यावसायिकांशी संबंधित होते, परंतु आता ते शाळेत जाणाऱ्या मुलांमध्येही सामान्य झाले आहे. शैक्षणिक दबाव आणि भरलेले...

पुणे हौसिंग सोसायटीमध्ये 7 वर्षाच्या मुलाचा लिफ्टचा दरवाजा आणि ग्रीलमध्ये अडकून मृत्यू

पुणे : सिंहगड रोड परिसरातील सुमारे 25 वर्षे जुन्या गृहनिर्माण संस्थेच्या इमारतीच्या लिफ्टच्या कोसळलेल्या लोखंडी जाळी आणि लाकडी दरवाजामध्ये अडकल्याने सोमवारी रात्री...

error: Content is protected !!