- पावसाळ्यापूर्वी खड्डे भरून घेण्याचे आदेश
- विकास कामे जलद गतीने करण्यासाठी संबंधित ठेकेदारला नोटीस बजावण्याच्या सूचना
- फुटपाथ वर असलेले अतिक्रमण हटवण्याचे आदेश
उल्हासनगर दि.८ ( प्रमोद दळवी ) : महापालिका क्षेत्रातील प्रमुख रस्ते व मुख्य चौकाच्या ठिकाणाची उल्हासनगर महापालिका प्रशासक तथा आयुक्त सौ मनिषा आव्हाळे (भा.प्र.से ) यांनी गुरुवारी पाहणी केली. जवळपास १५ ठिकाणीची आयुक्तांनी पाहणी केल्यावर पालिकेच्या अधिकाऱ्यांना काही महत्त्वाच्या सूचना व आदेश देखील दिले आहेत. त्यावेळी आयुक्तांसोबत अति. आयुक्त किशोर गवस, उप – आयुक्त (सा.बां.वि ) श्रीमती विशाखा मोटघरे, शहर अभियंता (सा.बां.वि) हनुमंत खरात, कार्यकारी अभियंता (सा.बां.वि ) संदीप जाधव, सर्व कनिष्ठ अभियंता (सा.बां.वि ) तसेच जनसंपर्क अधिकारी आणि इतर अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.

उल्हासनगर महापालिकेचे प्रशासक तथा आयुक्त सौ मनिषा आव्हाळे यांनी शहरातील कॅम्प नं – १ परिसरातील धोबीघाट रोड, कल्याण मुरबाड रोड, कॅम्प नं -२ परिसरातील खेमाणी भाजी मार्केट चौक, एस. ई.एस स्कूल खेमाणी, खेमाणी चौक व नानिक जिरा चौक, मध्यवर्ती पोलीस स्टेशन रोड, कॅम्प नं -३ परिसरातील मयूर हॉटेल रस्ता, फॉलवर लाईन चौक ( कल्याण बदलापूर रोड ) उल्हासनगर- ३ , लालचक्की ते उल्हासनगर स्टेशन रोड उल्हासनगर -४ , शिवनेरी हॉस्पिटल रोड उल्हासनगर- ४ , भाटिया चौक ते गाऊन बाजार रोड उल्हासनगर – ५ , नविन टाऊन हॉल उल्हासनगर – ५ , नेताजी चौक ते हिललाईन पोलीस स्टेशन रस्ता ( एम.एम,आर,डी.ए ) उल्हासनगर – ५ , भाजी मार्केट उल्हासनगर – ५ , तहसीलदार ऑफिस ते मच्छी मार्केट रोड उल्हासनगर – ५ अशा काही रस्त्यांची व चौकाच्या ठिकाणाची पालिका आयुक्त सौ मनिषा आव्हाळे यांनी पाहणी केली.

शहरातील रस्त्यांची व चौकाची पाहणी करताना पालिका आयुक्त सौ मनिषा आव्हाळे यांना रस्त्यावरील ठिकठिकाणी खड्डे निर्माण झालेले दिसले. त्यावेळी त्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना पावसाळ्यापूर्वी रस्त्यावरील खड्डे भरून घ्यावेत अशा सूचना दिल्या. तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाद्वारे शहरात सुरू असलेले विकास कामे जलद गतीने करणे करिता संबंधित ठेकेदाराला नोटीस बजावण्याचे आदेश दिले. तसेच रस्त्यांवर इतरत्र पसरलेला कचरा सार्वजनिक आरोग्य विभागाद्वारे उचलून घ्यावे अशाही सूचना देण्यात आल्या. याशिवाय काही रस्त्यांवरील जलवाहिन्यांचे लिकेजेस असल्यामुळे ते लवकरात लवकर पाणीपुरवठा विभागाने दुरुस्त करावे व रस्त्याच्या दोन्ही बाजूस फूटपाथवर असलेले अतिक्रमण संबंधित प्रभाग अधिकारी द्वारे हटवण्यात यावे असेही आदेश देण्यात आले.






























