Homeशहररिक्षा चालकांवरती वाहतूक पोलिसांनी लावला दहा हजाराचा दंड : पण न्यायालयाने रिक्षा...

रिक्षा चालकांवरती वाहतूक पोलिसांनी लावला दहा हजाराचा दंड : पण न्यायालयाने रिक्षा चालकांना दिलासा देत लावला दोन हजाराचा दंड

  • उल्हासनगरातील रमाकांत रिक्षा चालक युनियनच्या प्रयत्नांना यश
  • रिक्षा चालकांनी अध्यक्ष विक्की भुल्लर व ॲड. मोहित आहूजा यांचे मानले आभार

उल्हासनगर दि १७ ( प्रमोद दळवी ) : उल्हासनगर वाहतूक विभागाच्या पोलिसांनी ओवरसीट चालवणाऱ्या जवळपास दहा रिक्षा चालकांवर प्रत्येकी दहा हजार रुपये दंडात्मक कारवाई केल्याने रिक्षा चालकांमध्ये संतापाचे व नाराजगीचे वातावरण पसरले होते. अशावेळी उल्हासनगरातील रमाकांत चव्हाण रिक्षा युनियनचे अध्यक्ष राजेंद्रसिंह उर्फ विक्की भुल्लर यांनी रिक्षा चालकांवर होणारा अन्याय पाहून त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी वकिलामार्फत कोर्टात दाद मागितली. त्यांच्या या प्रयत्नांना यश आले असून वाहतूक पोलिसांनी रिक्षा चालकांना ठोकळ्याला दहा हजार रुपयांचा दंड. न्यायालयाने देखील रिक्षा चालकांना दिलासा देत ती दंडात्मक रक्कम कमी करत दोन हजार रुपये दंड घेतला. त्यामुळे रिक्षा चालकांना दिलासा मिळाला असून त्यांनी विक्की भुल्लर व  ॲड. मोहित आहूजा यांचे आभार प्रकट केले आहे.

उल्हासनगरशहरात ओवरसीट चालवणाऱ्या रिक्षा चालकांवर कारवाई करण्यासाठी वाहतूक पोलिसांनी सुरुवात केली आहे. वाहतूक विभागाच्या पोलिसांनी अधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली शनिवारी आणि रविवारी जवळपास दहा रिक्षा चालकांवर कारवाई करत प्रति रिक्षा दहा हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आले होते. वाहतूक पोलिसांनी एवढी मोठी दंडात्मक रक्कम रिक्षा चालकांवर लादल्याने रिक्षा चालकांमध्ये संतापाच्या आणि नाराजीचे वातावरण पसरले होते. याबाबत रिक्षा चालकांनी वाहतूक विभाग उल्हासनगर कार्यालय बाहेर एकत्रच जमून पोलिसांनी लादलेल्या दंडात्मक कारवाई विरोधात आक्रमक भूमिका हाती घेतली. रमाकांत चव्हाण रिक्षा युनियनचे पदाधिकारी आप्पा कुलकर्णी, विकी भुल्लर, राजेंद्र चौधरी, बाळा श्रीखंडे व रिक्षा चालकांना यांनी या बाबत वाहतूक विभागाच्या पोलीस अधिकाऱ्यांशी चर्चा करून त्यांनी केलेल्या दंडात्मक कारवाईबाबत माहिती घेतली. पोलिसांच्या या दहा हजार रुपये दंडात्मकच्या कारवाईमुळे रिक्षा चालकांमध्ये तणाव पूर्व वातावरण निर्माण झाले होते.

रमाकांत चव्हाण रिक्षा चालक संघटनेच्या नेतृत्वाखाली युनियननेने वाहतूक पोलिसांच्या या दंडात्मक कारवाई संदर्भात ॲड. मोहित आहूजा यांच्या माध्यमातून न्यायालयात दाद मागितली. न्यायालयाने रिक्षा चालकांना दिलासा देत वाहतूक पोलिसांनी दहा हजार रुपये दंडात्मक कारवाई केली होती. ती रक्कम कमी करून फक्त दोन हजार रुपये दंड केले. न्यायालयाने रिक्षा चालकांना दिलासा दिल्यामुळे रिक्षा चालकांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले. युनियनच्या वतीने त्यांना हा न्याय मिळाला असल्याचे रिक्षा चालकांनी सांगितले आहे.

याबाबत रमाकांत चव्हाण रिक्षा युनियनचे अध्यक्ष राजेंद्रसिंह उर्फ विक्की भुल्लर यांनी सांगितले उल्हासनगर वाहतूक विभागाच्या पोलिसांनी रिक्षा चालकांवर ओवरसीट व फ्रंट सीटच्या अनुषंगाने दहा हजार रुपये दंडात्मक कारवाई केली होती. त्यावेळी उपशहर अध्यक्ष मिंटी भाई यांनी विक्की भुल्लर यांना पोलिसांच्या या कारवाईबाबत माहिती दिली. ही सगळी माहिती घेतल्यावर सगळे एकत्र जमून पठाणे साहेब यांची भेट घेतली. त्यांनी सांगितले आम्हाला वरून आदेश आहेत. परमिट उल्लंघनची कारवाई करण्यात यावी. पण दहा हजार रुपये दंडात्मक कारवाई एखाद्या गरीब रिक्षा चालकावर करणे चुकीचे आहे असे विक्की भुल्लर म्हणाले आज एक रिक्षा चालक दिवसातून पाचशे रुपये मोठ्या कष्टाने कमवतो जर त्याच्यावर दहा हजार रुपये दंडात्मक कारवाई केली तर तो आपल्या कुटुंबाला काय खायला घालेल. त्याच्यावर उपासमारीची वेळ नक्कीच येईल. काही रिक्षा चालक सेलवर रिक्षा चालवतात, काही रिक्षा चालकांनी कर्ज घेतल्यामुळे त्यांना बँकेचा हप्ता भरावा लागतो. पण वाहतूक पोलिस अधिकाऱ्यांनी आम्ही तुम्हाला काहीच मदत करू शकणार नाही असे सांगितले. त्यामुळे रिक्षा चालकांना न्याय कसा देता येईल असा प्रश्न उभा राहिला होता. याशिवाय पोलिसांनी ज्या रिक्षा चालकांवर दहा हजार रुपये दंडात्मक कारवाई केली होती त्या सर्व केसेस न्यायालयात पाठवण्यात आले. त्यावेळी रिक्षा युनियनच्या वतीने ॲड. मोहित आहूजा यांना न्यायालयात रिक्षा चालकाच्या बाजूने दाद मागण्यास सांगितले. त्यांनी देखील चांगल्या पद्धतीने युक्तिवाद केला. आणि युनियनच्या प्रयत्नांना यश आले असे विकी भुल्लर यांनी सांगितले.

रमाकांत रिक्षा चालक युनियनचे सरचिटणीस आप्पा कुलकर्णी यांनी सांगितले मला संघटनेमध्ये ३८ वर्षे झाले. पण आजपर्यंत दहा हजार रुपये पोलिसांनी दंड घेतल्याचे  कधीच पाहिले नाही. दोन दिवसापर्यंत पंधराशे रुपये दंड होता याशिवाय १९८४ ला दंड होता २० रुपये इथून तो वाढत वाढत आता पाचशे रुपये पर्यंत आला. साध्या कलमाकरता ५०० रुपये आहे. जे जे कलम असे असतील ते वाढत हजार, पंधराशे वरून आता पंचवीस हजार रुपये पर्यंत दंड आहे. पण रिक्षावाल्याने ओव्हर सीट घेतल्यामुळे दहा हजार रुपये दंड हा पहिल्यांदाच झालेला आहे. त्यामुळे सर्व रिक्षावाले नाराज आहेत. सर्व रिक्षा चालकांनी याबाबत आंदोलनाची भूमिका हाती घेणार होते. पण आमच्या अध्यक्ष आणि कार्यकारी अध्यक्ष म्हणाले थांबा आपण सर्व माहिती घेऊ त्याप्रमाणे आम्ही माहिती घेतली. महासंघाचे अध्यक्ष पेणकर तिच्याशी बोलले,, कार्यकारी अध्यक्ष संतोष नवले, जितू पवार यांच्याशी आम्ही बोललो त्यांनी आम्हाला सूचना दिली की आपण आधी परिवाहन विभागाकडून आणि आरटीओकडून हे जे दहा हजार रुपयेचे कलम आहे. परमिट कंडिशन उल्लंघन जे कलम आहे. जे आज पोलिसांनी दंडात्मक कारवाई केली त्याची सविस्तर माहिती घेऊ आणि मग त्यानुसार आपण आंदोलन करू. आंदोलन तर करावाच लागेल कारण पोलिसांची ही कारवाई आहे ती वरून आदेश आल्यानंतर त्यांनी ही कारवाई केलेली आहे. पोलिसांचं काम फक्त इम्प्लिमेंटेशन आहे. त्यावरून वरिष्ठ अधिकाऱ्यांनी हात वर केले मी काही करू शकत नाही.. आम्हाला त्या विरोधात आंदोलन तर करावाच लागेल आणि पाच ते सहा दिवसांमध्ये आम्ही आंदोलन करणार आहोत. आणि त्या अनुषंगाने आम्ही सर्व रिक्षा चालकांना सूचना दिले आहेत तुम्ही कोणतीच ओव्हरशीट घेऊ नका, कायद्याचा पालन करा. आठ ते दहा दिवसानंतर आंदोलन केल्यानंतर काय दिशा ठरवायची जे वरिष्ठ अधिकारी आमच्यावर आहेत त्यांच्याबरोबर. महासंघाचे अध्यक्ष ,कार्यकारी अध्यक्ष. यांच्याशी बसून निर्णय घेऊ आणि आंदोलनाची भूमिका हाती घेऊ असे आप्पा कुलकर्णी यांनी सांगितले

पोलिसांनी ज्या रिक्षा चालकांवर दहा हजार रुपयाची दंडात्मक कारवाई केली होती. न्यायालयाने या रिक्षा चालकांना दिलासा देत त्यांना दोन हजार रुपये दंड आकारून त्यांना सोडून देण्यात आल्यावर. या सर्व रिक्षा चालकांनी व रिक्षा चालकाच्या पदाधिकारी यांनी विक्की भुल्लर यांची भेट घेऊन त्यांनी केलेल्या सहकार्यामुळे त्यांचे आभार प्रकट करत त्यांचा सत्कार केला.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

नसरापूर बालिका बलात्कार-हत्या : पुणे न्यायालयाने ६५ वर्षीय वृद्धाला दोषी ठरवले, २९ जून रोजी...

आरोपी सीसीटीव्हीत कैद पुणे - जिल्ह्यातील भोर तालुक्यातील नसरापूर येथे 1 मे रोजी तीन वर्षांच्या मुलीचे अपहरण, बलात्कार आणि खून केल्याप्रकरणी पुण्यातील विशेष...

नेमारने स्कॉटलंडविरुद्ध ऐतिहासिक पुनरागमन केल्यानंतर ब्राझीलच्या दुर्मिळ विश्वचषकात पेलेशी बरोबरी केली

मियामी गार्डन्स, फ्ला., बुधवार, 24 जून 2026 रोजी स्कॉटलंड आणि ब्राझील यांच्यातील विश्वचषक गट सी सॉकर सामन्यानंतर ब्राझीलचा नेमार (10) साजरा करत आहे....

मुंबई लोकलमध्ये हत्या: पोलिसांनी आरोपी रोशन सुवर्णाचा कसा माग काढला

मुंबई लोकल ट्रेनच्या दरवाजाच्या वादातून २१ वर्षीय तरुणाची हत्या केल्याचा आरोप मुंबई: मुसळधार पावसात रेल्वेचा दरवाजा बंद ठेवण्यावरून झालेल्या वादाने मुंबईच्या उपनगरीय रेल्वे...

अण्णा हजारे 5 जुलैच्या उपोषणावर ठाम; सीआयसीने म्हटले आहे की चर्चेची आणखी एक फेरी...

महाराष्ट्र सरकारने आरटीआयचे नवीन नियम मागे न घेतल्यास 5 जुलैपासून बेमुदत उपोषण करण्याचा इशारा ज्येष्ठ कार्यकर्ते अण्णा हजारे यांनी दिला आहे. पुणे :...

मालदीव, स्वित्झर्लंड किंवा बाली परवडत नाही? हे 6 बजेट-अनुकूल पर्याय वापरून पहा

आपल्या सर्वांनाच आपल्या स्वप्नातील गंतव्यस्थानी प्रवास करायचा आहे, परंतु काहीवेळा याचा अर्थ खिशात छिद्र पाडणे होय. मालदीव, स्वित्झर्लंड, दुबई आणि बाली सारखी ठिकाणे नेहमी...

नसरापूर बालिका बलात्कार-हत्या : पुणे न्यायालयाने ६५ वर्षीय वृद्धाला दोषी ठरवले, २९ जून रोजी...

आरोपी सीसीटीव्हीत कैद पुणे - जिल्ह्यातील भोर तालुक्यातील नसरापूर येथे 1 मे रोजी तीन वर्षांच्या मुलीचे अपहरण, बलात्कार आणि खून केल्याप्रकरणी पुण्यातील विशेष...

नेमारने स्कॉटलंडविरुद्ध ऐतिहासिक पुनरागमन केल्यानंतर ब्राझीलच्या दुर्मिळ विश्वचषकात पेलेशी बरोबरी केली

मियामी गार्डन्स, फ्ला., बुधवार, 24 जून 2026 रोजी स्कॉटलंड आणि ब्राझील यांच्यातील विश्वचषक गट सी सॉकर सामन्यानंतर ब्राझीलचा नेमार (10) साजरा करत आहे....

मुंबई लोकलमध्ये हत्या: पोलिसांनी आरोपी रोशन सुवर्णाचा कसा माग काढला

मुंबई लोकल ट्रेनच्या दरवाजाच्या वादातून २१ वर्षीय तरुणाची हत्या केल्याचा आरोप मुंबई: मुसळधार पावसात रेल्वेचा दरवाजा बंद ठेवण्यावरून झालेल्या वादाने मुंबईच्या उपनगरीय रेल्वे...

अण्णा हजारे 5 जुलैच्या उपोषणावर ठाम; सीआयसीने म्हटले आहे की चर्चेची आणखी एक फेरी...

महाराष्ट्र सरकारने आरटीआयचे नवीन नियम मागे न घेतल्यास 5 जुलैपासून बेमुदत उपोषण करण्याचा इशारा ज्येष्ठ कार्यकर्ते अण्णा हजारे यांनी दिला आहे. पुणे :...

मालदीव, स्वित्झर्लंड किंवा बाली परवडत नाही? हे 6 बजेट-अनुकूल पर्याय वापरून पहा

आपल्या सर्वांनाच आपल्या स्वप्नातील गंतव्यस्थानी प्रवास करायचा आहे, परंतु काहीवेळा याचा अर्थ खिशात छिद्र पाडणे होय. मालदीव, स्वित्झर्लंड, दुबई आणि बाली सारखी ठिकाणे नेहमी...
error: Content is protected !!