Homeशहरमेट्रो - ५ चा विस्तार दृष्टीपथात : खासदार डॉ.श्रीकांत एकनाथ शिंदे यांच्या...

मेट्रो – ५ चा विस्तार दृष्टीपथात : खासदार डॉ.श्रीकांत एकनाथ शिंदे यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नाला यश

– विस्तारित मार्गिकेसाठी १८ हजार १३० कोटींच्या निधीला मंजूरी

– कल्याण ते उल्हासनगर धावणार लवकरच मेट्रो

– उल्हासनगर ते अंबरनाथ – बदलापूर पर्यंत ही होणार मेट्रोचा विस्तार

– ६९ लाख प्रवाशांना होणार फायदा

कल्याण दि. २४  : मेट्रो – ५ ( ठाणे – भिवंडी – कल्याण ) प्रकल्पातील विस्तारित मार्गिकेसाठी १८ हजार १३० कोटींच्या निधीला मंजूरी मिळाली आहे. याविस्तारीत मार्गिकेमध्ये मेट्रो ५ ही धामणकर नाका ते दुर्गाडी आणि तसेच कल्याण रेल्वे स्थानकापासून खडकपाडा मार्गे उल्हासनगर इथपर्यंत धावणार आहे. यामुळे ठाणे, कल्याण, डोंबिवली, उल्हासनगर येथील नागरिकांचा प्रवास अधिक सुलभ होणार आहे. उल्हासनगर, कल्याण येथील प्रवाशांना थेट ठाणे गाठणे अधिक सोपे होणार आहे. याबाबत राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ.श्रीकांत एकनाथ शिंदे यांनी सातत्यपूर्ण पाठपुरावा केला होता. खासदार डॉ.शिंदे यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नाला यश मिळाले असून कल्याण आणि उल्हासनगर येथील या मेट्रो मार्गिकेच्या विस्ताराचा मार्ग मोकळा झाला आहे. या महत्त्वाकांक्षी प्रकल्पामुळे या संपूर्ण पट्ट्यातील प्रवास अधिक जलद, सुलभ आणि वेळ वाचवणारा ठरणार आहे. यासाठी खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे आभार मानले आहेत.

कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ.श्रीकांत एकनाथ शिंदे यांच्या पुढाकाराने मतदारसंघात वाहतुकीच्या दृष्टीने अनेक महत्वाकांक्षी प्रकल्प राबविले जात आहेत. कल्याण ते तळोजा मेट्रो १२, मेट्रो ५ चा विस्तार तसेच कांजूरमार्ग ते बदलापूर जाणाऱ्या मेट्रो – १४ चा देखील खासदार डॉ.शिंदे पाठपुरावा करत आहे. मेट्रो ५ विस्तारासाठी ही खासदार डॉ.शिंदे यांनी शासनदरबारी पाठपुरावा करत होते.  राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ.श्रीकांत एकनाथ शिंदे यांनी सातत्यपूर्ण पाठपुरावा केला होता. खासदार डॉ.शिंदे यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नाला यश मिळाले असून कल्याण आणि उल्हासनगर येथील या मेट्रो मार्गिकेच्या विस्ताराचा मार्ग मोकळा झाला आहे. प्रकल्पातील विस्तारित मार्गिकेसाठी १८ हजार १३० कोटींच्या निधीला मंजूरी मिळाली आहे. याविस्तारीत मार्गिकेमध्ये मेट्रो ५ ही धामणकर नाका ते दुर्गाडी आणि तसेच कल्याण रेल्वे स्थानकापासून खडकपाडा मार्गे उल्हासनगर इथपर्यंत धावणार आहे. यामुळे कल्याण पलीकडच्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.

या विस्तारित मार्गिकेची एकूण लांबी ३४.२१ किमी असून त्यामध्ये १९ स्थानकांचा समावेश आहे. प्रकल्प दोन टप्प्यांत पूर्ण करण्यात येणार आहे. टप्पा १ अंतर्गत कापूरबावडी ते धामणकर नाका, तर टप्पा २ मध्ये धामणकर नाका ते दुर्गाडी असा मार्ग असेल. पुढे मार्गिका ५अ अंतर्गत दुर्गाडी – कल्याण – उल्हासनगर असा विस्तार होणार आहे. यानंतर उल्हासनगर ते अंबरनाथ – बदलापूरपर्यंतही मेट्रो धावण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. या प्रकल्पामुळे ठाणे, भिवंडी, कल्याण आणि उल्हासनगर या परिसरातील सुमारे ६९ लाख नागरिकांना मोठा फायदा होणार आहे. विशेष म्हणजे, सध्याच्या तुलनेत प्रवासाच्या वेळेत ४० ते ५० टक्क्यांपर्यंत बचत होणार आहे.  दरम्यान, या प्रकल्पासाठी आवश्यक असलेल्या केंद्र शासनाच्या व इतर संबंधित विभागांच्या मंजुरी प्रक्रिया वेगाने पूर्ण व्हाव्यात, यासाठी पाठपुरावा सुरू आहे. एकूणच, मेट्रो-५अच्या विस्तारामुळे ठाणे जिल्ह्याच्या उपनगरांमधील कनेक्टिव्हिटीला मोठी चालना मिळणार असून भविष्यातील नागरी विकासालाही गती मिळणार आहे.

उल्हासनगर पर्यंत येणारी मेट्रो ५ चा विस्तार हा उल्हासनगरहून अंबरनाथ – चिखलोली आणि तेथून पुढे बदलापूर येथे देखील करण्यात येणार आहे. याबाबत खासदार डॉ.श्रीकांत एकनाथ शिंदे यांच्या मुख्य उपस्थितीत नुकतीच एमएमआरडीए आयुक्तलयात महत्वाची बैठक पार पडली होती. यावेळी डॉ.शिंदे यांनी हा प्रस्ताव मांडला होता.  याबाबत ही लवकरच सकारात्मक निर्णय घेऊन या विस्तारित मार्गिकेचा मार्ग देखील मोकळा होणार आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

‘हे लग्न रद्द करा’: सिया गोयलचा दावा पालकांनी फेटाळला, म्हणा की ती केतन अग्रवालसोबत...

सिया गोयलच्या पालकांनी नकार दिला की ती तिचा मंगेतर, केतन अग्रवाल यांच्यावर नाखूष होती, पोलिसांच्या दाव्यांच्या विरोधात आहे. पुणे: सिया गोयलच्या पालकांनी गुरुवारी...

भारत अ विरुद्ध श्रीलंका एक अनौपचारिक कसोटी: ध्रुव जुरेल आणि शेख रशीद यांनी दुसऱ्या...

IND A वि SL A: भारत अ संघ गाले आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर श्रीलंका अ विरुद्ध 333/4 वर कमांडिंग पोझिशनमध्ये पहिल्या अनधिकृत कसोटीचा दुसरा दिवस पुन्हा...

मुंबई लोकल हत्या: आरोपी रोशन सुवर्णा दारूच्या नशेत घरी आला, सहप्रवाशाची हत्या करून रडला

नुकत्याच झालेल्या मुंबईच्या ट्रेनमध्ये झालेल्या चाकूने आरोपीच्या कुटुंबाला धक्का बसला आहे, ज्यांचा दावा आहे की तो दारूच्या नशेत आणि अस्वस्थ होऊन घरी धडकला...

‘ती दोषी असेल तर तिला त्याच गडावरून फेकून द्या’; केतन अग्रवाल हत्या प्रकरणातील आरोपी...

व्यापारी केतन अग्रवाल यांच्या कथित हत्येप्रकरणी आरोपी सिया गोयलची आई पूजा गोयल यांनी गुरुवारी आपल्या मुलीला कठोर शिक्षा देण्याची मागणी केली. पुणे: व्यापारी...

नोएडा विरुद्ध युरोप: ‘नोएडा युरोपपेक्षा चांगला आहे’: भारतीय प्रवाश्यांच्या वक्तव्यामुळे स्वीडन, जर्मनी आणि ऑस्ट्रियावर...

इंस्टाग्रामवर एका भारतीय प्रवाशाची युरोपियन ठिकाणांबद्दलची वैयक्तिक पोस्ट व्हायरल होत आहे. परंतु प्रवासी अनमोल रैना (@anmolraina13) च्या व्हिडिओने “नोएडा युरोपपेक्षा चांगले आहे”...

error: Content is protected !!