मुंबई दि. २१ ( प्रमोद दळवी ) : संसदेत विरोधी पक्षनेत्यांनी ‘नारी शक्ती वंदन कायदा’ विधेयक रद्द केल्याच्या निषेधार्थ मुंबईतील वरळी येथील एनएससीआय डोममध्ये ‘जन-आक्रोश महिला सम्मेलन ‘ आयोजित करण्यात आले होते. महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांतील हजारो महिलांनी या सम्मेलनत सहभागी होऊन आपल्या हक्कांच्या संरक्षणासाठी तीव्र एकजूट दाखवली.

परिषदेतील वक्त्यांनी महिलांची सुरक्षा, सन्मान आणि समान हक्कांशी संबंधित मुद्द्यांवर गंभीर चिंता व्यक्त केली. सध्याच्या परिस्थितीत महिलांच्या हक्कांचे सातत्याने उल्लंघन होत असल्याचा आरोप त्यांनी केला आणि यासाठी काँग्रेस पक्षाला जबाबदार धरले.या कार्यक्रमादरम्यान, महिलांनी आपले अनुभव सांगितले आणि समाजात वाढणारी असुरक्षितता, अन्याय आणि भेदभावाविरोधात आवाज उठवला. महिला सक्षमीकरण मजबूत करणे, सुरक्षा व्यवस्था अधिक बळकट करणे आणि पीडितांना जलद न्याय मिळवून देणे या प्रमुख मागण्या मांडण्यात आल्या.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस , भाजपा प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण. पंकजा ताई मुंडे, माधुरी ताई मिसाळ , मेघना ताई बोर्डीकर,महिला प्रदेश अध्यक्ष आमदार चित्रा ताई वाघ, आमदार मनीषा चौधरी, आमदार उमा खापरे , मुंबईच्या महापौर रितू तावडे, मुंबई अध्यक्ष अमित साटम, चंद्रकांत दादा पाटील ,आशिष शेलार, गिरीश महाजन , अतुल सावे , पंकजा भोयर , सुधीर भाऊ मुनगंटीवार , संजय सावकारे, प्रवीण दरेकर, सरचिटणीस एड माधवी नाईक, उल्हासनगर आमदार कुमार आयलानी, जिल्हा अध्यक्ष राजेश वधरिया ,उपमहापौर अमर लुंड, भाजप विधानसभा आमदार, विधानपरिषद आमदार व या सम्मेलनत उल्हासनगर शहरातील हजारो महिला सहभागी झाल्या होत्या.






























