Homeशहरमहिलांसाठी सुवर्णसंधी: मोफत (ECCE) प्रशिक्षणाद्वारे पूर्व-प्राथमिक शिक्षक बना, प्रमाणपत्रासोबत नोकरीसाठी सहाय्य मिळवा!

महिलांसाठी सुवर्णसंधी: मोफत (ECCE) प्रशिक्षणाद्वारे पूर्व-प्राथमिक शिक्षक बना, प्रमाणपत्रासोबत नोकरीसाठी सहाय्य मिळवा!

  • दिशा स्किल ट्रेनिंग सर्व्हिसेस आणि सिताई बहुउद्देशीय संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने राबवण्यात येणारा हा एक अनोखा प्रशिक्षण कार्यक्रम ११ जूनपासून सुरू होणार आहे .

उल्हासनगर दि ८ ( प्रमोद दळवी ) : शिक्षण आणि रोजगार क्षेत्रात महिलांना सक्षम करण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल म्हणून, दिशा स्किल ट्रेनिंग सर्व्हिसेस (सुपरबॉन्ड ॲडेसिव्हज प्रा. लि. चा सीएसआर उपक्रम) आणि सिताई बहुउद्देशीय संस्था यांच्या वतीने मोफत ईसीसीई (बाल संगोपन आणि शिक्षण) प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करत आहेत.

हे प्रशिक्षण विशेषतः अशा तरुण मुली आणि महिलांसाठी फायदेशीर ठरेल, ज्यांना शिक्षण क्षेत्रात करिअर करायचे आहे आणि पूर्व-प्राथमिक शाळा, नर्सरी, पाळणाघरे किंवा बालशिक्षण संस्थांमध्ये नोकरी मिळवायची आहे.

प्रशिक्षणाची प्रमुख वैशिष्ट्ये:- १) पूर्णपणे मोफत प्रशिक्षण, २) मान्यताप्राप्त प्रमाणपत्र,३) इंटर्नशिप आणि नोकरीसाठी सहाय्य,४) व्यावहारिक आणि आधुनिक शिक्षण पद्धतींवर आधारित प्रशिक्षण,५) बालविकास, वर्तन व्यवस्थापन आणि सर्जनशील शिक्षण तंत्रांचे ज्ञान,६) महिलांना आत्मनिर्भर बनवण्याच्या दिशेने एक महत्त्वाचा उपक्रम

ईसीसीई म्हणजे काय आणि ते महत्त्वाचे का आहे?

ईसीसीई (बाल्यावस्था संगोपन आणि शिक्षण) हा जन्मापासून ते ८ वर्षांपर्यंतच्या मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी एक महत्त्वाचा प्रशिक्षण कार्यक्रम आहे. मुलांचा मानसिक, शारीरिक, सामाजिक आणि भावनिक विकास समजून घेण्यासाठी आणि त्यांना उत्तम शिक्षण देण्यासाठी या कार्यक्रमात आधुनिक पद्धतींचे प्रशिक्षण दिले जाते. तज्ञांच्या मते, बालपणीचे शिक्षण मुलाच्या भविष्यासाठी एक मजबूत पाया घालते. म्हणूनच प्रशिक्षित बालशिक्षण शिक्षकांची मागणी सातत्याने वाढत आहे.

पात्रता आणि पूर्वशर्ती :- शैक्षणिक पात्रता: किमान १२वी उत्तीर्ण, वयोमर्यादा: १८ ते ३५ वर्षे, शिधापत्रिका: केशरी, पिवळा किंवा पांढरी शिधापत्रिकाधारक अर्ज करू शकतात.

प्रशिक्षण कार्यक्रम माहिती :  प्रारंभ दिनांक: ११ जून, २०२६ (गुरुवार), वेळ: दुपारी ३:०० ते सायंकाळी ५:००. जागा मर्यादित आहेत, लवकर नोंदणी करणे आवश्यक आहे.

नोंदणीसाठी संपर्क करा :- इच्छुक उमेदवार अधिक माहितीसाठी आणि नावनोंदणीसाठी ८८५६०९७६७८ या क्रमांकांवर कॉल किंवा व्हॉट्सॲप करू शकतात: तुमच्या कुटुंबातील, मित्रमैत्रिणींमधील किंवा परिसरातील कोणत्याही तरुण महिला किंवा मुली रोजगार-केंद्रित प्रशिक्षणाच्या शोधात असतील, तर ही संधी त्यांच्यासाठी फायदेशीर ठरू शकते. जागा मर्यादित असल्यामुळे, इच्छुक उमेदवारांनी शक्य तितक्या लवकर नोंदणी करावी असे असे आवाहन नगरसेविका मीना सोंडे यांनी केले आहे

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

बांगलादेशने ऑस्ट्रेलियावर ऐतिहासिक मालिका जिंकल्यानंतर मेहदी हसन मिराझला वीरगतीने रुग्णालयात दाखल केले.

हेल्मेटच्या बाजूला बाऊन्सर लागल्याने मेहदी हसन मिराझ उपचार घेत आहेत. (एक्स फोटो) बांगलादेशचा कर्णधार मेहदी हसन मिराझ याला गुरुवारी ढाका येथे ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या एकदिवसीय...

कुत्रे सोडले, दार फोडले, व्हिडिओ रेकॉर्ड केले: मुंबईतील जनगणना कर्मचाऱ्यांची मुदत जवळ आल्यावर शिवीगाळ...

जनगणना 2027 हा भारतातील पहिला डिजिटल गणनेचा व्यायाम आहे मुंबई: मुंबई महानगर प्रदेशातील जनगणना करणाऱ्यांसाठी, लोकांची मोजणी न करणे ही सर्वात कठीण गोष्ट...

मुंबई-आग्रा महामार्गावर इगतपुरीजवळ ट्रकचे ब्रेक फेल झाल्याने तब्बल ५ तास वाहतूक कोंडी

पुणे : मुंबई-आग्रा महामार्गावरील इगतपुरीपासून जवळच असलेल्या मुंडे गावाजवळ शुक्रवारी पहाटे ट्रकची धडक बसल्याने सुमारे पाच तास वाहतूक विस्कळीत झाली होती.पहाटे साडेचारच्या...

“तुम्ही आताच का राहत नाही?” हर्ष गोयंका यांचा आनंद विलंब करण्याबद्दलची साधी आठवण

RPG एंटरप्रायझेसचे चेअरमन हर्ष गोयंका, जे भारतातील सर्वात जुन्या व्यावसायिक राजवंशांपैकी एक आहेत, अनेकदा जीवन आणि निर्णयक्षमतेवर लहान विचार मांडतात. टायर्स, इन्फ्रास्ट्रक्चर...

PMC ने नागरी अभियांत्रिकी-माध्यम शाळांसाठी 101 कोटी रुपयांची PPP योजना पुढे ढकलली

नागरी संस्था नागरी इंग्रजी माध्यमाच्या शाळा चालवण्याच्या प्रस्तावावर पुनर्विचार करेल पुणे : पुणे महानगरपालिकेच्या (पीएमसी) स्थायी समितीने गुरुवारी इंग्रजी माध्यमाच्या शाळा चालविण्यासाठी एनजीओला...

error: Content is protected !!