बदलापूर दि.११ ( प्रमोद दळवी ) : येणाऱ्या नगरपालिका निवडणुकी संदर्भात बदलापूर शहर राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार ) पार्टीच्या वतीने बदलापूर शहरातील कार्यकारणी व प्रमुख पदाधिकारी यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी एक मताने महाविकास आघाडीतील घटक पक्षासोबत यावेळी आघाडी करण्याचा ठराव मंजूर करण्यात आले असल्याची माहिती कालिदास देशमुख यांनी दिली.
या बैठकीत बदलापूर शहरातील विविध समस्या बाबत चर्चा करण्यात आली त्यावेळी बदलापूर शहरात प्रामुख्याने महायुतीने नागरिकांना भेडसावणाऱ्या पाण्याच्या समस्या, वाहतुकीचे प्रश्न, रेल्वे प्रवाशांचा प्रश्न, सांडपाणी प्रदूषण या समस्या सोडविण्यात महायुती पूर्णपणे अपयशी झाली असून व स्थानिक प्रश्नाबाबत आवाज उठवणे संबधी बैठकीत चर्चा करण्यात आली. येत्या निवडणुकीमध्ये सर्व शक्तीनिशी उतरन्यानाचा मानस कार्यकर्त्यांनी व्यक्त केला. यावेळी कालीदास देशमुख, हेमंत यशवंतराव, सुशील धाईजे, प्रीतम वानखेडे, संजय कराळे लक्ष्मण फुलवरे, अनिता पाटील मंगल डोळस, सायली बळीद, ज्योती वैद्य, प्रिया खड्गी, वैदही कदम, सुनिता पाटील, विद्या बैसाने, रेखा शिंदे. सोनाली मिठबावकर, स्वाती चटर्जी,मच्छीद्र भोईर इत्यादी कॉर्यकर्ते उपस्थित होते.





























