Homeशहरपानखंडा येथे मोफत आरोग्य तपासणी व उपचार शिबिराचे यशस्वी आयोजन

पानखंडा येथे मोफत आरोग्य तपासणी व उपचार शिबिराचे यशस्वी आयोजन

ठाणे दि.२४ : पानखंडा येथे ज्ञानगंगा एज्युकेशन ट्रस्ट संचलित ज्ञानगंगा कॉलेज ऑफ नर्सिंग, ठाणे, रोजा गार्डेनिया आरोग्य केंद्र, ठाणे महानगरपालिका आरोग्य विभाग तसेच बी.एड. (शिक्षणशास्त्र पदवी) विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत वैद्यकीय आरोग्य तपासणी व उपचार शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिराच्या आयोजनापूर्वी आदल्या दिवशी संपूर्ण परिसरात जनजागृती मोहीम राबविण्यात आली. त्यानंतर दुसऱ्या दिवशी प्रत्यक्ष आरोग्य तपासणी व उपचार शिबिर यशस्वीरीत्या पार पडले.

या शिबिराचा लाभ गावातील ग्रामस्थ, विद्यार्थी, लहान बालके तसेच वयोवृद्ध पुरुष व महिला यांनी मोठ्या प्रमाणात घेतला. शिबिरादरम्यान विविध आजारांची तपासणी करून आवश्यक त्या वैद्यकीय सेवा व उपचार मोफत स्वरूपात देण्यात आले. या आरोग्य शिबिराचा सुमारे ६५ नागरिकांनी लाभ घेतला.

या उपक्रमात नर्सिंग विभागातील प्रथम वर्ष GNM तसेच बी.एड. विभागाच्या विद्यार्थिनींनी वैद्यकीय तपासणीचे प्रत्यक्ष प्रशिक्षण घेतले. त्यामुळे त्यांना वैद्यकीय क्षेत्रातील प्रत्यक्ष अनुभव प्राप्त झाला. यावेळी बी.एड. विभागातील शिक्षिकांचे विद्यार्थिनींना मोलाचे मार्गदर्शन लाभले.

हा उपक्रम सन्माननीय संस्थापक अध्यक्ष प्रा. बी. डी. पाटील सर व संचालिका डॉ. सौ. अनिता पाटील मोरे मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीरीत्या पार पडला. या शिबिराच्या आयोजनासाठी जनसंपर्क अधिकारी प्रा. अनिल आठवले, नर्सिंग विभागाच्या प्राचार्या शशिकला थोटा मॅडम, उपप्राचार्या कल्याणी तेजे मॅडम, तसेच बी.एड. विभागाच्या प्राचार्या सौ. सविता उपासनी यांच्यासह प्रा. प्रतिभा कांबळी मॅडम (आऊटरीच समन्वयक), प्रा. रचना दास मॅडम (IQAC समन्वयक), सुष्ली सोना मॅडम, प्रा. कविता कांबळे मॅडम (अध्यापक वर्ग), श्री. पराग पडेलकर (प्रशासकीय कर्मचारी) व श्री. ज्ञानेश्वर (सहाय्यक कर्मचारी) यांनी मोलाचे सहकार्य केले.

या शिबिरात डॉ. सोनाली सारतापे मॅडम, डॉ. भाविका पाटील मॅडम (वैद्यकीय अधिकारी), डॉ. महेश दिवटे सर (नेत्रतज्ज्ञ), डॉ. झिशान मन्सूरी सर (दंततज्ज्ञ) यांच्यासह एक्स-रे व रक्त तपासणी तंत्रज्ञांची उपस्थिती होती. सर्व मान्यवरांच्या सहकार्यामुळे हे आरोग्य शिबिर अत्यंत यशस्वीरीत्या पार पडले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

आंबेनळी घाटाचे रुंदीकरण करणार : सार्वजनिक बांधकाम मंत्री

आंबेनळी घाटावरील घटनास्थळ जिथे 24 मे रोजी 8 जणांना घेऊन जाणारी SUV दरीत कोसळली होती. पुणे : कोकणाला पश्चिम महाराष्ट्राशी जोडणाऱ्या आंबेनळी घाटाच्या...

विश्वचषकातील सर्वात चर्चेत असलेला नवीन नियम मोडूनही जुड बेलिंगहॅमला का पाठवले नाही

ज्यूड बेलिंगहॅमने इंग्लंडच्या विश्वचषकाच्या ड्रॉ दरम्यान फिफाच्या नवीन नियमाबद्दल गोंधळ निर्माण केला/ प्रतिमा: एक्स इंग्लंडचा मिडफिल्डर ज्युड बेलिंगहॅम मंगळवारी घानाबरोबरच्या गोलशून्य बरोबरीच्या वेळी...

एफडीएने जेजे महानगर रक्तपेढीची तपासणी केली, चौकशीचे आदेश दिले

तक्रारीनंतर ही तपासणी करण्यात आली मुंबई: राज्याच्या अन्न व औषध प्रशासनाने (FDA) अनेक तक्रारींनंतर भायखळा येथील जेजे रुग्णालय संकुलात असलेल्या सरकारी जेजे महानगर...

प्रेयसीच्या इशाऱ्यावरून आरोपी चौधरीने लोहगड किल्ल्यावर रियाल्टरला ढकलून दिले.

पुणे : अग्रवाल यांची मंगेतर सिया गोयल हिच्यासोबत रचलेल्या योजनेनुसार 18 जून रोजी आरोपी चेतन चौधरी याने रिअल इस्टेट फर्मचे संचालक केतन...

मुंबई पाऊस अपडेट: आयएमडीने ऑरेंज अलर्ट जारी केला, उड्डाणे आणि रेल्वे सेवांना फटका; प्रवाशांनी...

मान्सून अखेर कोरड्या मुंबईत दाखल झाला आणि कसा! अलीकडील अपडेटमध्ये, मुंबईतील पावसाच्या गोंधळामुळे प्रवास विस्कळीत झाला आहे आणि ऑरेंज अलर्ट सुरू झाला...

error: Content is protected !!