- “वृक्ष दिंडी” काडून शहरातील विविध ठिकाणी वृक्षारोपन
उल्हासनगर दि. ५ : पर्यावरण दिनाचे औचित्य साधून दिनांक ०५ जून २०२५ पासून सन २०२५ करिता राज्यातील नागरी स्थानिक स्वराज्य संस्था क्षेत्रात वृक्षारोपण मोहीम राबविण्याच्या सूचना शासनाने दिल्या आहेत. त्याअनुषंगाने पर्यावरण संवर्धन, प्रदूषण नियंत्रण व हरित उल्हासनगरच्या दिशेने वाटचाल करण्याच्या उद्देशाने, नागरिकांमध्ये पर्यावरणीय जाणीव निर्माण करणे, वृक्षारोपणाचे महत्त्व अधोरेखित करणे व शहरामध्ये हरित क्षेत्रात वाढ घडवून आणणे या हेतूने उल्हासनगर महानगरपालिकेच्या वतीने एक विशेष “वृक्षारोपण व वृक्ष दिंडी” कार्यक्रमाचे आयोजन दिनांक ०५ जून २०२५ रोजी महापालिका मुख्यालयात मा. प्रशासक तथा आयुक्त श्रीम. मनिषा आव्हाळे भा.प्र.से. यांचे मार्गदर्शनाखाली करण्यात आले.

कार्यक्रमाच्या सुरूवातीला अजय साबळे, सहा. आयुक्त (पर्यावरण/जनसंपर्क), उल्हासनगर महानगरपालिका यांनी सर्व उपस्थित मान्यवर, अधिकारी / कर्मचारी, शालेय/ महाविद्यालयीन विद्यार्थी यांचे स्वागत केले व पर्यावरण संरक्षणाचे महत्त्व, पाण्याची बचत, प्रत्येक नागरिकाने झाडे लावावी, प्लास्टिकचा वापर टाळावा आणि पर्यावरण पूरक जीवनशैली अंगीकारावी. तसेच वाहन विभागाने जास्तीत-जास्त इलेक्ट्रीक वाहने चालविण्यावर भर द्यावा, असे आवाहन केले व “नील पर्ल फाऊन्डेशन व आस्था बहुउद्देशीय संस्था, उल्हासनगर-४ यांनी सदर कार्यक्रमात वृक्षरोपे पुरवून सहकार्य केल्याबद्दल त्यांचे आभार व स्वागत करण्यात आले. पर्यावरण विभाग प्रमुख. दत्तात्रय जाधव यांनी सर्व उपस्थितांसह “हरित शपथ घेतली.

त्यानंतर उल्हासनगरचे मा. आमदार कुमार आयलानी यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून, महापालिकेच्या मुख्य प्रांगणात वृक्षारोपण करून कार्यक्रमाचे औपचारिक उद्घाटन करण्यात आले, पर्यावरणाचे संरक्षण ही आपल्या सर्वांची जबाबदारी असून, प्रत्येक नागरिकाने झाडे लावून त्यांचे संवर्धन करणेचा संदेश मा. आमदारांनी शहरवासीयांना दिला.त्यानंतर “वृक्ष दिंडी” उल्हासनगर महापालिका मुख्यालयातून ७०५ गार्डन, गोलमैदान, ४४४ गार्डन (नाना-नानी पार्क समोर), सपना गार्डन व परत महापालिका मुख्यालय अश्या मार्गाने काढण्यात आली व शहरातील विविध ठिकाणी वृक्षारोपन करण्यात आले.

सदर कार्यक्रमास उल्हासनगरचे आमदार कुमार आयलानी, महापालिका अतिरिक्त आयुक्त किशोर गवस, उप-आयुक्त श्रीम. दिपाली चौगले, उप-आयुक्त डॉ. विजय खेडकर, सहा. आयुक्त (पर्यावरण / जनसंपर्क) अजय साबळे, पर्यावरण विभाग प्रमुख दत्तात्रेय जाधव, मुख्य बाजार निरीक्षक. विनोद केणे, विधी विभाग प्रमुख राजा बुलानी, मालमत्ता व्यवस्थापक श्रीम. विशाखा सावंत, माजी महापालिका सदस्य राजेश वधरिया, उल्हासनगर भाजपा अध्यक्ष. महेश सुखरामानी तसेच महापालिकेतील इतर अधिकारी / कर्मचारी व शालेय/महाविद्यालयीन विद्यार्थी उपस्थित होते.






























