Homeशहरनिर्माण मजदूर संघटनेच्या वतीने सुभाष टेकडीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या...

निर्माण मजदूर संघटनेच्या वतीने सुभाष टेकडीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंती महोत्सव निमित्त सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न

उल्हासनगर दि. १९ ( प्रमोद दळवी ) : निर्माण मजदूर संघटना (रजि) सुभाष टेकडी बांधकाम कामगार नाका यांच्या विदमाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५  व्या जयंती महोत्सव निमित्त दोन दिवस सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

१४  एप्रिल २०२६  रोजी प.पू डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीदिनी सकाळी ११ वाजता सुभाष टेकडीतील सिद्धार्थ स्नेह मंडळाच्या मैदानातील स्टेजवर बाबासाहेबांच्या फोटोची पूजा करून त्रिसरण पंचशील घेण्यात आले. त्यावेळी कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या कामगार मंडळींना तसेच भीम अनुयायींना अल्प उपहार देण्यात आला. दिनांक १५ एप्रिल २०२६  रोजी जयंतीनिमित्त नाका कामगारांसाठी विविध स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. मोठ्या संख्येने कामगारांनी विशेषतः महिला वर्गांनी या स्पर्धेत भाग घेतले. अत्यंत उत्साहात आणि खेळीमेळीच्या वातावरणात हा कार्यक्रम पार पडला. १६  एप्रिल २०२६  रोजी सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी प्रमुख पाहुण्यांचे स्वागत महिला लेझीम पथकाने अतिशय उत्कृष्ट पद्धतीने सादर केले. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून मधुकांत पाथारिया ( संस्थापक अध्यक्ष महाराष्ट्र राज्य निर्माण मजदूर संघटना) , नाना अहिरे (कार्याध्यक्ष निर्माण मजदूर संघटना महाराष्ट्र राज्य) , मदन केदारे (महासचिव महाराष्ट्र राज्य),  लक्ष्मी नाईक (महिला अध्यक्ष महाराष्ट्र राज्य) , संदेश सकपाळ ( डॉ. बी आर आंबेडकर फोर्स संस्थापक अध्यक्ष), प्रमोद दळवी (दैनिक जिल्हा टाइम्स वृत्तपत्र संपादक )  हे उपस्थित होते. सर्वप्रथम प्रमुख उपस्थितीत मान्यवर मंडळींचा सत्कार करण्यात आला. त्यानंतर मान्यवर मंडळींच्या हस्ते विविध खेळांमध्ये विजयी झालेल्या स्पर्धकाला ट्रॉफी देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.

उपस्थित मान्यवर मंडळींनी जयंतीनिमित्त आपल्या भाषणातून निर्माण मजदूर संघटनेच्या कामगिरीचे कौतुक केले. ही संघटना अधिक बळकट करण्यासाठी सर्व कामगारांनी एकजुटीने काम करण्याचा संदेश मधुकांत पाथारिया यांनी दिला. तसेच लक्ष्मी नाईक यांनी कार्यक्रमाला उपस्थित कामगार महिलांना शासनाच्या उपयोजना व कामगारांना त्याचे होणारे फायदे, याबाबत सविस्तर माहिती दिली, संदेश सफकाळ व प्रमोद दळवी यांनी देखील आपल्या भाषणात निर्माण मजदूर संघटनेच्या कार्याचे कौतुक केले. या कार्यक्रमाला निर्माण मजदूर संघटनेचे सुभाष टेकडी कामगार नाक्याचे अध्यक्ष रमेश पंडित आखाडे, महिला अध्यक्ष मीनाक्षी नाना अहिरे, उपाध्यक्ष राजेंद्र भिमराव कदम, खजिनदार कैलाश पळसपगार, प्रचार प्रमुख सिद्धेश्वर पवार, सल्लागार नारायण अहिरे, शारदा चौधरी, निर्मला खैरे, ईश्वरा सैंदाणे, दिपाली बोरसे, दर्शना केदार, रत्‍नाबाई हयाळगे, आरती चव्हाण, रोहिणी सोनवणे, संगीता सोनवणे, महानंदा इंगळे, हिरामण पट्टेकर, दिलीप शिरसाट यांनी या कार्यक्रमात  मोलाचे सहकार्य केले.

निर्माण मजदूर  संघटना तर्फे सर्व कामगारांचे त्यावेळी आभार प्रकट करण्यात आले.डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५  व्या जयंती महोत्सव निमित्त फक्त कामगारांसाठी या सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन कार्याध्यक्ष महाराष्ट्र राज्य नाना अहिरे, सुभाष टेकडी नाका कामगार अध्यक्ष रमेश आखाडे यांनी केले होते. निर्माण मजदूर संघटनेच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी हा कार्यक्रम यशस्वीरित्य पार पाडला. या कार्यक्रमाला कामगार मंडळींचा उत्कृष्ट प्रतिसाद लाभला.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

‘हे लग्न रद्द करा’: सिया गोयलचा दावा पालकांनी फेटाळला, म्हणा की ती केतन अग्रवालसोबत...

सिया गोयलच्या पालकांनी नकार दिला की ती तिचा मंगेतर, केतन अग्रवाल यांच्यावर नाखूष होती, पोलिसांच्या दाव्यांच्या विरोधात आहे. पुणे: सिया गोयलच्या पालकांनी गुरुवारी...

भारत अ विरुद्ध श्रीलंका एक अनौपचारिक कसोटी: ध्रुव जुरेल आणि शेख रशीद यांनी दुसऱ्या...

IND A वि SL A: भारत अ संघ गाले आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर श्रीलंका अ विरुद्ध 333/4 वर कमांडिंग पोझिशनमध्ये पहिल्या अनधिकृत कसोटीचा दुसरा दिवस पुन्हा...

मुंबई लोकल हत्या: आरोपी रोशन सुवर्णा दारूच्या नशेत घरी आला, सहप्रवाशाची हत्या करून रडला

नुकत्याच झालेल्या मुंबईच्या ट्रेनमध्ये झालेल्या चाकूने आरोपीच्या कुटुंबाला धक्का बसला आहे, ज्यांचा दावा आहे की तो दारूच्या नशेत आणि अस्वस्थ होऊन घरी धडकला...

‘ती दोषी असेल तर तिला त्याच गडावरून फेकून द्या’; केतन अग्रवाल हत्या प्रकरणातील आरोपी...

व्यापारी केतन अग्रवाल यांच्या कथित हत्येप्रकरणी आरोपी सिया गोयलची आई पूजा गोयल यांनी गुरुवारी आपल्या मुलीला कठोर शिक्षा देण्याची मागणी केली. पुणे: व्यापारी...

नोएडा विरुद्ध युरोप: ‘नोएडा युरोपपेक्षा चांगला आहे’: भारतीय प्रवाश्यांच्या वक्तव्यामुळे स्वीडन, जर्मनी आणि ऑस्ट्रियावर...

इंस्टाग्रामवर एका भारतीय प्रवाशाची युरोपियन ठिकाणांबद्दलची वैयक्तिक पोस्ट व्हायरल होत आहे. परंतु प्रवासी अनमोल रैना (@anmolraina13) च्या व्हिडिओने “नोएडा युरोपपेक्षा चांगले आहे”...

error: Content is protected !!