Homeशहरनवीन वेळापत्रकानुसार कंपनीने ई-बसेसचा पुरवठा करावा – मंत्री प्रताप सरनाईक

नवीन वेळापत्रकानुसार कंपनीने ई-बसेसचा पुरवठा करावा – मंत्री प्रताप सरनाईक

मुंबई, दि. ३० : प्रवाशांना दर्जेदार सुविधा मिळण्यासाठी शासन नेहमीच प्रयत्न करत असते. त्यानुसार इवे ट्रान्स प्रा. लि. कंपनीकडून ५१५०  ईलेक्ट्रीक बसेस भाडेतत्त्वावर घेण्याबाबत करार करण्यात आला. प्रवाशांना या बसेसच्या माध्यमातून सुविधा मिळण्यासाठी नवीन वेळापत्रकानुसार महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाला ई- बसेसचा पुरवठा करावा, असे निर्देश परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिले.

मंत्रालयात आयोजित बैठकीत परिवहन मंत्री सरनाईक बस पुरवठ्याबाबत आढावा घेताना बोलत होते. बैठकीस अपर मुख्य सचिव संजय सेठी, परिवहन महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. माधव कुसेकर, कंपनीचे के. व्ही प्रदीप आदी उपस्थित होते. बस पुरवठादार कंपनीने दिलेल्या वेळापत्रकानुसार बस पुरवठा करणे अपेक्षित असल्याचे सूचित करीत मंत्री सरनाईक म्हणाले, कंपनीने दिलेल्या बसेसचा चालनीय तोटा लक्षात घेता, राज्य शासनाकडून निधी मिळण्यासाठी व्यवहार्यता अंतर अर्थपुरवठ्यासाठी (viability gap funding) चा प्रस्ताव पाठविण्यात यावा. कंपनीने आतापर्यंत २२०  बसेसचा पुरवठा केला आहे. उर्वरित पुरवठा सुधारित करारानुसार करण्यासाठी कंपनीने नियोजन करावे.

बैठकीनंतर माध्यमांशी संवाद साधताना मंत्री सरनाईक म्हणाले, भाडेतत्वावर कंपनीने ५१५०  ईलेक्ट्रीक बसेस पुरवठा करण्याचा करार आहे. त्यापैकी २२०  बसेसचा पुरवठा करण्यात आला आहे. यामध्ये १२  मीटर व ९  मीटर लांबीच्या बसेस आहेत. महामंडळाने विभागनिहाय नवीन खाते तयार करून इलेक्ट्रीक बसच्या उत्पन्नामधून कंपनीला बिलांची रक्कम देण्यात येत आहे. त्यानुसार ६०  कोटी रूपये कंपनीला देण्यात आले आहे. उर्वरित ४०  कोटी रक्कम देण्याचे नियोजन करण्यात आले आहे. महामंडळाला १२ मीटर बस चालविताना प्रति किलोमीटर १२ रूपये आणि ९  मीटर बस चालविताना १६  रूपये प्रति किलोमीटर तोटा ग्राह्य धरून पुढील काही वर्षात ३१९१  कोटी रूपयांचा तोटा सहन करावा लागणार आहे. यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत बैठक घेऊन निर्णय घेण्यात येईल, अशी माहिती मंत्री सरनाईक यांनी दिली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अनंतराव थोपटे यांचे निधन पुणे बातम्या

पुणे : माजी राज्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ सदस्य अनंतराव थोपटे यांचे गुरुवारी दीर्घ आजाराने पुण्यातील खासगी रुग्णालयात निधन झाले. ते ९३ वर्षांचे...

‘चार जणांच्या कुटुंबात, आम्ही सर्व एकाच स्वप्नात जगलो’: केएस भरतने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा...

भारताचे केएस भरत (पीटीआय फोटो/आर सेंथिलकुमार) भारतीय यष्टीरक्षक-फलंदाज केएस भरतने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे, ज्याने त्याला देशासाठी सात कसोटी सामने खेळताना...

वेस्टर्न एक्स्प्रेस हायवेवर बेस्ट बसने दिलेल्या धडकेत ॲप कॅब चालकाचा मृत्यू झाला

मालाड पूर्व येथे पश्चिम द्रुतगती महामार्गावर बेस्ट बसने धडक दिल्याने ॲप कॅब चालकाचा मृत्यू झालामालाड पूर्व येथे पश्चिम द्रुतगती महामार्गावर बेस्ट बसने धडक...

घोषणेनंतर चार वर्षांनी, रांजणगाव येथील इलेक्ट्रॉनिक क्लस्टरमध्ये पायाभूत कामांना वेग आला

297 एकरांमध्ये पसरलेल्या या प्रकल्पात एकूण 492 कोटी रुपयांची गुंतवणूक आहे, ज्यामध्ये MIDC 285 कोटी आणि केंद्राचा 208 कोटी रुपयांचा वाटा आहे. पुणे...

व्यक्तिमत्व चाचणी: तुम्ही ग्राउंड, भावनिकदृष्ट्या दूर, स्वप्न पाहणारे, बंडखोर, नियंत्रण करणारे, संवेदनशील, तापट किंवा...

आपल्यापैकी बऱ्याच जणांना वाटते की आपल्याला काही विशिष्ट रंग “आवडतात”, परंतु बऱ्याचदा, आपण ज्या शेड्स काढल्या जातात त्या आपल्या आंतरिक जगाबद्दल आपल्या...

error: Content is protected !!