Homeशहरनगरसेवक चंद्रशेखर यादव यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य मोफत आरोग्य व नेत्र तपासणी शिबिरास...

नगरसेवक चंद्रशेखर यादव यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य मोफत आरोग्य व नेत्र तपासणी शिबिरास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

उल्हासनगर दि. १९ ( प्रमोद दळवी )  : नगरसेवक चंद्रशेखर यादव यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसेना मध्यवर्ती कार्यालय, मराठा विभाग ३२, उल्हासनगर-४ येथे आयोजित करण्यात आलेले मोफत आरोग्य शिबिर, मोफत नेत्र तपासणी शिबिर, मोफत चष्मे वाटप तसेच मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया नोंदणी व उपचार उपक्रम मोठ्या उत्साहात आणि यशस्वीरित्या संपन्न झाले. या लोकहिताच्या उपक्रमाला परिसरातील नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

शिबिरामध्ये मोठ्या संख्येने नागरिकांनी सहभाग नोंदवत विविध आरोग्य तपासण्यांचा लाभ घेतला. नेत्रतज्ज्ञांकडून नागरिकांची नेत्र तपासणी करण्यात आली. गरजू लाभार्थ्यांना मोफत चष्म्यांचे वाटप करण्यात आले. तसेच मोतीबिंदूने ग्रस्त रुग्णांची मोफत शस्त्रक्रियेसाठी नोंदणी करून आवश्यक वैद्यकीय मार्गदर्शन करण्यात आले. या समाजोपयोगी उपक्रमामुळे अनेक गरजू नागरिकांना वेळेत आरोग्य सेवा उपलब्ध झाली. विशेषतः ज्येष्ठ नागरिकांनी या उपक्रमाचे मनापासून स्वागत करत आयोजकांचे आभार व्यक्त केले. नागरिकांकडून मिळालेला उत्स्फूर्त प्रतिसाद हा शिवसेनेवरील विश्वास, जनतेशी असलेले घट्ट नाते आणि समाजसेवेप्रती असलेली बांधिलकी अधोरेखित करणारा असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.

शिबिर यशस्वी करण्यासाठी शिवसेना मध्यवर्ती कार्यालयाचे सर्व पदाधिकारी, महिला आघाडी, युवा सेना पदाधिकारी, शिवसैनिक तसेच सर्व कार्यकर्त्यांनी अथक परिश्रम घेतले. त्यांच्या समन्वय आणि मेहनतीमुळे हा लोकहिताचा उपक्रम सुरळीत व यशस्वीरीत्या पार पडला. अशी माहिती उल्हासनगर (पूर्व) शिवसेना शहर प्रमुख सचिन कदम  यांनी दिली. यावेळी आयोजकांनी शिबिरासाठी सहकार्य करणाऱ्या सर्व वैद्यकीय तज्ज्ञ, स्वयंसेवक, कार्यकर्ते आणि उपस्थित नागरिकांचे मनःपूर्वक आभार मानले. भविष्यातही अशाच समाजोपयोगी आणि जनकल्याणकारी उपक्रमांच्या माध्यमातून नागरिकांच्या सेवेसाठी शिवसेना कायम कार्यरत राहील असा विश्वास व्यक्त करण्यात आला.

पक्षप्रमुख तथा महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, कार्यसम्राट व संसदरत्न, खासदार. डॉ. श्रीकांतजी शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे, उपजिल्हाप्रमुख तथा गटनेते अरुण आशान, महानगरप्रमुख राजेंद्र चौधरी, शहरप्रमुख (उल्हासनगर पूर्व) सचिन कदम, महिला शहर संघटक. सौ. मनिषा भानुशाली ताई यांच्या नेतृत्वाखाली या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराला नगरसेविका सौ. लीलाबाई आशान (माजी महापौर), मा. नगरसेवक राजेश चानपूर,. नगरसेविका सौ. साक्षी सुर्वे, नगरसेवक सुरज सोनकांबळे, नगरसेविका सौ. ज्योत्स्ना जाधव, नगरसेविका सौ. कांता पवार,. नगरसेवक प्रदीप गोडसे, , शिवसेना विभाग प्रमुख अनिल मराठे, उपविभागप्रमुख, शाखाप्रमुख, उपशाखाप्रमुख, युवा सेना, महिला आघाडी, सर्व पदाधिकारी, शिवसैनिक, सामाजिक संस्था, यांनी उपस्थिती दर्शवली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

मुंबईतील तिघांची मलंगगडावरून सुटका झाली आणि ट्रेकचा प्रयत्न केल्यावर त्यांनी रिल्सवर पाहिले

कल्याण : मुंबईतील मालाड येथील तीन तरुण रविवारी रात्री उशिरा अंबरनाथमधील मलंगगडाच्या उतारावर सोशल मीडियाच्या रील्सवरून प्रेरित होऊन ट्रेक करताना अडकल्याने त्यांची...

पुरवठा कमी झाल्याने अंड्याच्या किमतीत वाढ होते, पोल्ट्री फीडची किंमत वाढते

घाऊक बाजारात अंड्याचा भाव 1 जुलैला 7.20 रुपये प्रति नग होता तो 20 जुलैला 7.80 रुपये झाला. पुणे: पोल्ट्री फीडचा वाढता खर्च, कडक...

अमेरिकेत ‘N’ ने सुरू होणारी फक्त 8 राज्ये आहेत आणि प्रत्येक एक अद्वितीय प्रवास...

FIFA विश्वचषक 2026 नंतर युनायटेड स्टेट्समध्ये रोड ट्रिपची योजना आखणाऱ्यांसाठी, आम्हाला तुमच्यासाठी एक मनोरंजक यादी मिळाली आहे. "N" अक्षराने सुरू होणारी फक्त...

उल्हासनगरातील जिजामाता कॉलनीतील कल्व्हर्टच्या निकृष्ट कामावर नागरिकांचा संताप; तातडीने अभियंत्यांकडून पाहणी करून योग्य पद्धतीने...

उल्हासनगर दि . २० ( प्रमोद दळवी ) : जिजामाता कॉलनी परिसरात सुरू असलेल्या कल्व्हर्ट (Culvert) बांधकामावर परिसरातील नागरिकांनी गंभीर आक्षेप घेत निकृष्ट दर्जाचे...

खन्ना 26 जुलै रोजी एआयटीएच्या विशेष सर्वसाधारण सभेला उपस्थित राहणार आहेत

पुणे: आश्चर्यकारक घडामोडींमध्ये, दिग्गज प्रशासक अनिल खन्ना 26 जुलै रोजी नवी दिल्ली येथे अखिल भारतीय टेनिस असोसिएशन (AITA) च्या असाधारण सर्वसाधारण सभेला...

error: Content is protected !!