उल्हासनगर दि.१६( प्रमोद दळवी ) : उल्हासनगर महापालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५ ची आरक्षण सोडत नुकताच जाहीर झाली. या आरक्षणात उल्हासनगरातील महिला उमेदवारांना मोठी संधी देण्यात आली आहे. उल्हासनगर शहरात २० प्रभागातून ७८ नगरसेवक निवडीसाठी ही निवडणूक प्रक्रिया पार पडणार आहे. त्यात अनुसूचित जाती वर्गातील १३ , अनुसूचित जमातीसाठी १ , मागासवर्गीय वर्गासाठी २१ व सर्वसाधारण वर्गातून ४३ अशा सदस्यांचा समावेश आहे. निवडणुकीच्या रिंगणात उतरण्यासाठी आतापासूनच विविध राजकीय पक्षांनी तारेवरची कसरत सुरू केली आहे. या निवडणुकीत आजी-माजी नगरसेवक मोठ्या संख्येने उतरणार आहेत. त्यांच्यासमोर मोठ्या संख्येने नवीन उमेदवार देखील निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत. आपल्याला पक्षाचे तिकीट मिळावे याकरिता आत्तापासूनच उल्हासनगर शहरात हालचाली वेगाने सुरू झाले आहेत. तर काही उमेदवार या पक्षातून दुसऱ्या पक्षात देखील उड्या घेत आहेत. आरक्षण सोडत जाहीर झाल्यापासून या पक्षातून दुसऱ्या पक्षात प्रवेश प्रक्रिया मोठ्या संख्येने सुरू झाले आहेत.
शहरात जवळपास अनेंकवेळा निवडून आलेले बरेच नगरसेवक आहेत. या नगरसेवकांना निवडणुकीचा दांडगा अनुभव आहे. निवडणुकीत डावपेच कसा खेळायचा यात देखील ते तरबेज आहेत. त्यामुळे आशा आजी-माजी नगरसेवकांसमोर निवडणुकीच्या रिंगणात उतरणारे नवीन चेहीरे टिकणार का हे देखील या निवडणुकीत पाहायला मिळणार आहे. खरंतर जे नगरसेवक बराच वेळा आपल्या प्रभागातून निवडून आलेले आहेत. याशिवाय जनतेने त्यांना वारंवार निवडून दिले आहे. त्या नगरसेवकांनी आपल्या प्रभागात विकासाची काम केलेत का? किंवा त्यांचे विकास कामे पाहून त्यांना जनतेनेच निवडून दिले का, व पुन्हा जनता त्यांना स्वीकारेल का, नवीन चेहऱ्यांना संधी देतील का असे अनेक प्रश्न सर्वांनाच आता पडू लागले आहेत. काही प्रभागात तर विकास कामे झालेली दिसून येत नाहीत. त्यात रस्त्यांची दुरवस्था, पाण्याची गंभीर समस्या, व नागरिकांच्या इतर मूलभूत सुविधा यादेखील झाल्या नसल्याचे दिसून येत आहेत. तरीदेखील त्या प्रभागातले आजी-माजी नगरसेवक निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहे. काही आजी-माजी नगरसेवक तर निवडणुकीच्या आधी विकास कामाला सुरुवात करतात की आम्ही प्रभागातील विकास कामे करत आहे. भोळी भाबडी जनता देखील त्यांच्यावर विश्वास ठेवत पुन्हा तोच तोच चेहरा निवडून आणते. पण या जनतेने देखील परिवर्तन घडवून आणायला हवे. नवीन चेहरा देखील संधी द्यायला हवी.
शहरातील काही प्रभागात कशा पद्धतीचा विकास झालाय हे पाहिलं तर जनता पुन्हा तो चेहरा का निवडून देते असाही प्रश्न पडल्याशिवाय राहणार नाही. याशिवाय आत्ताच्या निवडणुकीच्या रिंगणात उतरणारे काही नगरसेवकांनी पन्नाशी पार केली आहे. खरंतर चार-पाच वेळेस निवडून आलेल्या आजी-माजी नगरसेवकांनी आता नवीन चेहऱ्यांना संधी द्यायला हवी असे मत सुभाष टेकडीतील समाजसेवक संजय वाघमारे यांनी व्यक्त केले. त्यांनी उल्हासनगरातील मतदार जनतेला आव्हान केले की दर वेळेस तेच तेच चेहरे निवडून देण्यापेक्षा यावेळी शहरातील नवीन चेहऱ्यांना संधी देऊन बघा. शहरातील विकास कामांमध्ये कसा परिवर्तन होईल हे देखील आपल्याला दिसून येईल. त्यामुळे येणाऱ्या या निवडणुकीत मतदार जनतेने कोणत्याच भूलथापांना बळी न पडता आपला योग्य मत योग्य मतदारालाच द्या. याशिवाय नवीन चेहऱ्यांना देखील संधी द्या. असे कळकळीचे आवाहन केले आहे. खरंतर आजी-माजी नगरसेवकांनी ज्यांना निवडणुकीचा दांडगा अनुभव आहे. याशिवाय विकास कामे करण्यात ते तरबेज आहेत आशा आजी-माजी नगरसेवकांनी नवीन चेहऱ्यांना मार्गदर्शन करायला हवे असेही मत संजय वाघमारे यांनी व्यक्त केले





























