Homeशहरजागतिक पर्यावरण दिनानिमित्त वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात संपन्न

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात संपन्न

ठाणे दि.७ : जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून ज्ञानगंगा कॉलेज ऑफ फार्मसीच्या रोटरॅक्ट क्लबतर्फे वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले  होते . या कार्यक्रमात महाविद्यालयाचे पदाधिकारी, प्राध्यापकवृंद व विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.

कार्यक्रमाची सुरुवात रोटरॅक्ट समन्वयक प्राध्यापिका सौ. नीलम जगदाळे मॅडम यांच्या स्वागतपर भाषणाने झाली. त्यांनी वृक्षारोपणाचे महत्त्व विषद करून उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले. यावेळी संस्थेचे अध्यक्ष डॉ. बी. डी. पाटील सर, रोटरॅक्ट सदस्य श्री. राजीव दिवाण सर, जनसंपर्क अधिकारी श्री. अनिल आठवले सर, रोटरॅक्ट समन्वयक श्री. हेमंत ढाकणे सर तसेच प्राचार्य डॉ. भारत टेकाडे सर उपस्थित होते. यानंतर कार्यक्रमाचे सूत्र प्रकल्प प्रमुख श्री. निखिल जुवार्गी यांनी हाती घेतले. त्यांनी वृक्षारोपणाचे पर्यावरणीय महत्त्व सांगत विद्यार्थ्यांनी लावलेल्या रोपांचे संगोपन व संरक्षण करण्याची जबाबदारी स्वीकारावी, असे आवाहन केले.

वृक्षारोपण मोहिमेचा शुभारंभ संस्थेचे अध्यक्ष डॉ. बी. डी. पाटील सर यांच्या हस्ते शेवग्याचे रोप लावून करण्यात आला. यावेळी त्यांनी पर्यावरण संवर्धनाचे महत्त्व अधोरेखित करत अधिकाधिक वृक्ष लागवड करण्याची आवश्यकता व्यक्त केली. त्यानंतर अनिल आठवले सर, राजीव दिवाण सर आणि डॉ. भारत टेकाडे सर यांनी वृक्षारोपण केले. त्यानंतर प्राध्यापकवृंद व विद्यार्थ्यांनी विविध रोपे लावून पर्यावरण संरक्षणासाठी आपली बांधिलकी व्यक्त केली. कार्यक्रमानंतर सर्व मान्यवर, शिक्षक व विद्यार्थ्यांनी समूह छायाचित्रे काढून या उपक्रमाची आठवण जपली. शेवटी आभार प्रदर्शन करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. हा उपक्रम पर्यावरण संवर्धनाचा संदेश देणारा ठरला असून विद्यार्थ्यांमध्ये वृक्षसंवर्धनाविषयी जागरूकता निर्माण करण्यास मोलाची मदत झाली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

सेव्हनहिल्सचा प्रस्ताव मंजुरीसाठी परत आला आहे, कारण बीएमसी नवीन प्रवर्तकाच्या अंतर्गत रुग्णालयाचे पुनरुज्जीवन करू...

सेव्हनहिल्स रुग्णालयाच्या पुनरुज्जीवन योजना BMC रुग्णांसाठी 300 खाटांचे आश्वासन देते रिचा पिंटोमुंबई: मरोळ येथील विस्तीर्ण सेव्हनहिल्स हॉस्पिटल कॅम्पस कॅप्री ग्लोबल व्हेंचर्स प्रायव्हेट लिमिटेडकडे...

कल्याणीनगर वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी तीन नवीन रस्ते लिंक | पुणे बातम्या

कल्याणीनगर आणि वडगाव शेरी येथील रहिवाशांनी नगरसेवक योगेश मुळीक यांची भेट घेऊन त्यांच्या समस्या मांडल्या.कल्याणीनगर आणि वडगाव शेरी येथील रहिवाशांनी नगरसेवक योगेश मुळीक...

‘तुम्ही १-२ खेळ घेऊ शकत नाही’: माजी क्रिकेटपटूचा रोहित शर्मा आणि विराट कोहलीला स्पष्ट...

भारताचा रोहित शर्मा आणि विराट कोहली (ANI फोटो) विराट कोहली आणि रोहित शर्माच्या एकदिवसीय भविष्याभोवती वादविवाद सुरू असूनही दोघांनीही भारतासाठी डिलिव्हरी सुरू ठेवली...

गौर गोपाल दास कोट: गौर गोपाल दास यांचे आजचे कोट: “भूतकाळात गोष्टी चुकीच्या झाल्या...

फोटो: गौर गोपाल दास/ @gaurgopald/ X प्रत्येक व्यक्तीचा एक भूतकाळ असतो, आणि अशा अनेक घटना घडल्या असतील ज्या नियोजित प्रमाणे घडल्या असतील तर...

NCW चेअरपर्सन महिलांना आर्थिक वाढीसाठी AI वापरण्याचे आवाहन करतात | पुणे बातम्या

विश्वकर्मा विद्यापीठाने राष्ट्रीय महिला आयोगाने आयोजित केलेल्या यशोदा एआय 2.0 कार्यक्रमाचे आयोजन केले होते. अध्यक्षा विजया रहाटकर, उपसंचालक रामावतार सिंग, जिल्हा ग्रामीण विकास...

error: Content is protected !!