Homeशहरजागतिक तंबाखू मुक्ती दिनानिमित्त मंत्रालयात जनजागृती

जागतिक तंबाखू मुक्ती दिनानिमित्त मंत्रालयात जनजागृती

  • तंबाखूसेवनाने विविध आजारांना निमंत्रण: राज्यभर तंबाखू प्रतिबंध उपक्रम

मुंबई दि. ३०: जागतिक तंबाखू मुक्ती दिनानिमित्त सामाजिक न्याय विभागाअंतर्गत कार्यरत नशाबंदी मंडळामार्फत राज्यभर तंबाखू प्रतिबंध उपक्रम राबविण्यात येत आहे. तंबाखूच्या सेवनामुळे होणाऱ्या गंभीर आजारांविषयी जनजागृती करत लोकांना नशा मुक्त जीवन जगण्याचे आवाहन या उपक्रमात करण्यात आले.

याचे उद्घाटन आरोग्य विभागाचे सचिव निपुण विनायक यांच्या हस्ते मंत्रालयात झाले. मुंबईतील केईएम रुग्णालय, सायन रुग्णालय व सेंट जॉर्ज रुग्णालयातील डॉक्टरांच्या उपस्थितीत नागरिकांना तंबाखू व इतर व्यसनांच्या दुष्परिणामांविषयी सखोल माहिती देण्यात आली.या कार्यक्रमात तंबाखू, धूम्रपान, अल्कोहोल व ड्रग्सच्या व्यसनांपासून मुक्त होण्यासाठी विविध उपाययोजनांची माहिती देण्यात आली. व्यसनमुक्तीसाठी सल्ला व मार्गदर्शन केंद्रांची स्थापना, ‘मॅजिक जार’ संकल्पना, तसेच सतत तणावाखाली राहणाऱ्यांसाठी समुपदेशन सुविधा यांसारखे उपक्रम यावेळी राबविण्यात आले.

यावेळी तज्ज्ञांनी सांगितले की, तंबाखूमुळे केवळ कर्करोग होण्याची शक्यता वाढत नाही तर मेंदूच्या कार्यावरही त्याचा विपरित परिणाम होतो. त्यातील निकोटीन हे रसायन शरीरातील इन्सुलिनचे प्रमाण कमी करते, ज्यामुळे मधुमेहाचा धोका वाढतो. धूम्रपान करणाऱ्यांचे फुफ्फुस इतरांच्या तुलनेत कमी कार्यक्षम असते, तर अल्कोहोलच्या अतिसेवनाने यकृताचे विकार उद्भवू शकतात.

या उपक्रमात व्यसनमुक्ती केंद्र, मराठवाडा ग्रामीण विकास संस्था, सलाम मुंबई फाउंडेशन यांसारख्या अनेक नशामुक्ती संस्थांनी सक्रिय सहभाग नोंदवला. विविध सादरीकरणे व खेळांच्या माध्यमातून या संस्थांनी व्यसनमुक्तीचा संदेश लोकांपर्यंत पोहोचवला. तंबाखू विक्रीवरील कायदेशीर मर्यादा, प्रतिबंधात्मक उपाययोजना आणि शाळा, महाविद्यालये तसेच गर्दीच्या ठिकाणी वर्षभर राबविण्यात येणाऱ्या जनजागृती उपक्रमांची माहितीही यावेळी देण्यात आली.राज्य नशाबंदी मंडळाच्या पुढाकाराने राबविण्यात आलेला हा उपक्रम तंबाखूविरोधी लढ्यास नवे बळ देणारा ठरला असून, नागरिकांनीही या मोहिमेत सहभागी होऊन स्वतःच्या आरोग्यासाठी तंबाखूला नकार द्यावा, असे आवाहनही करण्यात आले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

‘चार जणांच्या कुटुंबात, आम्ही सर्व एकाच स्वप्नात जगलो’: केएस भरतने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा...

भारताचे केएस भरत (पीटीआय फोटो/आर सेंथिलकुमार) भारतीय यष्टीरक्षक-फलंदाज केएस भरतने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे, ज्याने त्याला देशासाठी सात कसोटी सामने खेळताना...

वेस्टर्न एक्स्प्रेस हायवेवर बेस्ट बसने दिलेल्या धडकेत ॲप कॅब चालकाचा मृत्यू झाला

मालाड पूर्व येथे पश्चिम द्रुतगती महामार्गावर बेस्ट बसने धडक दिल्याने ॲप कॅब चालकाचा मृत्यू झालामालाड पूर्व येथे पश्चिम द्रुतगती महामार्गावर बेस्ट बसने धडक...

घोषणेनंतर चार वर्षांनी, रांजणगाव येथील इलेक्ट्रॉनिक क्लस्टरमध्ये पायाभूत कामांना वेग आला

297 एकरांमध्ये पसरलेल्या या प्रकल्पात एकूण 492 कोटी रुपयांची गुंतवणूक आहे, ज्यामध्ये MIDC 285 कोटी आणि केंद्राचा 208 कोटी रुपयांचा वाटा आहे. पुणे...

व्यक्तिमत्व चाचणी: तुम्ही ग्राउंड, भावनिकदृष्ट्या दूर, स्वप्न पाहणारे, बंडखोर, नियंत्रण करणारे, संवेदनशील, तापट किंवा...

आपल्यापैकी बऱ्याच जणांना वाटते की आपल्याला काही विशिष्ट रंग “आवडतात”, परंतु बऱ्याचदा, आपण ज्या शेड्स काढल्या जातात त्या आपल्या आंतरिक जगाबद्दल आपल्या...

आयटी फर्मच्या हिंजवडी शाखेने प्रोजेक्टशिवाय अनेक फ्रेशर्सना कामावर घेतले, सरकारच्या आयटी कॉन्ट्रॅक्टवर डोळा: हिंजवडी...

सीईओला मंगळवारी त्यांच्या नाशिकमधील आडगाव येथील निवासस्थानातून ताब्यात घेण्यात आले आणि रात्री त्यांना पुण्यात आणण्यात आले, त्यानंतर बुधवारी फसवणूक प्रकरणात त्यांना औपचारिक अटक...

error: Content is protected !!