( प्रमोद दळवी )
उल्हासनगर दि.१६ : सद्गुरु साई अमरदास साहिब यांच्या ८६ व्या वर्षी महोत्सव व दरवेश बाबा साई परमानंद साहिब यांच्या चतुर्थ वर्षी महोत्सव निमित्ताने उल्हासनगरात श्रीमद् भागवत सप्ताह ज्ञान यज्ञ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. शुक्रवारी या सप्ताह सुरुवात झाली. दुपारी कलश यात्रा काढल्यावर सायंकाळी ५ वाजता या कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. श्री इंद्रेश उपाध्याय महाराज यांचे श्रीमद् भागवत सप्ताह ज्ञान यज्ञ या कार्यक्रमात प्रवचन, कथा १६ मे २०२५ ते २२ मे २०२५ पर्यंत रोज सायंकाळी ५ वाजता होणार आहे.

श्रीमद् भागवत सप्ताह ज्ञान यज्ञाचा कार्यक्रम उल्हासनगरातील कॅम्प – ५ परिसरातील पुज साई बसणशाहा दरबार, आसाऊतड रोहिरी वाले मंदिर येथे सुरू झाला आहे. अशी माहिती गादीनसीन हुजुरी रूप बाबा साई कालीराम साहेबजी यांनी ही माहिती दिली. उल्हासनगरातील भक्तगणांनी या श्रीमद् भागवत सप्ताह ज्ञान यज्ञ कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आव्हान गादीनसीन हुजुरी रूप बाबा साई कालीराम साहेबजी यांनी केले आहे.





























