Homeशहरउल्हासनगरात रोजंदारीवर काम करणाऱ्या सफाई कर्मचाऱ्यांची चक्क नाल्यात बसून नालेसफाई

उल्हासनगरात रोजंदारीवर काम करणाऱ्या सफाई कर्मचाऱ्यांची चक्क नाल्यात बसून नालेसफाई

उल्हासनगर दि. २४ ( प्रमोद दळवी )  : पावसाळा सुरू व्हायला मोजकेच दिवस उरले असून उल्हासनगर महानगरपालिकेने मोठ्या नाल्यांची सफाई जेसीबी मशीन द्वारे सुरू केली आहे. शहरात अनेक छोट्या नाल्या देखील आहेत. दरवर्षी काही प्रभागातील नाल्यातील सांडपाणी नागरिकांच्या घरात शिरत असते. याशिवाय ज्या नाल्यांची पूर्णपणे साफसफाई केली जात नाही. पावसाळ्यात त्या नाल्या परिसरातील नागरिकांसाठी धोकादायक ठरत असतात. पावसाळा सुरू होण्याआधी सफाई कर्मचाऱ्यांच्या मदतीने मुकादम प्रत्येक प्रभागातील नालेसफाई करून घेत असतात. या नालेसफाईला त्यांना रोजंदारीवर काम करणाऱ्या काही कर्मचाऱ्यांची गरज भासत असते. पण रोजंदारीवर काम करणारे हे कर्मचारी ज्या पद्धतीने नालेसफाई करत असतात ती नालेसफाई कायमस्वरूपी काम करणारे सफाई कर्मचारी देखील करू शकत नाही. हे उल्हासनगर शहरातील सुभाष टेकडी परिसरात नुकताच नालेसफाईच्या कामावरून दिसून आले.

उल्हासनगर शहरातील कॅम्प नंबर -४ परिसरातील सुभाष टेकडी येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौका जवळील नायडू यांच्या निवासस्थान जवळ भला मोठा वाहणारा नाला आहे. दरवर्षी पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे या नाल्याची अत्यंत दुरवस्था झाली आहे. नाल्याचे कठाडेही तुटलेले आहेत. पावसाळ्यात या नाल्यातून वाहणाऱ्या सांडपाण्यामुळे त्या परिसरातील नागरिकांच्या घराला धोका निर्माण होतो. जवळपास अनेक भागातून या नाल्यात सांडपाणी वाहून येत असते . गेल्या अनेक वर्षांपासून या नाल्याची दुरुस्ती ही करण्यात आली नाही. पण पावसाळा सुरू होण्याआधी या नाल्याची सफाई मात्र केली जाते.

नुकताच सुभाष टेकडीतील सफाई मुकादमाने  अशोक वन परिसरातील या नाल्याची रोजंदारीवर कर्मचारी लावून नाल्याची पूर्णपणे साफसफाई करून घेतली. त्यावेळी रोजंदारीवर काम करणाऱ्या सफाई कर्मचाऱ्यांनी चक्क अति उकाडा असल्याने भर उन्हात अर्ध्या कपड्यावरच नाल्यामध्ये उतरून सफाई सुरू केली. या नाल्या मधील मोठमोठ्या दगडी गाळामध्ये रुतून बसल्याने नाल्यातील प्रवाह व्यवस्थित होत नव्हता. त्यामुळे या रोजंदारीवर काम करणाऱ्या सफाई कर्मचाऱ्यांनी चक्क नाल्यात बसून नाल्यातील घाण व मोठमोठ्या दगडी बाहेर काढल्या. इतक्या चांगल्या पद्धतीने साफसफाई या नाल्याची झाल्यामुळे आता या नाल्याने मोकळा श्वास घेतला आहे. पण नाल्याची झालेली दुरावस्था मात्र पालिकेला दिसत नाही. तुटलेल्या नालीच्या कठड्यामुळे दरवर्षी पावसाळ्यात त्या परिसरात तलावाचे स्वरूप दिसून येत असते. याशिवाय तो रस्ता पाण्याखाली जात असल्यामुळे त्या परिसरातील नागरिकांना गुडघ्यावर पाण्यातूनच बाहेर पडावे लागते. खरंतर पावसाळा सुरू होण्याआधी या नाल्यांची दुरुस्ती होणे गरजेचे होतं. पण नाल्याची ही दुरावस्था पालिकेला तर दिसत नाहीच पण स्थानिक निवडून आलेल्या नगरसेवकांना देखील दिसून येत नसल्यामुळे नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

भारत महिला वि बांगलादेश महिला लाइव्ह स्कोअर, महिला T20 विश्वचषक 2026: भारत बांगलादेशचा सामना...

भारत महिला वि बांगलादेश महिला लाइव्ह स्कोअर, महिला T20 विश्वचषक 2026: मधल्या फळीतील फलंदाजीतील संकटे आणि आळशी क्षेत्ररक्षणामुळे त्यांची मोहीम रुळावरून घसरण्याची भीती असताना,...

आज 2% गुंतवणुकीसह भारताची हरित ऊर्जा हवामान-प्रूफिंग भारताच्या अक्षय ऊर्जा पाइपलाइनमध्ये $28 अब्ज नुकसान...

2030 पर्यंत, भारतातील नियोजित नूतनीकरणक्षम ऊर्जा पायाभूत सुविधांपैकी जवळजवळ 90% गंभीर हवामान आव्हानांना तोंड देऊ शकतात (प्रतिनिधी प्रतिमा) हवामान धोके 90% धोक्यात...

पहा: लोहगड किल्ला ढकलण्याच्या एक दिवस आधी, सिया गोयलने मंगेतर केतन अग्रवालच्या हत्येचा ‘प्लॅन’...

एक मंगेतर आणि तिच्या प्रियकराने स्थावर मालमत्ता संचालकाच्या हत्येची बारकाईने योजना आखली. सीसीटीव्ही फुटेजने त्यांची कॅफे मीटिंग उघड केली, जिथे त्यांनी त्याला लोहगड...

पुष्कळ पालकत्व चांगल्यापेक्षा जास्त नुकसान करते: ते काय आहे आणि 5 चिन्हे तुम्ही एक...

आपल्या मुलांनी आयुष्यात यशस्वी व्हावे अशी पालकांची इच्छा असते. मग ते शैक्षणिक असो, खेळ असो किंवा दैनंदिन मूल्ये असोत. मुलांसाठी, ते पालकांच्या पाठिंब्याने आणि...

नसरापूर बालिका बलात्कार-हत्या : पुणे न्यायालयाने ६५ वर्षीय वृद्धाला दोषी ठरवले, २९ जून रोजी...

आरोपी सीसीटीव्हीत कैद पुणे - जिल्ह्यातील भोर तालुक्यातील नसरापूर येथे 1 मे रोजी तीन वर्षांच्या मुलीचे अपहरण, बलात्कार आणि खून केल्याप्रकरणी पुण्यातील विशेष...

error: Content is protected !!