उल्हासनगर दि . २६ : महाराष्ट्र नवनिर्माण सेना उल्हासनगर शहर शाखेच्या वतीने रविवारी शहाड स्टेशन, म्हारळ डी -मार्ट रिक्षा स्टॅन्ड येतील सर्व रिक्षानां मी मराठी बोलतो.. मला मराठी समजते.. या माझ्या रिक्षात बसा असे स्टिकर लावण्यात आले. या आंदोलनाला रिक्षा चालकांनी सुद्धा चांगला प्रतिसाद दिला..

यावेळी जिल्हा अध्यक्ष बंडू देशमुख, उपशहर अध्यक्ष सचिन बेंडके, मुकेश शेठपलांनी वाहतूक सेनेचे शहर संघटक काळू थोरात, उपतालुका अध्यक्ष विवेक गंभीरराव योगेश पवार विभाग अध्यक्ष कैलास घोरपडे,देवा तायडे, नटवर वासिटा प्रशांत संनगाळे, प्रमोद पालकर,राजन चौहान अक्षय धोत्रे,अमोल पाटील,अशोक गरड, संदीप गरड,सचिन शिरसाठ,संतोष पायाळ,सचिन विभुते शोल्क बेंडके संकेत शिंदे,महेश रोडगे, तुकाराम थोरात यांच्यासह इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.





























