Homeशहरउल्हासनगरात तिरंगा रॅलीतून जवानांच्या शौर्याला सलाम

उल्हासनगरात तिरंगा रॅलीतून जवानांच्या शौर्याला सलाम

  • रॅलीत रिटायर आर्मी ,कर्मचारी देखील सहभागी
  • रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद.
  • काढण्यात आलेल्या रॅलीवर आणि मा. सैनिकांवर फुलांचा वर्षाव

( प्रमोद दळवी )

उल्हासनगर दि . १७ :  ऑपरेशन सिंदूर अंतर्गत पाकिस्तान आणि दहशतवाद्यांना जोरदार प्रत्युत्तर देणाऱ्या भारतीय लष्कराच्या शौर्याच्या सन्मानार्थ उल्हासनगर शहरात भाजप तर्फे तिरंगा रॅली काढण्यात आली होती. या काढण्यात आलेल्या रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणावाच्या पार्श्वभूमीवर भारतीय सेनेने ऑपरेशन सिंदूर अंतर्गत पहलगाम हल्ल्याचे यशस्वी प्रत्युत्तर दिले. या यशस्वी मोहिमेनंतर सैन्य दलाच्या शौर्याला सलाम करण्यासाठी काढण्यात आलेल्या उल्हासनगरातील रॅलीत हजारो नागरिक, भाजपचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. विशेष म्हणजे या रॅलीत रिटायर आर्मी ,कर्मचारी देखील सहभागी झाले होते. उल्हासनगर कॅम्प नंबर दोनच्या भाजप जनसंपर्क कार्यालयापासून तिरंगा रॅलीचा शुभारंभ करण्यात आला. गोल मैदान, नेहरू चौक मार्गे पुन्हा आमदार कार्यालयापर्यंत रॅलीची सांगता झाली.

यावेळी आमदार कुमार आयलानी यांनी जोरदार भाषण करत ऑपरेशन सिंदूरची यशस्वी कामगिरी केल्याबद्दल भारतीय सैन्य दलाचे व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कौतुक करुन तिरंगा रॅलीतून जवानांच्या शौर्याला सलाम केले . भाजपचे उल्हासनगर शहर जिल्हाध्यक्ष राजेश वाधारीया  यांनी सांगितले आतंकवादी यांनी २२  एप्रिल निर्दोष भारतीय टुरिस्टना गोळ्या घालून ठार केले होते. याचा बदला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आदेशाने तिन्ही सेनानी मिळून शंभरहून अधिक आतंकवादी यांना ठार केले. व पाकिस्तान मध्ये पडल्यावर त्यांचेही हड्डे उध्वस्त केले. आणि त्यांना असा सबक शिकवला परत कधी हिंदुस्थानावर नजर वर करून बघणार नाही. आजची तिरंगा यात्रा आम्ही जी काढली आहे तिन्ही भारतीय सेनेला सलाम करण्यासाठी काढली आहे. असे ते म्हणाले . या तिरंगा रॅलीमध्ये भारत माता की जय, भारत माता की जय असे नारे लावण्यात आले .

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) उल्हासनगर शहर जिल्हाध्यक्ष नाना बागुल यांनी  सांगतले पाकिस्तान मध्ये दहशतवाद्यांनी जो निष्पाप नागरिकांवर हल्ला केला. त्या हल्ल्याच्या निषेधार्थ देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र भाई मोदी यांनी एकदम सडेतोड उत्तर पाकिस्तानला दिलं आणि पाकिस्तानला अक्षरशः इतर देशांच्या लोकांकडे याचना करायला लागली की हे युद्ध थांबवा, आम्ही जे दहशतवादी असतील त्या दहशतवादी ना भारताच्या स्वाधीन करू, किंवा त्यांना मारण्याची परवानगी देऊ हा आपला मोठा विजय आहे तिन्ही सेनानी केलेल्या कामगिरीबद्दल रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने त्यांना सॅल्यूट करतो व ही रॅली त्या जवानांच्या शौर्याला सलाम करण्यासाठी काढण्यात आली असे नाना बागुल यांनी सांगितले. उल्हासनगर मध्ये काढण्यात आलेल्या रॅलीत रस्त्यावरील व्यापारी वर्गांनी या रॅलीवर आणि मा. सैनिक जे या रॅलीमध्ये सहभागी झाले होते त्यांच्यावर फुलांनी वर्षाव केला. या रॅलीत महिला वर्ग देखील मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

या तिरंगा रॅलीमध्ये आमदार कुमार आयलानी, जिलाध्यक्ष राजेश वधारिया, म.जिल्हा अध्यक्ष प्रदीप रामचंदानी, उद्योगपती व समाजसेवक राजा गेमनानी, सोनी भाटिया, गोपी वाधवाणी, बाबू ताराचंदानी, जमनु पुरस्वानी, मनोहर खेमचंदानी, नाना बागुल, प्रकाश माखीजा, डॉ प्रकाश नाथांनी, राजू जग्यासी, मनोज साधनांनी, अजित सिंग लबाना, राम चार्ली पारवानी,दीपक छतलानी,  अमित वाधवा, लक्खी नाथांनी,डॉ एस बी सिंग, बॉक्सर भाई यांच्यासह भाजपाचे पदाधिकारी कार्यकर्ते हजारोच्या संख्येने या तिरंगा रॅलीमध्ये सहभागी झाले होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

‘विश्वास बसत नाही’: वैभव सूर्यवंशी चकित झाल्यामुळे इंग्लंडचा माजी कर्णधार

वैभव सूर्यवंशी (एएनआय फोटो) इंग्लंडचा माजी कर्णधार मायकेल वॉन याने अलीकडच्या काही महिन्यांत या तरुणाची प्रभावी वाढ असूनही आयर्लंडविरुद्धच्या पहिल्या T20I सामन्यासाठी किशोरवयीन...

BMC engrs ने पदोन्नती नाकारली; चौकशीची मागणी केली

मुंबई: किमान दोन कार्यकारी अभियंता आणि आठ सहाय्यक अभियंत्यांनी अनुक्रमे उपमुख्य अभियंता आणि कार्यकारी अभियंता या पदांवर पदोन्नती नाकारली, पात्र असूनही, तर...

मान्सूनच्या पावसाने पुण्यातील भात रोपवाटिकांना संजीवनी दिली, शेतकऱ्यांनी शेततळे तयार करण्यास सुरुवात केली

भात रोपवाटिका ही लागवडीची गुरुकिल्ली आहे पुणे : गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाने पुणे जिल्ह्यातील भात रोपवाटिकांना पुनरुज्जीवित केले आहे, ज्यामुळे उशीर...

आजची तुर्की म्हण: “एक गोड जीभ त्याच्या छिद्रातून साप काढू शकते.” – सौम्य शब्दांनी...

दिवसाची तुर्की म्हण (गुगल मिथुन द्वारे व्युत्पन्न केलेली प्रतिमा) सापाला त्याच्या छिद्रातून बाहेर काढण्याचा प्रयत्न करत असलेले चित्र. ते लपलेले, सावध आणि चावण्यास...

बनावट आरटीओ चलन, पाईपद्वारे गॅस बिल फसवणुकीत पुण्यातील खासगी कंपनीच्या व्यवस्थापकाचे ११.६६ लाख रुपयांचे...

पुणे : बालेवाडीतील एका खाजगी कंपनीत काम करणाऱ्या 54 वर्षीय खरेदी व्यवस्थापकाने RTO ट्रॅफिक चलन आणि पाइप्ड गॅस बिलाच्या वेषात अज्ञातपणे दुर्भावनापूर्ण...

error: Content is protected !!