उल्हासनगर दि. २४ ( प्रमोद दळवी ) : योगसेवा चॅरिटेबल ट्रस्ट आणि स्वच्छ भारत योग केंद्र (SBYK) यांच्या संयुक्त विद्यमाने उल्हासनगर- ३ येथील राजावीर मंदिर परिसरात रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. मानवतेच्या सेवेचा संदेश देत, मोठ्या संख्येने रक्तदात्यांनी या शिबिरात उत्साहाने सहभाग घेतला.

याप्रसंगी आमदार कुमार आयलानी प्रामुख्याने उपस्थित होते. रक्तदात्यांना प्रोत्साहन देताना ते म्हणाले की, रक्तदान हे एक महान दान असून ते अनेक गरजू लोकांना नवीन जीवन देते. अशा सामाजिक उपक्रमांमुळे लोकांमध्ये सेवेची भावना आणि जागरूकता वाढते. शिबिरादरम्यान संस्थेचे अधिकारी, कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्वांनी या सामाजिक उपक्रमाची प्रशंसा केली आणि संस्थेच्या कार्याचे कौतुक केले. हा कार्यक्रम यशस्वीरित्या संपन्न झाला.





























