उल्हासनगर दि.१९ : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माध्यमातून महावितरणला लेखी,तोंडी,तसेच दूरध्वणीच्या माध्यमातून वारंवार पाठपुरावा करून सुद्धा महावितरण आपल्या कार्यपद्धतीत सुधारणा करायला तयार नाही.त्यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी आंदोलनाचा ईशारा देत महावितरणचे मुख्यअभियंता चिंतामणी मिश्रा याची भेट घेऊन दोन्ही विभागाच्या अधिकाऱ्यांची कानऊघडणी केली.
मनसे जिल्हा अध्यक्ष बंडू देशमुख व संजय घुगे यांनी सांगितलं की बरेच विजग्राहक एकवेळ आपल्या घरातील किराणा भरत नाहीत परंतु आपलं विज बिल मात्र वेळेवर भारतात.आपल्या विभागाकडून एखादया ग्राहकाच एक महिन्याच विजबील बाकी असेल तर त्या ग्राहकांच्या घराची किंवा दुकानाची विज कापली जाते.विजबील भरायला सातआठ दिवस उशीर झाला तर आपला विभाग ग्राहकांना दंड आकरतो,एखादा ग्राहका कडून अनावधानाने जर काही चूक झाली तर आपला विभाग त्या ग्राहकाच कुठलं म्हणणं ऐकून न घेता त्या ग्रहकांकडून दुपटी तिपटिने दंड वसुल करतो अन्यथा पोलीस कारवाईची धमकी दिली जाते.

आपला विभाग आर्थिक बाबतीत जर एवढा सक्त व तत्पर असेल तर मग ग्राहकांना सुरळीत विजपुरवठा करणे,ग्राहकांच्या तक्रारीची वेळेत दखल घेऊन त्यांना दिलासा देणे,ग्राहकांशी सौजण्याने वागणे व ग्राहकांना तेवढ्याच चांगल्या सेवा-सुविधा पुरवण्याच काम सुद्धा आपल्याच विभागाच आहे असं आमचं स्पष्ट मत आहे. आपल्या या रोजच्या वारंवार खंडित होणाऱ्या विज पुरवठयामुळे रुग्णालयातील व घरात असणारे रुग्ण,घरातील जेष्ठ नागरिक, काही नागरिकांच घरूनच केल जाणार ऑफिसच काम (work from home),मुलांचा अभ्यास याच्यावर तर परिणाम होतच आहे. परंतु नागरिकांच्या घरातील विजेवर चालणाऱ्या उपकरनांच सुद्धा मोठया प्रमाणात नुकसान होत आहे. उदरणार्थ घरातील फ्रीज,टीव्ही,मिक्सर,बल्प,,A/c च तसेच इतर इलेक्ट्रिक उपकारणांच शॉट होण्याचे प्रमाण सुद्धा वाढले.तसेच उल्हासनगर शहरात छोटे मोठे उद्योग मोठया प्रमाणात आहेत.व आपल्या सातत्याने विज पुरवठा खंडित होतं असल्यामुळे याचा परिणाम उल्हासनगर शहरातील छोटया मोठया उदयोग धंदयावर सुद्धा होतं यामुळे गारमेंट क्षेत्रात व लघु उदयोग क्षेत्रात काम करणाऱ्या व्यपारी व गोर – गरीब कामगारांच सुद्धा आर्थिक नुकसान होतं आहे.आपल्या या सातत्याने खंडित होणाऱ्या विज पुरवठयामुळे लाखो लोक त्रस्त आहेत पण आपल्या विभागाला याचं कुठली सोयर -सुतक नाही याचा आम्हाला खेद आहे. या बाबत नागरिक आपल्या कार्यालयात तक्रार करण्यासाठी आले असता आपल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचे उद्धट वर्तन पाहून नागरिकही हताश होतात.असं म्हणतात की ग्राहक देव असतो कदाचित आपले अधिकारी व कर्मचारी ग्राहकला देव मानत नसतील पण कमीतकमी आपल्या ग्राहकांन बरोबर तर उद्धट वर्तणूक तरी नको व्हायला याची दक्षता आपण व आपल्या विभागाने घ्यायला हवी असं आमचं स्पष्ट मत असल्याचे मनसेने सांगितले.

तसेच सध्या आपल्या विभागा कडून ग्राहकांना कोणतीही पूर्वसूचना न देता ग्राहकांच सुथितीत असलेले विजमीटर बदलून त्या जागी स्मार्टमिटर बसविण्याचे उदयोग सुरु आहेत.आपल्या म्हणण्या प्रमाणे महावितरण तोट्यात असतांना व ग्राहकांचे विज मिटर सुस्तिथी असतांना फक्त अदानी सारख्या उद्योजकला फायदा पोहचविण्यासाठी जर आपला विभाग हे सर्व करत असेल तर याला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा विरोध आहे.व आम्ही आपल्याला या निवेदनाच्या माध्यमातून विनंती करतो की एखादया ग्राहकांच विजमीटर नादुरुस्त असल्या शिवाय किंवा विज मिटर बाबत ग्राहकाची तक्रार असल्याशिवाय यापुढे एकही विज मिटर बदलण्यात येऊ नये अशी मागणी मनसे च्या वतीने बंडू देशमुख यांनी केली.
यासह मनसेच्या १ ) उल्हासनगर शहरात वारंवार खंडित होणारा विद्युत पुरवठा तात्काळ सुरळीत करण्यात यावा.२ ) उल्हासनगर शहरातील वर्षानुवर्षे जुने असलेले ट्रान्सफारमर तात्काळ बदलण्यात यावेत.शहरात नादुरुस्त असलेले ट्रान्सफार्मर,सडलेले विद्युतपोल तात्काळ बदलण्यात याव्यात.३ ) विज गाऱ्हाकाच्या लिखित परवानगी शिवाय स्मार्ट मिटर बसविण्यात येऊ नये. ४ ) उल्हासनगर शहरातील अनेक भागामध्ये जास्त लोड असतांना कमी क्षमतेचे ट्रान्फार्मर बसविण्यात आले आहेत त्यामुळे विदयुत पुरवठा सातत्याने ( पावर ) कमिजास्त होऊन नागरिकांच्या घरातील अनेक विद्युत उपकरनांचे नुकसान होतं आहे असे ट्रान्सफार्मर तात्काळ बदलण्यात यावेत. ५ ) आपल्या विभागा कडून विद्युत बिलांच वाटत वेळेत करण्यात यावं. ६ ) आपल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी ग्राहकांशी सौजण्याने वागावे. व गाऱ्हाकांच्या तक्रारी प्राधान्याने सोडवाव्यात.७ ) आपले महावितरणचे काही अधिकारी नवीन ईमारतींमध्ये,कारखान्यांमध्ये अनधिकृत पणे नवीन मिटर बसविण्याचे व ईतर महावितरण संबंधी कामाचे कंत्राट घेतात.इतर कोणी काम घेतल्यास नवीन ट्रान्सफारमर बसवावा लागेल असं सांगण्यात येत परंतु यांनी काम घेतलं की त्याचं ट्रान्सफारमर वरून लोड दिला जातो ही बाब निंदनीय आहे. अशा अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर सुद्धा कारवाई अपेक्षित आहे. आशा मागण्या करण्यात आल्या आहे .
यावेळी जिल्हा अध्यक्ष बंडू देशमुख,उपजिल्हा अध्यक्ष प्रदीप गोडसे, शहर अध्यक्ष संजय घुगे,मनविसे शहर अध्यक्ष वैभव कुलकर्णी,उपशहर अध्यक्ष सचिन बेंडके, मुकेश सेठपलांनी, रस्ते आस्थापनाचे महानगर संघटक मैनऊद्दीn शेख वाहतूक सेनेचे काळू थोरात,विभाग अध्यक्ष अनिल गोधडे, कैलास वाघ,कैलास घोरपडे, हितेश मेहरा,यांच्यासह राहुल राणे,दिपेश धरिवाल यांच्यासह इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.





























