Homeशहरउल्हासनगर शहराच्या विविध प्रलंबित प्रश्नांबाबत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच खासदार श्रीकांत शिंदे...

उल्हासनगर शहराच्या विविध प्रलंबित प्रश्नांबाबत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच खासदार श्रीकांत शिंदे यांच्या समवेत महत्त्वपूर्ण बैठक संपन्न

उल्हासनगर दि १७ ( प्रमोद दळवी ): महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच खासदार श्रीकांत शिंदे यांच्या समवेत मुंबई येथील नंदनवन येथे माजी आमदार पप्पू कलानी यांच्या नेतृत्वाखाली उल्हासनगर शहराच्या विविध प्रलंबित प्रश्नांबाबत महत्त्वपूर्ण बैठक संपन्न झाली.

सदर बैठकीस महानगर प्रमुख राजेंद्र चौधरी, जेष्ठ नगरसेवक जमनू पुरस्वनीजी, महेश सुखरमानीजी, कमलेश निकम, शिवाजी रगडे, सार्वजनिक बांधकाम सभापती दीप्ती नवीन दुधानी, माजी नगरसेवक सुरेश रमेश चैनानी तसेच इतर पदाधिकारी उपस्थित होते. या बैठकीत उल्हासनगर शहराच्या विकासकामांबाबत तसेच नागरिकांच्या मूलभूत सुविधांबाबत विविध विषय मांडण्यात आले.

महापौर अश्विनी कमलेश निकम यांच्या मागणी नुसार बैठकीत एमएमआरडीए अंतर्गत १०० कोटी रुपयांच्या प्रमुख रस्ते विकास कामांना मंजुरी देण्यास कार्यवाहीचे आदेश देण्यात आले. उल्हासनगर महानगरपालिकेच्या मुख्यालयाच्या नवीन इमारतीच्या बांधकामासंदर्भात तात्काळ आदेश देण्यात आले. अंबरनाथ, कोल्हापूर आणि पाचोरा परिसरातील रस्ता रुंदीकरणामुळे बाधित झालेल्या व्यापाऱ्यांना बजावण्यात आलेल्या नोटिसा थांबवून त्यांच्या पुनर्वसनाचा विचार करण्याचे ठरवण्यात आले.नगरसेविका सविता तोरणे रगडे यांच्या मागणीनुसार पॅनेल क्रमांक ११ व १२ मधील वाढत्या लोकसंख्येमुळे निर्माण झालेल्या पाणीटंचाईच्या समस्येवर तोडगा काढण्यासाठी एमआयडीसी कडून अतिरिक्त २ एमएलडी पाणीपुरवठा वाढविण्याचे आदेश देण्यात आले. तसेच आरोग्य सभापती सविता तोरणे रगडे यांच्या मागणीनुसार मध्यवर्ती रुग्णालयातील अपुऱ्या सुविधा लक्षात घेऊन ४०० खाटांच्या सुसज्ज रुग्णालयाची मागणी करण्यात आली.

यावर उपमुख्यमंत्री यांनी तात्काळ आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांच्याशी दूरध्वनीवर चर्चा करून दिनांक २० मे रोजी उल्हासनगरला  भेट देण्याच्या सूचना दिल्या. या बैठकीत उल्हासनगर शहराच्या विकासासंदर्भात अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले असून संबंधित विभागांना तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात आले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

सहा वर्षांच्या प्रतीक्षेनंतर महाने दीर्घकाळ प्रलंबित सहकारी गृहनिर्माण संस्थेचे नियम मंजूर केले

पुणे: सहा वर्षांहून अधिक विलंबानंतर आणि वर्षभराच्या सखोल विचारविनिमयानंतर, महाराष्ट्र सरकारने अखेर सुधारित महाराष्ट्र सहकारी संस्था नियमांना मंजुरी दिली आहे. या निर्णयामुळे...

IPL 2026: वैभव सूर्यवंशी स्क्रिप्ट इतिहास, सर्वाधिक सह भारतीय बनला…

राजस्थान रॉयल्सचा वैभव सूर्यवंशी (एपी फोटो/मनीष स्वरूप)" decoding="async" fetchpriority="high"/>राजस्थान रॉयल्सचा वैभव सूर्यवंशी (एपी फोटो/मनीष स्वरूप) रविवारी अरुण जेटली स्टेडियमवर दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध राजस्थान...

मुंबईचे दादर रेल्वे स्थानक सुरक्षा आणि कार्यक्षमता वाढवण्यासाठी इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंग प्रणाली सुरू करते

दादर इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंग सिग्नलिंग सिस्टम मुंबई : मुंबईच्या उपनगरीय रेल्वे नेटवर्कच्या आधुनिकीकरणाच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल म्हणून, दादर रेल्वे स्थानकाने रविवारी वितरित आर्किटेक्चरसह...

महसुली सुनावणी सुलभ करण्यासाठी, अर्ध-न्यायिक प्रकरणांमध्ये होणारा विलंब रोखण्यासाठी महाने SOP जारी केले

पुणेमहाराष्ट्र सरकारने शुक्रवारी महसूल विभागाच्या सुनावणीसाठी सर्वसमावेशक मानक कार्यप्रणाली (SOP) जारी केली, ज्याचा उद्देश अर्ध-न्यायिक कार्यवाही सुव्यवस्थित करणे आणि प्रकरणे वेळेत निकाली...

जूनच्या उष्णतेपासून बचाव करण्यासाठी दिल्लीपासून 500 किमीच्या आत 5 वीकेंड गेटवे

"टेकड्यांची राणी" म्हणून ओळखले जाणारे, मसुरी हे दिल्लीतील सर्वात लोकप्रिय वीकेंड गेटवेपैकी एक आहे - आणि चांगल्या कारणास्तव. हिमालयाने वेढलेले, हिल स्टेशन थंड हवामान,...

error: Content is protected !!