Homeशहरउल्हासनगर महापालिकेत विरोधी पक्षनेतेपदी काँग्रेसच्या गटनेत्या अंजली साळवे यांची निवड : शिवसेनेचे...

उल्हासनगर महापालिकेत विरोधी पक्षनेतेपदी काँग्रेसच्या गटनेत्या अंजली साळवे यांची निवड : शिवसेनेचे मानले आभार

उल्हासनगर दि २३ ( प्रमोद दळवी ) : उल्हासनगर महापालिकेत काँग्रेसच्या गटनेत्या अंजली साळवे यांची विरोधी पक्षनेते पदी नियुक्ती करण्यात आल्याची घोषणा बुधवारी महासभेत महापौर अश्विनी निकम यांनी केली. त्या नंतर महापौर अश्विनी निकम यांचे आभार प्रदर्शन करताना अंजली साळवे यांनी काँग्रेस पक्षाच्या नेत्या सोनिया गांधीजी व विरोधी पक्ष नेता राहुल गांधीजी आणि महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचे आभार मानलेत. तसेच त्यांनी शिवसेनेचे वरिष्ठ नेते एकनाथ शिंदे आणि कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार श्रीकांत शिंदे , शिवसेना गटनेते अरुण आशान यांचे आभार मानले .

महापालिकेत काँग्रेस हा विरोधी पक्षात असलेला एकमेव पक्ष असून केवळ एक नगरसेवक असतानाही विरोधी पक्षनेते पद देण्यात आल्याने हा निर्णय चर्चेचा विषय ठरलाय. लोकशाहीचा सन्मान राखत हे पद दिल्याबद्दल काँग्रेस जिल्हाध्यक्ष रोहित साळवे यांनी महापौरांचे आभार मानले. महासभेमध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे उल्हासनगरचे नगरसेविका अंजली साळवे यांचा विरोधी पक्षनेता म्हणून जे नेमणूक व डिक्लेरेशन महापौर अश्विनी निकम यांनी सभागृहात केलं त्यासाठी आम्ही त्यांचे व शिवसेना गटनेते अरुण आशान यांच्या आभार व्यक्त करतो असे रोहित साळवे म्हाणाले. कारण विरोधी पक्ष हा महानगरपालिकेच्या  एकंदरीत सभागृहाच्या प्रक्रियेमध्ये महत्त्वाचा घटक आहे. जरी आज ७८ नगरसेवकांमध्ये   ७७  नगरसेवक सत्तेत आहेत पण एकमेव काँग्रेस पक्ष विरोधात आहे. उल्हासनगर महानगरपालिकेच्या  परंपरेमध्ये नेहमी विरोधी पक्षनेता राहिला आहे. तर ती सीट राहिली पाहिजे या अनुषंगाने त्याला मान्यता दिली त्यासाठी त्यांचे आभार प्रकट केले. पक्षाच्या नेत्या सोनिया गांधीजी ज्यांनी पन्नास टक्के महिला आरक्षण स्थानिक स्वराज्य संस्थेत जे आणलं  त्यामुळे आज आमच्या महिला नगरसेवक येत आहेत. देशाचे विरोधी पक्ष नेता लोकसभेचे राहुल गांधीजी आणि महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचे रोहित साळवे यांनी  विशेष आभार व्यक्त केले . कारण की त्यांच्यामुळेच अंजली साळवे यांना नगरसेवक बनण्याची संधी पक्षाने दिली. सत्ता पक्षाचे व राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व या विभागाचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांचे पण आभार व्यक्त केले. कारण की संविधानिक  प्रक्रियेत लोकशाही प्रक्रियेत त्याला मान्यता देण्यासाठी विरोधी पक्षाला त्यांनी जे मान्यता देण्यासाठी त्यांच्या आदेशाप्रमाणे महापौरांना सांगितल्याने आणि त्याच्यामुळे आज हे विरोधी पक्ष पद अंजली साळवे यांना देण्यात आल्यामुळे त्यांचे विशेष आभार मानण्यात आले.

महापालिकेत दोन्ही पक्ष सत्तेत एकमेकांच्या विरोधात लढले नंतर एकत्र आल्यामुळे विरोधी पक्षाची जागा खाली होती. तिथे आम्ही होतो पण विरोधी पक्ष हा फक्त एका पक्षाचा प्रतिनिधित्व नसून शहरातील सर्व जनतेचा आहे . सत्ते  मध्ये जर सत्ताधारी कुठे चुकत असेल तर कोणीतरी जनतेपर्यंत  पोहोचवायचं काम केलं पाहिजे मग ते सिविल सोसायटी असतील पत्रकार असतील त्यांचा आवाज पोहोचवण्याचा काम नगरसेविका अंजली साळवे येणाऱ्या काळामध्ये महापालिकेत करतील असे रोहित साळवे यांनी सांगितले. नगरसेविका अंजली साळवे यांनी देखील महापौर, माजी आमदार पप्पू कलानी, शिवसेना गट नेते अरुण आशान, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या आभार मानले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

महाराष्ट्रात रिक्त जागा भरण्यासाठी बीएमएस, बीबीएसाठी सीईटीच्या नियमांमध्ये बदल करण्यात येणार आहेत

मुंबई: बीएमएस, बीबीए, बीसीए आणि एकात्मिक एमबीए सारख्या अभ्यासक्रमांसाठी सीईटी-आधारित प्रवेश प्रक्रिया सुरू केल्यानंतर दोन वर्षांनी, राज्य सरकारने रिक्त जागा आणि प्रक्रियेतील...

वाढीव प्रवेश परीक्षेच्या शुल्कावरून एसपीपीयूमध्ये विद्यार्थी संघटनेने संप सुरू केला आहे

पुणे : नॅशनल स्टुडंट्स युनियन ऑफ इंडिया (NSUI) ने बुधवारी एसपीपीयूमध्ये प्रवेश परीक्षा शुल्क कमी करावे, अतिरिक्त क्रेडिट कोर्सेस ऐच्छिक केले जावे...

आयपीएल: एमआयने डॅनिशचा प्रभाव उप म्हणून वापरल्यानंतरही शार्दुल ठाकूर फलंदाजीला का आला – स्पष्टीकरण

शार्दुल ठाकूर गुरुवारी आयपीएल 2026 मध्ये चेन्नई सुपर किंग्ज (CSK) विरुद्ध त्याच्या संघाच्या सामन्यादरम्यान मुंबई इंडियन्ससाठी फलंदाजीसाठी आला.विशेष म्हणजे, शार्दुल ठाकूर मुंबईच्या...

अंतिम वापरकर्ते आणि गुंतवणूकदारांसाठी लखनौमधील शीर्ष 5 उच्चभ्रू निवासी परिसर

अलीगंज हा एक प्रस्थापित परिसर आहे आणि त्यात मध्यवर्ती निवासी मालमत्ता आहेत ज्यांना चांगले कनेक्शन आणि सहज प्रवेश मिळतो. हा परिसर बाजारपेठेपासून शैक्षणिक संस्था,...

रंगमंचावर बोधिधर्माच्या अंतर्बाह्य प्रवासाचे पुनरुच्चार

कृपया फोर मोअर शॉट्समधील ओटीटी स्टार! प्राइमटाइम थिएटरच्या झेन कथामध्ये राजीव सिद्धार्थ नायक बोधिधर्माची भूमिका साकारत आहेत (पूर्वावलोकन आणि पुनरावलोकने)पुणे : प्रताप शर्मा...

error: Content is protected !!