उल्हासनगर दि १६ : मा. नगर विकास विभाग महाराष्ट्र शासन यांच्या कडून “ड” वर्ग महानगरपालिकांची प्रारूप प्रभाग रचना करण्याबाबतचे आदेश प्राप्त झालेले आहेत. मा. आयोगाने वेळोवेळी दिलेल्या सूचना मा. न्यायालयाने दिलेले निर्देश आणि प्रभाग रचना नियमातील तरतुदीचे काटेकोरपणे पालन करणेबाबत सुचित करण्यात आलेले आहे. प्रारूप प्रभाग रचना तयार करतांना त्याची गोपनीयता राखणे व नियमांचे काटेकोरपणे पालन करणे आसल्याचे मा. निवडणु आयोगाचे निर्देश आहेत. त्यान्वये दिनांक १६/०६/२०२५ रोजी सोमवारी सायंकाळी ४:३० वा. उल्हासनगर महानगरपालिकेचा प्रारूप प्रभाग रचना आराखडा तयार करण्याबाबत (सन २०२५) महापालिकेच्या स्थायी समिती सभागृहात अतिरिक्त आयुक्त डॉ. किशोर गवस यांचे मार्गदर्शनाखाली बैठक आयोजित करण्यात आली होती .

मा. नगररचना विभागाच्या निर्देशान्वये प्रारूप रचना आराखडा तयार करण्यासाठी समिती गठीत करण्याबाबत नमुद आहे. त्यानुसार उल्हासनगर शहर हानगरपालिका कार्यक्षेत्रातील आराखडा तयार करणेसाठी समिती गठीत करण्यात आली.सदर बैठकीत मा. अतिरिक्त आयुक्त श्री. किशोर गवस यांनी संबंधित अधिकारी/कर्मचारी यांना जनगणेची माहिती व नैसर्गिक घटक लक्षात घेवून तसेच गुगल मॅपचा उपयोग करून प्रभाग रचना करणे, यासाठी अधिकारी व कर्मचारी यांचे पथक तयार करणे, प्रत्यक्ष जागेवर जावून पाहणी करून प्रभाग रचनेस्तव सिमा तयार करणे, निवडणूक कामासाठी कर्मचारी वर्गाची नेमणूक करणे, प्रभागांचे नकाशे तयार करणे, प्रभाग रचनेचे प्रारूप तयार केल्यानंतर त्यावर हरकती, सूचना मागविणे व त्यानंतर याबाबत सुनावणी निश्चित करणे व त्यानंतर अंतीम प्रभाग रचनेचे प्रारूप मा. निवडणूक आयोगास सादर करणेबाबत सर्व संबंधित अधिकारी/कर्मचारी यांना मार्गदर्शन, सूचना व निर्देश दिले.

या बैठकीस अतिरिक्त आयुक्त डॉ. किशोर गवस, उपआयुक्त (निवडणूक) श्रीम. स्नेहा कर्पे, सहा. आयुक्त (निवडणूक) श्री. अजय साबळे, कार्यकारी अभियुता (पा.पु.वि.) श्री. अशोक घुले, उप अभियंता (सेवानिवृत्त) श्री. अश्विनी आहुजा, उप अभियंता श्री. महेंद्र धिंडे, सिस्टीम अॅनलिस्ट श्रीम. श्रध्दा बाविस्कर, कनिष्ठ अभियंता श्री. संजय पवार, श्री. परमेश्वर बुडगे, श्री. अश्विनी गर्जे, श्री. हर्ष बोंबले, श्री. संजय बांगर, श्री. सुशांत पेवेकर, श्री. सुमेश चौगले व इतर अधिकारी/कर्मचारी उपस्थीत होते.





























