उल्हासनगर दि.१५ : महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या वतीने येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक तयारी साठी सर्व जिल्ह्यात नवीन प्रभारी तसेच विधानसभा निहाय प्रभारींची नियुक्ती करण्यात आली. त्याच अनुषंगाने उल्हासनगर साठी प्रदेश उपाध्यक्ष रमेश शेट्टी ह्यांची जिल्हा प्रभारी तर प्रदेश सरचिटणीस नवीन सिंग ह्यांची १४१ विधानसभा प्रभारी म्हणून नियुक्ती करण्यात आली, त्याच पार्श्वभूमीवर शहर जिल्हा निवडणूक पूर्व तयारीच्या आढावा घेण्यासाठी रविवार सायंकाळी प्रदेश सरचिटणीस नवीन सिंग ह्यांनी उल्हासनगरात दौरा केला.

नेहरू चौक मध्यवर्ती कांग्रेस कार्यालय येथे सर्व प्रथम नवीन सिंग ह्यांचे स्वागत सत्कार करण्यात आले व ह्या नंतर बैठकीत बोलताना जिल्हा अध्यक्ष रोहित साळवे ह्यांनी पदाधिकार्याना संबोधित करताना सर्व प्रथम प्रदेश काँग्रेसचे आभार व्यक्त केले की नवीन सिंग ह्यांची प्रभारी म्हणून नियुक्ती करण्यात आले कारण त्यांचा कांग्रेस पक्षाचा फार मोठा प्रवास असून त्यांनी विद्यार्थी चळवळी पासून कांग्रेसचा प्रवास सुरू करत कल्याण डोंबिवली येथे नगरसेवक ते प्रदेश सरचिटणीस असा प्रवास केला असून त्यांना ह्या विभागाचा संपूर्ण जाणकारी आहे व इथल्या समस्यांशी ते अवगत आहे म्हणून त्यांच्या अनुभवाचा फायदा हा येणाऱ्या निवडणुकीसाठी उल्हासनगर कांग्रेस ला नक्कीच होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
नवीन सिंग ह्यांनी पदाधिकाऱ्यान व इच्छुक उमेदवाराना संबोधित करताना सर्वांना महानगरपालिका निवडणुकी साठी सज्ज होऊन संपूर्ण तन मन धन ह्याने स्वतःला झोकून द्यायला सर्व उपस्थितन आव्हान केले , तसेच निवडणुकी साठी संपूर्ण ताकत ही प्रदेश कांग्रेस कडून आपल्याला देण्यात येईल अशे आश्वासन दिले.पदाधिकाऱ्यांनी देखील आपल्या समस्यांशी प्रभारी ह्यांना अवगत केले व येणाऱ्या काळात प्रत्येक प्रभाग निहाय दौरा , उमेदवारांची चाचपणी , समविचारी संघटनेशी आघाडी , नागरी समस्यां संदर्भात प्रशासनाशी संपर्क ह्या सर्व विषयी संदर्भात आत्ता निवडणुकीत पर्यंत ते स्वतः उपस्थित राहणार असण्या बाबत त्यांनी सांगितले.सदर बैठकीला ब्लॉक अध्यक्ष नानिक आहुजा, किशोर धडके ,सुनील बहरानी , प्रवक्ता अशेराम टाक , अजीज खान , शाहबुर्दीन खान , पुष्प लता सिंह , फामिदा सय्यद , उपाध्यक्ष श्याम मडवी, यूथ अध्यक्ष फरियाद शेख , विद्यार्थी सेल अध्यक्ष रोहित ओव्हाळ ,डॉ सेल अध्यक्ष डॉ हितेश सचवणी ,वामदेव भोयर , सॅम्युअल मावची ,ईश्वर जागियाशी ,अन्सार शेख ,देव आठवले आदि पदाधिकारी उपस्थित होते.





























