Homeशहरअतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर आरोग्य सभापती सविता तोरणे रगडे व युवा जनसेवक शिवाजी बा....

अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर आरोग्य सभापती सविता तोरणे रगडे व युवा जनसेवक शिवाजी बा. रगडे यांनी केली विविध भागांची पाहणी

उल्हासनगर दि. ५ ( प्रमोद दळवी ) : हवामान खात्याने जारी केलेल्या रेड अलर्ट तसेच सुरू असलेल्या अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर उल्हासनगर शहरातील विविध भागांत पाणी साचल्याच्या तक्रारी प्राप्त होत होत्या. प्राप्त तक्रारींची तात्काळ दखल घेत आरोग्य सभापती सविता तोरणे रगडे व युवा जनसेवक शिवाजी बा. रगडे यांनी संबंधित परिसरांना प्रत्यक्ष भेट देऊन परिस्थितीची पाहणी करत सविस्तर आढावा घेतला.

पाहणीदरम्यान विविध ठिकाणी साचलेल्या पाण्याची स्थिती, नाले व जलवाहिन्यांची परिस्थिती तसेच नागरिकांना भेडसावणाऱ्या समस्यांची माहिती घेण्यात आली. यावेळी आपत्कालीन यंत्रणा, अग्निशमन विभाग, पोलीस विभाग तसेच संबंधित प्रशासकीय अधिकाऱ्यांना आवश्यक त्या सूचना देण्यात आल्या असून सर्व यंत्रणांना सतर्क राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. यावेळी आरोग्य सभापती सविता तोरणे रगडे यांनी नागरिकांना आवाहन केले की, सध्याच्या हवामान परिस्थितीचा विचार करता सर्वांनी सतर्क राहावे, अनावश्यक घराबाहेर पडणे टाळावे तसेच लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि आजारी व्यक्तींची विशेष काळजी घ्यावी.

आपत्ती व्यवस्थापन विभागाचे हेल्पलाईन क्रमांक सर्वत्र प्रसिद्ध करण्यात आले असून कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांनी त्वरित संपर्क साधावा, असेही आवाहन करण्यात आले. उल्हासनगर महानगरपालिका, आपत्ती व्यवस्थापन विभाग, प्रशासन तसेच सार्वजनिक आरोग्य विभाग हे सर्व नागरिकांच्या सेवेसाठी चोवीस तास तत्पर असून नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी कटिबद्ध आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

इतिहास! नोव्हाक जोकोविचने रॉजर फेडररचा सर्वकालीन विम्बल्डन विक्रम मोडला

नोव्हाक जोकोविच (इमेज क्रेडिट: विम्बल्डन) नोव्हाक जोकोविचने रविवारी विम्बल्डनच्या इतिहासातील सर्वात विजेते पुरुष खेळाडू बनून त्याच्या चमकदार कारकिर्दीत आणखी एक मैलाचा दगड जोडला.सात...

ऑनलाइन मद्यविक्री प्रकरणात न्यायालयाने अटकपूर्व जामीन नाकारला, ‘संघटित अवैध धंदे’

मुंबई : कथित ऑनलाइन मद्यविक्रीच्या नेटवर्कला मोठा धक्का बसला असताना, मुंबई सत्र न्यायालयाने खार-आधारित वाइन शॉप परवानाधारकाला अटकपूर्व जामीन नाकारला आहे, असे...

या मान्सूनच्या सर्वाधिक २४ तासांच्या पावसाने पुणे भिजले; पुढील 24 तासांत आणखी पावसाची शक्यता

शनिवारी सकाळी 8.30 वाजेपर्यंत शहरात या पावसाळ्यातील सर्वाधिक 24 तासांच्या पावसाची नोंद झाली, एनडीएमध्ये 33 मिमी, त्यानंतर पाषाण (31.4 मिमी), शिवाजीनगर (30.5 मिमी)...

शीर्ष 5 सर्वात सक्रिय कुत्र्यांच्या जाती

तुमच्या परिपूर्ण वीकेंडच्या कल्पनेमध्ये लांब चालणे, हायकिंग ट्रेल्स किंवा उद्यानात काही तासांचा समावेश असल्यास, काही कुत्र्यांच्या जाती आनंदाने टिकून राहतील - आणि नंतर आणखी...

खडकवासला सर्कल धरणात 24 तासांत 0.50 टीएमसी वाढ, शहराची 10 दिवसांची पाण्याची गरज पूर्ण

पुणे : खडकवासला सर्कलच्या चार धरणांमधील सामूहिक साठा शनिवारी 0.50 टीएमसीने वाढला - शहराची 10 दिवसांची पाण्याची गरज भागवण्यासाठी पुरेसा - कारण...

error: Content is protected !!