- आगीमुळे जाग आल्याने पूर्ण कुटुंब बचावले
- अज्ञात समाजकंटकाविरुद्ध पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
उल्हासनगर दि १८( प्रमोद दळवी ) : पहाटेच्या सुमारास कोणीतरी आज्ञाच समाजकंटकाने उल्हासनगरातील शिवसैनिक विजय धावारे यांच्या घरावर पेट्रोल ओतून आग लावण्याचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार घडल्याने सर्वत्रएकच खळबळ उडाली आहे.
उल्हासनगर शहरातील कॅम्प नंबर ४ परिसरातील भीम कॉलनी मध्ये शिवसैनिक विजय धावारे हे आपल्या कुटुंबासह राहतात. धावारे कुटुंब पहाटेच्या सुमारास झोपेत असताना अचानक त्यांना त्यांच्या घराच्या दरवाजाजवळ आग लागल्याचे दिसून आले. या आगीमुळे घरात धूर निर्माण झाल्याने विजय धावारे, त्यांची पत्नी आणि दोन मुले झोपेतून जागे झाले. अचानक घराला आग लागल्याने आरडा ओरड सुरू झाली. विजय यांनी त्वरित आग विझवली. याशिवाय शेजारी राहणाऱ्या नागरिकांनी देखील त्यांच्या घराकडे धाव घेतली. कोणीतरी आज्ञात समाजकंटकाने कोणत्यातरी अज्ञात कारणावरून विजय धावारे यांना कुटुंबासह त्यांच्या घराला आग लावून जाळण्याचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. पहाटेच्या सुमारास कोणीतरी आज्ञाताने विजय यांच्या घराची बाहेरून कडी लावून. पायपुसणीवर पेट्रोल ओतून ती पायपुसणी घरात सरकवले. त्यामुळे घरात आग पसरली. वेळीच धावारे कुटुंबाला जाग आल्याने मोठा अनर्थ टाळला. याप्रकरणी विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात विजय धावारे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आज्ञत आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलिसांनी तपास सुरू केला असून लवकरच त्या आरोपीला पोलीस शोधून काढतील असा अंदाज वर्तवण्यात येत आहे.

विजय धावारे हे काही महिन्यांपूर्वी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षातील जिल्हाप्रमुख धनंजय बोडारे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत कार्यरत झाले आहेत. तसेच स्थानिक निवडणुकीसाठी प्रयत्नशील आहेत. कुठेतरी निवडणुकीपूर्वी हा ट्रेलर दाखविल्याचा बोलले जाते. अशा समाजकंटकावर कारवाई करण्याची मागणी विजय यांनी केली आहे .
विजय धावारे म्हणाले मला माझ्या कुटुंबासहित जीव मारण्याचा कुणीतरी प्रयत्न केला आहे. मी असा कोणता गुन्हा केला आहे की माझ्या कुटुंबावर असा जीव घेणे हल्ला झाला. गेल्या अनेक वर्षापासून मी समाजकार्य काम करतो. या परिसरात गुन्हेगारी वाढली आहे. लोकांच्या गाड्या जाळणं, गाडीतील पेट्रोल काढणे. गाड्या फोडणे, अशा घटना घडत असतात. याशिवाय मी परिसरातील लोकांच्याही मदतीला जात असतो. आता चार महिन्यांमध्ये इलेक्शन आले आहे. असे पण लोक आहेत जे समाजकंटक आहेत. त्यांच्या विरोधात नेहमी माझ्या ऍक्टिव्हिटी असतात. कोणाच्या मनात काय प्लान होता माझा आयुष्य उध्वस्त करण्याचा खूप मोठा कट रचण्यात आला आहे. मी कुटुंबासह घरात झोपलेला असताना पहाटे पाचच्या दरम्यान माझ्या घराच्या दरवाज्याच्या सापटीतून पेट्रोल टाकून पायपुसणी आत मध्ये सरकून दिली. जेव्हा आतून मोठी आग लागली. त्या वासामुळे आणि धुरामुळे आम्हाला जाग आली. आम्ही सर्व कुटुंबाने ती आग विझवली

या घटनेमुळे शेजारीपाजारी देखील जागे झाले आणि त्यांनी माझ्या घराकडे धाव घेतली. त्यांनी माझ्या घराची दरवाज्याची कडी बाहेरून उघडली. जर घरामध्ये प्रचंड आग लागली असती तर माझं कुटुंब या आगीमध्ये होरपळलं असतं. याशिवाय घरातील सिलेंडरचा ही स्पोट झाला असता व त्यात शेजाऱ्यांचाही बरं वाईट झालं असतं . पण सुदैवाने तो अनर्थ टाळला. असे विजय म्हणाले. यावर पोलीस प्रशासनाने ताबडतोब कारवाई करावी अन्यथा उद्या आणखीन माझ्यावर असा प्रसंग पुन्हा निर्माण होऊ शकतो. असे विजय धावारे म्हणाले. या घटनेमुळे उल्हासनगरत एकच खळबळ उडाली आहे.





























