Homeशहरजमीर लेंगरेकर यांची नंदुरबार जिल्हा सह आयुक्तपदी पदोन्नती

जमीर लेंगरेकर यांची नंदुरबार जिल्हा सह आयुक्तपदी पदोन्नती

  • उल्हासनगर मनपात उल्लेखनीय काम.

नंदुरबार दि १६ : उल्हासनगर महानगरपालिकेत अतिरिक्त आयुक्त म्हणून कार्यरत असलेले श्री. जमीर लेंगरेकर यांची पदोन्नतीवर नंदुरबार येथे जिल्हा सह आयुक्तपदी नियुक्ती झाली आहे. श्री. लेंगरेकर यांचा प्रशासकीय सेवेतील प्रदीर्घ अनुभव आणि उल्हासनगर महानगरपालिकेच्या विकासात त्यांनी दिलेले महत्त्वपूर्ण योगदान यामुळे ते या नवीन पदासाठी योग्य न्याय देतील.

प्रशासकीय कारकिर्दीचा आढावा:

श्री. लेंगरेकर यांनी यापूर्वी विविध महानगरपालिकांमध्ये महत्त्वाच्या जबाबदाऱ्या सांभाळल्या आहेत:

शासकीय सेवेत येण्यापूर्वी ते प्राथमिक शिक्षक म्हणून पाच वर्ष कार्यरत होते तदनंतर त्यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत पहिल्याच प्रयत्नात यश मिळवून विक्रीकर निरीक्षक झाले व पाच वर्ष विक्रीकर खात्यात काम केले.

राज्यसेवा 2012 च्या परीक्षेत यश म्हणून ते मुख्य अधिकारी गट अ म्हणून निवडले गेले.

* उल्हासनगर महानगरपालिका: २०१४ ते २०१७ या कालावधीत उपायुक्त म्हणून.

* पनवेल महानगरपालिका: २०१७ ते २०२० या काळात उपायुक्त म्हणून.

* सोलापूर महानगरपालिका: २०२०-२१ मध्ये उपायुक्त म्हणून.

* नगरपरिषद प्रशासन संचनालय: पदोन्नतीवर उपायुक्त म्हणूनही त्यांनी काम पाहिले आहे.

फेब्रुवारी २०२२ ते फेब्रुवारी २०२५ या कालावधीत ते उल्हासनगर महानगरपालिकेत अतिरिक्त आयुक्त पदावर कार्यरत होते.

उल्लेखनीय कामगिरी

श्री. लेंगरेकर यांनी त्यांच्या कार्यकाळात अनेक महत्त्वपूर्ण कामे केली आहेत, ज्यातून त्यांची कार्यक्षमता आणि दूरदृष्टी दिसून येते:

* उल्हासनगर महानगरपालिकेत उपायुक्त म्हणून: मालमत्ता कर वसुली आणि शिक्षण विभागाच्या कामकाजात त्यांनी मोठे बदल घडवले. त्यांच्याच कार्यकाळात पहिल्यांदाच २०१५  मध्ये महानगरपालिकेने शंभर कोटी रुपयांची कर वसुली केली. मनपाच्या शाळा आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर अभ्यासिका यांच्या बांधकामाला त्यांच्या उपायुक्तपदाच्या कार्यकाळात सुरुवात झाली.

पनवेल महानगरपालिकेची स्थापने पासून तीन वर्षाचे उपायुक्त म्हणून कार्यरत होते.पनवेल महानगरपालिकेच्या जडंघटने त्यांनी महत्त्वाचे योगदान दिले. पनवेल महानगरपालिकेची प्रशासकीय घडी बसवण्यासाठी, आकृतीबंध मंजूर करण्यासाठी त्यांनी तत्कालीन आयुक्तांसोबत महत्त्वपूर्ण काम केले.पनवेल महानगरपालिकेत कोरोनासाठीच्या वेळी परदेशातून येणाऱ्या नागरिकांसाठी व रायगड जिल्ह्यातून भारतातील अन्य भागात जाणाऱ्या कामगारांच्या सुविधासाठी त्यांनी सहकारांसोबत मोठी यंत्रणा सांभाळली. कोरोना साथीत अनेकांना त्यांनी मदत केली.

सोलापूर महानगरपालिकेत कोरोनाच्या दुसऱ्या त्यांनी तत्कालीन आयुक्त पी शिवशंकर यांच्या मार्गदर्शनाखाली साथरोग नियंत्रणाचे चांगले काम केले.सोलापूर महानगरपालिकेचा अनेक वर्षा रखडलेला आकृतीबंध व सेवा प्रवेश नियम व कर्मचाऱ्यांची पदोन्नतीची प्रक्रिया मार्गी लावली.

* अतिरिक्त आयुक्त म्हणून उल्हासनगर महानगरपालिका(२०२२ पासून): कोरोनानंतर आर्थिकदृष्ट्या अडचणीत सापडलेल्या उल्हासनगर महानगरपालिकेला पुन्हा रुळावर आणण्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.

* अमृत योजनेंतर्गत पाणीपुरवठा आणि भुयारी गटार योजना मंजूर करून

    कार्यान्वित केल्या.

* मनपाच्या तीन नवीन शाळा आणि एक अभ्यासिका यांचे बांधकाम पूर्ण केले.

* जाहिरात परवाना विभागातील अनियमितता शोधून त्यांनी मोठा जाहिरात घोटाळा उघडकीस आणला.

प्रशासकीय शिस्त व लोकांच्या समस्या सोडवण्यासाठी सतत उपलब्ध राहण्याची त्यांची तळमळ यामुळे ते नियुक्तीच्या ठिकाणी नेहमीच लोकप्रिय राहिले आहेत.

लोकांना प्रशासकीय कामकाजासाठी हेलपाटे मारावे लागू नये म्हणून कामचुकार कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई करणे, प्रशासकीय कामकाजात सोपेपणा आणण्याचा प्रयत्न केला. यातून त्यांना अनेक खोट्या प्रकरणात अडकवण्याचा प्रयत्न देखील केला होता. अशा संकटावर मात करून ते लोकांसाठी कार्यरत राहिले आहेत.

श्री. जमीर लेंगरेकर यांच्या नंदुरबार येथे जिल्हा सह आयुक्तपदी झालेल्या नियुक्तीमुळे जिल्ह्यातील प्रशासकीय कामकाजाला अधिक गती मिळेल अशी अपेक्षा आहे. नगर विकास विभागांतर्गत महाराष्ट्र शहरी प्रशासकीय सेवेतील एक अनुभवी व अभ्यासू अधिकारी म्हणून सुप्रसिद्ध असलेले लेंगरेकर हे आपल्या कामाच्या प्रति नेहमीच झोकून देऊन काम करतात. त्यांच्या मागील कामगिरीचा अनुभव पाहता, नंदुरबारच्या विकासातही त्यांचे मोलाचे योगदान राहील अशी आशा आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

भारत महिला वि बांगलादेश महिला लाइव्ह स्कोअर, महिला T20 विश्वचषक 2026: भारत बांगलादेशचा सामना...

भारत महिला वि बांगलादेश महिला लाइव्ह स्कोअर, महिला T20 विश्वचषक 2026: मधल्या फळीतील फलंदाजीतील संकटे आणि आळशी क्षेत्ररक्षणामुळे त्यांची मोहीम रुळावरून घसरण्याची भीती असताना,...

आज 2% गुंतवणुकीसह भारताची हरित ऊर्जा हवामान-प्रूफिंग भारताच्या अक्षय ऊर्जा पाइपलाइनमध्ये $28 अब्ज नुकसान...

2030 पर्यंत, भारतातील नियोजित नूतनीकरणक्षम ऊर्जा पायाभूत सुविधांपैकी जवळजवळ 90% गंभीर हवामान आव्हानांना तोंड देऊ शकतात (प्रतिनिधी प्रतिमा) हवामान धोके 90% धोक्यात...

पहा: लोहगड किल्ला ढकलण्याच्या एक दिवस आधी, सिया गोयलने मंगेतर केतन अग्रवालच्या हत्येचा ‘प्लॅन’...

एक मंगेतर आणि तिच्या प्रियकराने स्थावर मालमत्ता संचालकाच्या हत्येची बारकाईने योजना आखली. सीसीटीव्ही फुटेजने त्यांची कॅफे मीटिंग उघड केली, जिथे त्यांनी त्याला लोहगड...

पुष्कळ पालकत्व चांगल्यापेक्षा जास्त नुकसान करते: ते काय आहे आणि 5 चिन्हे तुम्ही एक...

आपल्या मुलांनी आयुष्यात यशस्वी व्हावे अशी पालकांची इच्छा असते. मग ते शैक्षणिक असो, खेळ असो किंवा दैनंदिन मूल्ये असोत. मुलांसाठी, ते पालकांच्या पाठिंब्याने आणि...

नसरापूर बालिका बलात्कार-हत्या : पुणे न्यायालयाने ६५ वर्षीय वृद्धाला दोषी ठरवले, २९ जून रोजी...

आरोपी सीसीटीव्हीत कैद पुणे - जिल्ह्यातील भोर तालुक्यातील नसरापूर येथे 1 मे रोजी तीन वर्षांच्या मुलीचे अपहरण, बलात्कार आणि खून केल्याप्रकरणी पुण्यातील विशेष...

error: Content is protected !!