- अंबरनाथच्या होम प्लॅटफॉर्मवरची ही चित्तथरारक घटना सीसीटीव्हीत कैद
अंबरनाथ दि.११ ( प्रमोद दळवी ) : रेल्वे स्थानकाचा अंदाज न आल्याने पाय घसरून एक दिव्यांग व्यक्ती प्लॅटफॉर्म वरून रेल्वे रुळावर पडून जखमी झाल्याची घटना अंबरनाथ मध्ये घडल्या असून ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. दरम्यान या दिव्यांगाचे प्राण एम.एस.एफ जवानाच्या सर्ततेमुळे वाचल्या असून एम.एस.एफ जवान अमोल देवरे यांच्या धाडसाचे आणि कर्तव्यदक्षताचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.
अंबरनाथ रेल्वे स्थानकावर बीएमसी कर्मचारी असलेले सिद्धनाथ माने हे दोन जून रोजी संध्याकाळी सातच्या सुमारास सीएसटीवरून कर्जत दिशेने जाणाऱ्या ट्रेनची वाट पाहत होते. त्याच दरम्यान स्थानकावर लोकल आल्याची घोषणा झाली असता ते लोकल पकडण्यासाठी पुढे सरसावले. मात्र त्यांना स्थानकाचा अंदाज न आल्याने पाय घसरून ते थेट प्लॅटफॉर्मवरून रुळावर कोसळले. माने हे रुळावर पडल्यामुळे ते गंभीर जखमी झाले. त्याच दरम्यान लोकल देखील येत होती अशावेळी त्या ठिकाणी कर्तव्यावर असलेले एम.एस.एफ जवान अमोल देवरे यांनी सर्वात पहिले लोकल थांबवत रुळाकडे धाव घेतली. त्यावेळी त्यांनी आपल्या जीवाची पर्वा न करतात स्थानकावरून रेल्वे रुळावर उडी मारून त्या दिव्यांगाचे प्राण वाचवले.
याप्रकरणी काही प्रवाशांनी देखील त्यांची मदत केली असून माने यांना तात्काळ रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. अपघाताची ही सर्व चित्तथरारक घटना सीसीटीव्ही कैद झाले आहे अमोल देवरे यांच्या धाडसाचे सर्वत्र कौतुक होत आहे.


























