- रिक्षाचे नुकसान , तीन प्रवासी थोडक्यात वाचले
उल्हासनगर दि ३ ( प्रमोद दळवी ) : मंगळवारी सायंकाळी अचानक सुरू झालेल्या मुसळधार पावसामुळे उल्हासनगरातील कॅम्प – ४ येथील लालचक्की चौकात मुसळधार पावसात गुलमोहरचा झाड अचानक कोसळून तो विद्युत पोलवर पडल्याने त्या पोलसह त्या ठिकाणी असलेला प्रवेशद्वार देखील कोसळले. सुदैवाने या दुर्घटनेत कुठलीही जीवितहानी झाली नसली तरी एका रिक्षाचे नुकसान झाले आहे.

मंगळवारी सायंकाळी ७ वाजता मुसळधार पाऊस पडत असताना उल्हासनगरातील कॅम्प नंबर ४ परिसरातील लालचक्की चौकात एका कंपाउंडच्या आत मध्ये असलेला भला मोठा गुलमोहरचा झाड मुसळधार पावसात सुसाट्याचा वारासह तो अचानक कोसळला. तो झाड रस्त्यावर असलेल्या विद्युत पोलवर पडल्याने. विद्युत पोल तारांसह चौकात असणाऱ्या प्रवेशद्वारावर पडला. त्यामुळे ते प्रवेशद्वार देखील कोसळले. पाऊस असल्यामुळे रस्त्यावर रहदारी नव्हती. त्यामुळे या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. पाऊस नसता तर खूप मोठी दुर्घटना घडली असती.

ज्यावेळी हे झाड कोसळले त्यावेळी एक रिक्षा पॅसेंजरला घेऊन स्टेशन कडे जात होती. झाड कोसळत असताना रिक्षा चालकांनी वेळीच रिक्षा जागीच थांबवली त्यामुळे रिक्षातील प्रवाशांनी जीव मुठीत घेऊन बाहेर पळ काढली. त्यामुळे ते बाल बाल बचावले. पण रिक्षाचे नुकसान झाले. या घटनेमुळे लालचक्की परिसरात एकच खळबळ उडाली असून. या घटनेची माहिती अग्निशमन विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना तसेच पालिकेच्या आपत्कालीन विभागाला मिळताच त्यांनी त्या ठिकाणी धाव घेतली. रस्त्यावर पडलेले झाड काढण्याच्या कामाला सुरुवात करण्यात आली आहे. या दुर्घटनेत विद्युत पोलचे आणि तारांचे देखील मोठे नुकसान झाले आहे. प्रवेशद्वार देखील कोसळून नुकसान झाले आहे. या संदर्भात मनसेचे प्रदीप गोडसे यांना विचारले असता त्यांनी सांगितले. सध्या पावसाळा सुरू झाला आहे त्यामुळे धोकेदायक झाडांची पालिकेने पाहणी करून ती तोडावी अशी मागणी आम्ही वारंवार निवेदनाद्वारे केली होती. पण याकडे पालिकेने दुर्लक्ष केल्यामुळे अशा घटना घडत आहेत. याशिवाय पालिकेने शहरातील प्रवेशद्वारांची देखील पाहणी करावी. पावसाळ्यात अशा दुर्घटना घडणार नाही असे प्रदीप गोडसे म्हणाले.

विद्युत पोल तारासह कोसळल्याने त्या परिसरातील विद्युत पुरवठा खंडित झाला आहे. जे प्रवेशदार कोसळले ते प्रवेशद्वार पालिकेने धर्मवीर छत्रपती संभाजीराजे प्रवेशद्वार नावाने बांधले होते. रात्री साडेआठ वाजता ही दुर्घटना घडली त्यावेळी पाऊस सुरू असल्यामुळे रस्त्यावर सुखसुकाट होता. त्यामुळे मोठी जीवित हानी टळली. शहरात असे अनेक जुने प्रवेशद्वार आहेत. जे पालिकेने बांधलेले आहेत. पावसाळ्यात या प्रवेशद्वारांची पाहणी करण्यात यावी. अन्यथा अशा प्रकारची पुनरावृत्ती व्हायला वेळ लागणार नाही असे मत नागरिक व्यक्त करीत आहेत.





























