Homeशहरअंबरनाथ, कल्याण व मुरबाड तालुका क्रीडा संकुलाची कामे तातडीने पूर्ण करा –...

अंबरनाथ, कल्याण व मुरबाड तालुका क्रीडा संकुलाची कामे तातडीने पूर्ण करा – क्रीडा मंत्री दत्तात्रय भरणे

मुंबई दि. ३ : अंबरनाथ, कल्याण व मुरबाड येथील तीनही तालुका क्रीडा संकुलाची उभारणी तसेच डागडुजी संदर्भात १५ दिवसांत कार्यवाही करण्याचे निर्देश क्रीडा व युवक कल्याण मंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिले.

मंत्रालयात अंबरनाथ, कल्याण, मुरबाड, नांदगाव, मनमाड येथील क्रीडा संकुलांबाबत आढावा बैठक झाली. यावेळी मंत्री श्री. भरणे बोलत होते. क्रीडा मंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले की, कल्याण क्रीडा संकुलात क्रीडा साहित्य खोली, तारेचे कुंपण, २०० मीटर धावण मार्ग तयार करण्यात यावा. मुरबाड येथे सद्यस्थितीत संकुलाच्या प्राप्त जागेवरच संकुल उभारणी करणे व अतिक्रमण रोखण्यासाठी संरक्षक भिंत उभारण्यात यावी. अंबरनाथ येथील तालुका क्रीडा संकुलात पावसामुळे पडझड झाली तेथील दुरूस्तीचे काम तातडीने करावे. मनमाड येथील महर्षी वाल्मिकी क्रीडा संकुलामध्ये क्रीडा संदर्भात सर्व साहित्य पुरविण्यात यावे. इनडोअर जिम साहित्य, महिलांसाठी योगा, मेडिटेशन, हॉल बांधणे, सोलर पॅनल व त्यासंदर्भात कामे, नांदगाव येथे इनडोअर कबड्डी मॅट स्टेडियम बांधणे, संरक्षक भिंत, व्यायाम साहित्य, सोलर पॅनल पुरविण्यासंदर्भातील कामांची कार्यवाही करण्यात यावी. सांगली येथील कवठेपिरान येथे पै.कै. हिंदकेसरी जाकार्तावीर मारूती माने स्मारक समितीच्या मागणीनुसार स्मारकास परिसरात संरक्षण भिंत उभारणे आणि पुतळ्यात योग्य त्या सुधारणा करण्याचे निर्देश क्रीडा मंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिले. यावेळी आमदार किसन कथोरे, सदाशिव खोत, सुहास कांदे, प्रभारी आयुक्त सुधीर मोरे, उपसचिव सुनिल पांढरे, उपसंचालक सुहास पाटील, माणिक पाटील, जिल्हा क्रीडा अधिकारी किरण बोरवडेकर, तहसिलदार अभिजित देशमुख, अमित पुरी, उपअभियंता संजय कोरडे, मदन हिरवे यांच्यासह जिल्हा क्रीडा अधिकारी, तालुका क्रीडा अधिकारी उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

केप वर्देने विश्वचषक इतिहास रचला, दुर्मिळ पात्रता मैलाचा दगड पूर्ण करण्यासाठी आतापर्यंत केवळ तीन...

केप वर्देच्या खेळाडूंनी ह्यूस्टन येथे शुक्रवार, २६ जून, २०१६ रोजी विश्वचषक गट एच सॉकर सामन्यानंतर सौदी अरेबियासोबत ०-० अशी बरोबरी साधली. (एपी फोटो/डेव्हिड...

बदलाचे स्टीयरिंग व्हील: मुंबई अग्निशमन दलाला पहिली महिला चालक-ऑपरेटर मिळाली

मुंबई अग्निशमन दलाने 29 वर्षीय पल्लवी पाटील यांची पहिली महिला चालक-सह-ऑपरेटर म्हणून नियुक्ती करून इतिहास रचला आहे. मुंबई: पुढच्या वेळी सायरन वाजवून मुंबईच्या...

सिया गोयलला चेतन हवा होता पण कुटुंबाने केतनला फिक्स केले: पालकांनी तिच्या भावनांकडे दुर्लक्ष...

केतन अग्रवाल, सिया गोयल यांची सहआरोपी चेतन चौधरी (एल)शी जवळीक काही कुटुंबीयांना माहीत होती. पुणे: पुण्यातील रिअल्टर केतन अग्रवालच्या हत्येच्या तपासात गुप्त नातेसंबंध...

“हे खरंच वाटलं…” तिने तिच्या लग्नात तिच्या दिवंगत वडिलांचा जुना कॅमेरा आणला; फोटोंमध्ये जे...

अशी काही अनुपस्थिती आहेत जी आपल्याला कधीही सोडत नाहीत. ते शांतपणे आयुष्यातील सर्वात मोठे टप्पे पाळतात, उत्सवाच्या क्षणांना त्या लोकांच्या आठवणींमध्ये बदलतात जे तिथे...

लष्कराच्या QMTI ने अपंग सैनिकांना सक्षम करण्यासाठी ड्रोन आणि EV दुरुस्ती अभ्यासक्रम सुरू केले...

लष्कराच्या QMTI ने अपंग सैनिकांसाठी अभ्यासक्रम सुरू केले आहेत पुणे : क्वीन मेरीज टेक्निकल इन्स्टिट्यूट (QMTI) ने अपंग सैनिकांसाठी ड्रोन तंत्रज्ञान आणि इलेक्ट्रिक...

error: Content is protected !!