- प्रशासक तथा आयुक्त सौ. मनिषा आव्हाळे यांनी पालिका अधिकाऱ्यांना दिल्या महत्वाच्या सूचना
उल्हासनगर दि.२२ : उल्हासनगर महानगरपालिकेत स्थायी समिती सभागृहात गुरुवारी दुपारी उल्हासनगर महापालिका प्रशासक तथा आयुक्त सौ. मनिषा आव्हाळे यांच्या मार्गदर्शनाखाली महापालिका क्षेत्रातील मान्सूनपूर्व व चक्रीवादळ सूचना अनुषंगाने संयुक्त आढावा बैठक घेण्यात आली.
या बैठकीमध्ये जवळ पास १२ विषयांवर चर्चा करण्यात आली. त्यात १) २४ x ०७ आपत्ती नियंत्रण व्यवस्थापन कक्ष स्थापन करणे. २) पालिका क्षेत्र- नाले सफाईच्या कामाबाबतची प्रगती, ३) घनकचरा व्यवस्थापन ४) पाणी पुरवठा व सार्वजनिक स्वच्छता, पुर नियोजनाच्या उपाययोजना,५ ) धोकादायक इमारती (मोडकळीस आलेल्या स्थितीत ) उपययोजना, ६) साथरोगांचे नियोजन (प्रतिबंधत्मक औषधे फवारणी, ७) रस्ते / साकव दुरुस्ती, ८) आपदग्रस्तांसाठी तात्पुरत्या निवा-याची सोय,९) पुरसंबंधी प्रमाणित कार्यपध्दती (SOP) तयार करणे व आपत्ती व्यवस्थापन आराखडा तयार करणे. १०) शोध व बचावकरिता उपलब्ध साधन सामग्रीचे नियोजन, ११) दरड कोसळणे/धोकादायक पूल/पुर जन्य ठिकाणे वेगैरे यांची पूर्व पाहणी व उपाययोजना १२) अति धोकादायक झाडे .चक्रीवादळाच्या संभाव्य धोक्याचा सामना करण्यासाठी तयारी करणे, नागरिकांच्या सुरक्षेसाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना करणे, आपत्कालीन परिस्थितीला तोंड देण्यासाठी वाढीव दक्षता घेणे याबाबत संबंधित अधिकारी यांना प्रशासक तथा आयुक्त सौ. मनिषा आव्हाळे यांनी निर्देश दिले. तसेच आपत्कालीन परिस्थितीत महापालिकेकडून मदत मिळविणेसाठी नागरिकांनी महापालिकेशी संपर्क साधणेबाबत नागरीकांना आवाहन केले.

सदर बैठकीस महापालिका अतिरिक्त आयुक्त डॉ. किशोर गवस, उपायुक्त डॉ. दिपाली चौगुले, डॉ. विजय खेडकर, अनंत जवादवार, जनसंपर्क अधिकारी तथा सहा. आयुक्त अजय साबळे, सहा. आयुक्त डॉ. सुनिल लोंढे, विशाल कदम, गणेश शिंपी, मनिष हिवरे, सुरक्षा अधिकारी यशवंत सगळे, सिस्टीम अॅनलिस्ट सौ. श्रध्दा बाविस्कर, कार्यकारी अभियंता (विदयुत) हनुमंत खरात, सहा. वैद्यकीय अधिकारी श्रीम. मोहनी धर्मा, मुख्य बाजार निरीक्षक विनोद केणे, अग्निशमन अधिकारी सुरेश बोबें, कार्यकारी अभियंता (पापुवि) परमेश्वर बुडगे तसेच नायब तहसिलदार प्रशांत कुमावत, पोलीस विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर वामन आवताडे (मध्यवर्ती पोलीस स्टेशन), पोलीस उप निरिक्षक सचिन बापू साळवे (हिललाईन पोलीस स्टेशन), सहा पोलिस निरिक्षक सचिन पत्रे व एमएसईबीचे अधिकारी एस. आर. दहाडे इतर अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.





























