Homeशहरअभ्यासिका तात्काळ सुरू करण्याच्या मागणीसाठी ९ जुलै २०२६ रोजी उपोषणाचा...

अभ्यासिका तात्काळ सुरू करण्याच्या मागणीसाठी ९ जुलै २०२६ रोजी उपोषणाचा व आंदोलनाचा इशारा

उल्हासनगर, दि. ८ ( प्रमोद दळवी )  : उल्हासनगर महानगरपालिका शाळा क्र. १७ परिसरात विद्यार्थ्यांसाठी बांधण्यात आलेली सुसज्ज अभ्यासिका (स्टडी सेंटर) चार महिन्यांपूर्वी पूर्ण होऊनही अद्याप विद्यार्थ्यांच्या वापरासाठी खुली करण्यात आलेली नसल्याचा आरोप करत, भाजपच्या नगरसेविका सौ. सुरेखा हनुमंत आव्हाड,नगरसेविका शोभाताई जाधव यांनी प्रशासनाविरोधात उपोषणाचा व आंदोलनाचा इशारा दिला आहे. या पार्श्वभूमीवर दि. ९ जुलै २०२६ रोजी सकाळी ११.०० वाजता शाळा क्र. १७ येथे उपोषण करण्यात येणार असल्याचे त्यांनी संबंधित प्रशासनाला दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे.

पोलीस उपआयुक्त, मंडळ-४, उल्हासनगर यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, उल्हासनगर महानगरपालिका शाळा क्र. १७ लगत विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गरजा लक्षात घेऊन आधुनिक सुविधांनी सुसज्ज अभ्यासिका उभारण्यात आली आहे. या भागातील बहुतांश विद्यार्थी आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबांतील असल्याने त्यांना घरामध्ये अभ्यासासाठी स्वतंत्र जागा किंवा शांत वातावरण उपलब्ध होत नाही. त्यामुळे ही अभ्यासिका विद्यार्थ्यांसाठी अत्यंत उपयुक्त ठरणार असून स्पर्धा परीक्षा, शालेय व महाविद्यालयीन शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना मोठा आधार मिळणार आहे.

निवेदनानुसार, अभ्यासिकेचे सर्व बांधकाम तसेच तांत्रिक काम चार महिन्यांपूर्वीच पूर्ण झाले असूनही प्रशासनाने ती अद्याप सुरू केलेली नाही. परिणामी विद्यार्थ्यांना या सुविधेचा लाभ मिळत नसल्याबद्दल स्थानिक नागरिकांमध्ये आणि पालकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. विद्यार्थ्यांच्या येऊ घातलेल्या स्पर्धा परीक्षा व शैक्षणिक तयारीचा विचार करून अभ्यासिका तात्काळ विद्यार्थ्यांसाठी खुली करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. अन्यथा प्रशासनाच्या निष्क्रियतेविरोधात उपोषणाचा मार्ग स्वीकारण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

या उपोषणामध्ये नगरसेविका शोभाताई जाधव, नगरसेविका सुरेखाताई हनुमंत आव्हाड तसेच स्पर्धा परीक्षांची तयारी करणारे विद्यार्थी सहभागी होणार असल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे. दरम्यान, या निवेदनाच्या प्रती महापौर, उल्हासनगर महानगरपालिका आयुक्त,तसेच वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांना माहिती व पुढील आवश्यक कार्यवाहीसाठी पाठविण्यात आल्या आहेत. नगरसेविका सुरेखा ताई आव्हाड यांनी  दिनांक २९ /०६ /२०२६ रोजी उल्हासनगर महानगर पालिका आयुक्त श्रीमती मनीषा ओव्हळे यांना व उल्हासनगर महानगर पालिकेच्या महापौर अश्विनीताई कमलेश निकम यांना पत्राद्वारे माहिती देण्यात आली होती त्यांनी त्या पत्रा वर दुर्लक्ष केल. त्यामुळे अभ्यासिका तात्काळ सुरू करण्याच्या मागणीसाठी  ९ जुलै २०२६  रोजी उपोषणाचा इशारा देण्यात आला आहे .स्थानिक नागरिक व विद्यार्थ्यांनीही अभ्यासिका तातडीने सुरू करण्याची मागणी केली असून, प्रशासनाने विद्यार्थ्यांच्या हिताचा विचार करून कोणताही विलंब न लावता ही सुविधा उपलब्ध करून द्यावी, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. आता प्रशासन या मागणीवर काय भूमिका घेते आणि उपोषणापूर्वी अभ्यासिका सुरू करण्याचा निर्णय घेतला जातो का, याकडे विद्यार्थी, पालक आणि नागरिकांचे लक्ष लागले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

पुणे खंडणी प्रकरणी तुर्की आणि चिनी बनावटीची पिस्तुल जप्त

प्रातिनिधिक हेतूसाठी चित्र पुणे : लॉरेन्स बिश्नोई टोळीच्या नावाने शहरातील व्यावसायिकांना धमक्या आणि खंडणी कॉल केल्याप्रकरणी तीन कामगारांना अटक करून एका अल्पवयीन मुलाला...

विम्बल्डनमधील इतिहास: लिएंडर पेसनंतर मुलांच्या एकेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत पोहोचणारा अर्णव पापरकर ३६ वर्षांतील पहिला...

लंडन, इंग्लंड येथे 04 जुलै 2026 रोजी द चॅम्पियनशिप विम्बल्डन 2026 च्या सहाव्या दिवशी बॉईज सिंगल्सच्या पहिल्या फेरीच्या सामन्यात अर्णव विजय पापरकर ग्रेट...

गोरेगाव येथे बेस्ट बसने ऑटोला धडक दिल्याने दोन जखमी

बेस्टची दैनंदिन प्रवासी संख्या 45 लाखांवरून 23 लाखांवर घसरली आहे परंतु भविष्यात ती 50 लाखांच्या पुढे जाण्याची अपेक्षा आहे, तज्ञांनी चेतावणी दिली आहे...

जलद व्यापार मंदावला आहे, पुण्याच्या पावसात रायडर्सना आव्हानांचा सामना करावा लागतो

रायडर्सना पावसात तोंड देण्याची स्वतःची आव्हाने होती. ते पूर आलेले रस्ते, खड्डे आणि रहदारी यातून मार्गक्रमण करत आहेत. यामुळे ऑर्डरला तात्पुरता विलंब झाला...

वंदे भारत गाड्या ज्या तुम्हाला भारतातील सर्वात प्रसिद्ध युनेस्को जागतिक वारसा स्थळांवर घेऊन जातात

युनेस्को साइट्स: ताजमहाल आणि आग्रा किल्लादिल्ली-आग्रा वंदे भारत हे कदाचित प्रवाश्यांपैकी एक आवडते आहे जे लोकांना एकाच प्रवासात दोन युनेस्को साइट्स, ताजमहाल आणि आग्रा...

error: Content is protected !!