Homeशहरकिडनी प्रत्यारोपणाचे आश्वासन देत उल्हासनगरातील एका दांपत्याची ३१ लाख ३७ हजार रुपयांची...

किडनी प्रत्यारोपणाचे आश्वासन देत उल्हासनगरातील एका दांपत्याची ३१ लाख ३७ हजार रुपयांची फसवणूक : फॅमिली डॉक्टर सह ७ जणांविरुद्ध गुन्हा

उल्हासनगर दि. ६ ( प्रमोद दळवी ) : पतीची किडनी खराब झाल्याने त्यांना किडनी ट्रान्सफर साठी डोनर मिळून देतो तसेच त्यांचे किडनी प्रत्यारोपणाचे ऑपरेशन करून देतो असे सांगून एका दांपत्याची ३१ लाख ३७  हजार रुपयाची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार उल्हासनगरातील विठ्ठलवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडला असून याप्रकरणी पोलिसांनी एका फॅमिली डॉक्टर सह ७ जणांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार उल्हासनगरातील विठ्ठलवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील चिंचपाडा गाव येथे राहणाऱ्या दिपाली या महिलेच्या पतीची किडनी खराब असल्याने तिने स्वतः पतीला किडनी डोनेट केली होती. पण दुर्दैवाने त्यातील इन्फेक्शन झाले आणि पती पुन्हा मृत्यूची झुंजू देऊ लागला. पतीला दुसरी किडनी बसवण्यात यावी यासाठी तिने त्यांचे फॅमिली डॉक्टर यांच्याशी संपर्क साधून त्यांना सर्व प्रकार सांगितला.

त्या फॅमिली डॉक्टरनी दिपाली व त्यांच्या पतीला किडनी ट्रान्सफर साठी डोनर मिळून देतो तसेच त्यांचे किडनी प्रत्यारोपणाचे ऑपरेशन करून देतो असे सांगून जवळपास सहा जणांची ओळख करून दिली. त्या टोळीने जुलै २०२५  पासून ते ७ मार्च २०२६  दरम्यान दिपाली यांच्याकडून वेळोवेळी ऑनलाइन स्वरूपात ३१ लाख ३७  हजार ८६०  रुपये उकळले. लाखो रुपये देऊनही पतीचे ऑपरेशन झाले नाही आणि किडनी डोनर ही मिळाला नाही. आपली फसवणुक  झाल्याचे लक्षात येतात दिपाली यांनी विठ्ठलवाडी पोलीस ठाणे गाठून आपल्या फॅमिली डॉक्टर सह ७ जणांविरुद्ध गुन्हा फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. गुदाखल असलेल्या गुन्हा मधील काही जण कलकत्ता,पश्चिम बंगाल, मुंबईतील आग्री पाडा, भिवंडी या परिसरात राहणारे आहेत. भुवनेश्वर राज्य ओडीसा येथे एका रुग्णालयात देखील याप्रकरणी  पैशाचा व्यवहार झाला असल्याचे समोर आले आहे. विठ्ठलवाडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक कोळी यांनी या गुन्ह्याचा तपास सुरू केला असून या घटने प्रकरणी सखोल चौकशी सुरू असल्याचे त्यांनी सांगितले आहे. या घटने प्रकरणामागे मोठा किडनी रॅकेट आहे का? यांनी कोणाची अशा प्रकारे आणखीन  फसवणूक केली आहे का याचा सखोल तपास तपास करून दाखल असलेल्या गुन्ह्यातील आरोपींना त्वरित अटक करण्यात यावी अशी मागणी केली जात आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

नोएडा विरुद्ध युरोप: ‘नोएडा युरोपपेक्षा चांगला आहे’: भारतीय प्रवाश्यांच्या वक्तव्यामुळे स्वीडन, जर्मनी आणि ऑस्ट्रियावर...

इंस्टाग्रामवर एका भारतीय प्रवाशाची युरोपियन ठिकाणांबद्दलची वैयक्तिक पोस्ट व्हायरल होत आहे. परंतु प्रवासी अनमोल रैना (@anmolraina13) च्या व्हिडिओने “नोएडा युरोपपेक्षा चांगले आहे”...

मुंबई आणि पुण्यात पाणी साचल्याने सुप्रिया यांनी भाजपवर निशाणा साधला

बुधवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे शहरात सर्वत्र पाणी साचले आणि मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली. ताथवडे येथे मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने वाहनांची वाहतूक विस्कळीत...

इक्वेडोर विरुद्ध जर्मनी फिफा विश्वचषक 2026 मॅच हायलाइट्स: इक्वाडोर 2-1 जर्मनी; लवचिक इक्वाडोरने आळशी...

इक्वाडोर वि जर्मनी लाइव्ह स्कोअर: टीम न्यूज: जर्मनीसाठी मोठ्या तोफा परतल्या; Caicedo इक्वेडोर आघाडीवर आहेअधिकृत लाइनअप संपले आहेत आणि दोन्ही व्यवस्थापक आज रात्री कोणतेही...

एअरबॅग तैनातीमुळे मुंबईजवळ पार्क केलेल्या कारमध्ये 25 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला

स्टीयरिंग व्हील एअरबॅग केसिंग कथितपणे पीडितेला उच्च तीव्रतेने आदळले, ज्यामुळे गंभीर जखमा झाल्या आणि स्थिर वाहनाच्या आत प्राणघातक रक्तस्त्राव झाला मुंबई: मीरा रोड...

पीएमपीएमएल मान्सूनसाठी सज्ज नाही? 2 दिवसांच्या पावसामुळे 264 बस बिघडल्या

एफसी रोडवर नुकतीच तुटलेली पीएमपीएमएल बस क्रेनने ओढली आहे पुणे : पुण्यातील दोन दिवसांच्या मध्यम पावसाने पीएमपीएमएलच्या मान्सूनच्या तयारीचा अभाव उघड केला कारण...

error: Content is protected !!